रॅपिपे आणि रेमीटएक्स या दोन कॅपिटल इंडिया फायनान्स कंपन्यांची आंतरराष्ट्रीय आउटवर्ड रेमिटन्स सर्विसेससाठी भागीदारी



रॅपिपे आणि रेमीटएक्स या दोन कॅपिटल इंडिया फायनान्स कंपन्यांची आंतरराष्ट्रीय आउटवर्ड रेमिटन्स सर्विसेससाठी भागीदारी 


रॅपिपे ही सहाय्यक पेमेंट श्रेणीतील आंतरराष्ट्रीय आउटवर्ड रेमिटन्स सुविधा देऊ करणारी पहिली भारतीय कंपनी  



मुंबई, 15 मार्च 2021: एस. के. नरवर यांनी सुरू केलेली कॅपिटल इंडिया फायनान्स लिमिटेड (सीआयएफएल), ही तंत्रज्ञान आधारित आर्थिक क्षेत्रातील एसएमई आहे.  विविध प्रकारच्या ग्राहकांना आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण (आंतरराष्ट्रीय आउटवर्ड रेमिटन्स) सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फिनटेक सहाय्यक रॅपिपेने आणि परदेशात पैसे हस्तांतरण (रेमीटन्स) करण्याचा व्यवसाय असलेल्या ‘रेमिटएक्स’ ने भागीदारी करत असल्याचे जाहीर केले.  या घडामोडींमुळे, सीआयएफएलने संयुक्त समन्वयाचा मागोवा घेण्यसाठी आपल्याच समुहात युती केली आहे. यासाठी त्यांनी आर्थिक तंत्रज्ञान सक्षम करून आउटवर्ड रेमिटन्स सेवा भारतातील विशाल सूक्ष्म बाजारापर्यंत पोहोचवून स्वत:चे स्थान बळकट केले.  वित्तीय, देयक आणि बँकिंग विभागात डिजिटल इकोसिस्टम निर्माण करून शहरी आणि ग्रामीण ग्राहकांना आपल्या सेवा सुविधा पुरविणे हे सीआयएफएलचे उद्दिष्ट आहे.    

 

या भागीदारी अंतर्गत, रेमिटएक्सतर्फे दिल्या जाणाऱ्या आउटवर्ड रेमिटन्स सेवांसाठी आपल्या प्रचंड नेटवर्कच्या माध्यमातून रॅपिपे ही मोठ्या प्रमाणात देशातील बाजारांमध्ये आपला शिरकाव करून घेणार आहे. यासाठी त्यांच्या दोन लाखांहून अधिक ‘रॅपिपे साथीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वितरकांची मदत घेतली जाणार आहे.  तर दुसरीकडे, रेमिटएक्सतर्फे रॅपिपेच्या व्यवसाय नेटवर्कसाठी आउटवर्ड रेमिटन्स, परदेशी चलन बँक नोटांची खरेदी-विक्री, परदेशी चलन डिमांड ड्राफ्ट, परदेशी चलन प्रीपेड कार्ड्स, प्रवास विमा यासारख्या तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या एकात्मिक विदेशी विनिमय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या सेवांमुळे, रॅपिपेला विद्यार्थी, आरामासाठी परदेशी प्रवास करणारे पर्यटक, परदेशी शिक्षण सल्लागार, कॉर्पोरेट हाऊसेस, ट्रॅव्हल एजंट्स आणि वित्तीय संस्था अशा विविध श्रेणीतील ग्राहकांसाठी परदेशी चलन सुविधा देता येणार आहे.  


रेमिटएक्सतर्फे विद्यार्थ्यांसाठी आउटवर्ड रेमिटन्सेस आणि परदेशी वैद्यकीय उपचारांसाठी आउटवर्ड रेमिटन्सेस अशा आंतरराष्ट्रीय रेमिटन्स विभागात मोठी मागणी असलेल्या दोन सेवा सध्या रॅपिपेच्या माध्यमातून पुरविण्यात येत आहेत.  कोव्हीड परिस्थितीनंतर, विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची तयारी करत असल्याने हा विभाग विद्यापीठांचे शुल्क आणि वैयक्तिक खर्च पुरविण्याची मोठी संधी देण्यासाठी तयार आहे.  


सीआयएफएलचे कार्यकारी अध्यक्ष, डॉ. हर्ष कुमार भानवाला म्हणाले, “कोव्हीड नंतरच्या आताच्या काळात, भारतीय दुर्लक्षित बाजारात सुरळीत आणि रिअल टाईम तंत्रज्ञानानेयुक्त परदेशी चलन रेमिटन्स सेवा देण्यासाठी आम्ही तयार आहोत.  वेगळ्या वैशिष्ट्यांसह रॅपिपे आणि रेमिटएक्स मिळून परदेशी चलन विभागात अती उच्च दर्जाच्या कनेक्टीव्हिटीचे मॉडेल तयार करून लाभार्थींच्या वैविध्यपूर्ण श्रेणींना मदत करतील.”     


विद्यार्थ्यांचा विचार करता, दर वर्षी सुमारे दहा लाख विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. त्यांचे कुटुंबीय बँकेमार्फत आणि स्थानिक चलन बदलून देणाऱ्यांमार्फत शिक्षण शुल्क म्हणून या परदेशी चलनाचे हस्तांतरण करतात.  बहुतांश वेळा, ग्राहकांना द्यावा लागणारा विनिमय दर हा अतिशय जास्त तरी असतो किंवा त्यावर अतिरिक्त बँक शुल्क आकारले जाते. रेमिटएक्स केवळ उत्कृष्ट दरच देऊ करत नाही तर ती विनाकटकटीची आणि पारदर्शक प्रक्रियेची हमी देखील देते.  रॅपिपेच्या देशभरातील टीअर 2 आणि टीअर 3 शहरांमधील उपस्थितीमुळे, ग्राहकांना परदेशी चलन पाठवणे अतिशय सुलभ होणार आहे.  

 

याचप्रमाणे, वैद्यकीय गरजांसाठी आउटवर्ड रेमिटन्सेस ही आणखी एक मोठी मागणी असणारी सेवा रेमिटएक्सतर्फे पुरविण्यात येते.  आपल्या रेमिटन्स गरजा पुरविण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या रॅपिपे एजंट्सशी संपर्क साधावा लागतो.  अलीकडे, युएसए, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसाठी आंतरराष्ट्रीय आउटवर्ड रेमिटन्सेससाठीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.  डॉ. भानवाला म्हणाले, “भारतातील पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात या राज्यांतील नव्याने उदयाला येत असलेल्या बळकट आर्थिक टीअर 2 आणि टीअर 3 शहरांमधून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.” 


रॅपिपे ही सहाय्यक पेमेंट श्रेणीतील त्यांच्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आउटवर्ड रेमिटन्स सुविधा देऊ करणारी पहिली भारतीय कंपनी आहे.

   


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24