स्टरलाइट पॉवरने मनीष अग्रवाल यांना इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड सोल्यूशन्स बिझिनेसचे सीईओ म्हणून पदोन्नती दिली

 स्टरलाइट पॉवरने मनीष अग्रवाल यांना इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड सोल्यूशन्स बिझिनेसचे सीईओ म्हणून पदोन्नती दिली


मुंबई, १ मार्च २०२१: स्टर्लाईट पॉवर या पॉवर ट्रान्समिशनच्या अग्रगण्य जागतिक विकासक कंपनीने इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीष अग्रवाल यांच्या पदोन्नतीची घोषणा केली.


 मनीष २२ वर्षांपासून स्टर्लाईट ग्रुपशी संबंधित असून त्यांनी संघटनेत विविध नेतृत्व पदे भूषवली आहेत. या पदोन्नती आधी ते सोल्यूशन्स बिझिनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते ज्यात त्यांनी मास्टर सिस्टम्स इन्टिगेशन (एमएसआय) आणि भूगर्भीय विद्युत केबल आणि ओव्हरहेड उत्पादनांच्या उच्च परफॉरमन्स कंडक्टर आणि ओपीजीडब्ल्यूच्या उत्पादनांचा समावेश असलेल्या ब्राउनफिल्ड ट्रान्समिशनवर लक्ष केंद्रित केले होते.


या पदोन्नती अंतर्गत, मनीष भारतातील कंपनीच्या ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड या दोन्ही ट्रान्समिशन व्यवसायासाठी जबाबदार असतील.


या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना स्टरलाइट पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीक अग्रवाल म्हणाले, “मनीष हे एक अनुभवी नेता असून त्यांच्याकडे पॉवर अँड टेलिकॉम क्षेत्रातील अनुभव आहे. त्यांचे सक्षम नेतृत्वाची क्रेडेन्शियल्स आम्हाला आमच्या संस्थेच्या मुख्य-हेतू आणि मूल्यांशी संरेखित करून या व्यवसायाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल प्रचंड आत्मविश्वास देतात."

 

मनीष विविध चेंबर्स, असोसिएशन, टेक्निकल बॉडीज आणि काउन्सिलमध्ये प्रमुख पदे भूषवित आहेत आणि व्यापार आणि शाश्वततेच्या संदर्भातील धोरणांना प्राधान्य देणाऱ्या उद्योगविषयक बाबींवर ते अग्रगण्य आहेत. ते हार्वर्डचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आयआयएम-ए आणि हैदराबादच्या आयएसबी कडून कार्यकारी नेतृत्व कार्यक्रमदेखील केला आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.