एएससीआय फ्यूचरब्रॅण्‍ड्ससोबत सहयोगाने भारतीय जाहिरात क्षेत्रामधील महिलांच्‍या भूमिकांना चालना देणारे 'जेण्‍डरनेक्‍स्‍ट' सादर करणार


एएससीआय फ्यूचरब्रॅण्‍ड्ससोबत सहयोगाने भारतीय जाहिरात क्षेत्रामधील महिलांच्‍या भूमिकांना चालना देणारे 'जेण्‍डरनेक्‍स्‍ट' सादर करणार

·         हे संशोधन जाहिरात क्षेत्रामधील महिलांच्‍या सकारात्‍मक भूमिकेला आकार देण्‍यासाठी कृतीजन्‍य माहिती देणार

·         अहवाल वर्षातील खास आकर्षण ठरेल, ज्‍यामध्‍ये एएससीआयचा लैंगिक उपक्रमांवर फोकस आहे


मुंबई, २६ मार्च २०२१: दि अ‍ॅडव्‍हायर्टायझिंग स्‍टॅण्‍डर्डस कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) फ्यूचरब्रॅण्‍ड्ससोबत सहयोगाने भारतीय जाहिरात क्षेत्रामधील महिलांच्‍या भूमिकेला चालना देणारा पहिला व सर्वसमावेशक उपक्रम सादर करत आहे. जेण्‍डरनेक्‍स्‍टचा कृतीजन्‍य माहिती देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे जाहिरात क्षेत्रामध्‍ये सकारात्‍मकपणे महिलांच्‍या उपस्थितीला आकार मिळू शकतो.

हे संशोधन वर्षभर लैंगिकवरील फोकसचा भाग म्‍हणून २०२१ मध्‍ये एएससीआय हाती घेणा-या विविध उपक्रमांपैकी पहिलाच उपक्रम आहे.

एएससीआयचे अध्‍यक्ष सुभाष कामत म्‍हणाले, ''स्‍वयं-नियामक संस्‍था म्‍हणून एएससीआयची इच्‍छा आहे की, जाहिरातदारांनी अधिक जबाबदारीने जाहिराती सादर कराव्‍यात. तक्रार व्‍यवस्‍थापपन संस्‍था म्‍हणून आमच्‍या मर्यादांना सिमित ठेवण्‍यासोबत जाहिरातदारांना जटिल समस्‍यांमधून मार्ग काढण्‍यास आणि सकारात्‍मक जाहिरात निर्माण करण्‍याप्रती योगदान देण्‍यास मदत करण्‍याचा आमचा मनसुबा आहे. एएससीआय ब्रॅण्‍ड्स व जाहिरातदारांना विविध पद्धतीने 'गेट इट राइट'संदर्भात साह्य करेल आणि हा असाच एक उपक्रम आहे.''

सप्‍टेंबर २०२१ मध्‍ये रीलीज होणारा अहवाल जाहिरात क्षेत्रामध्‍ये महिलांच्‍या भूमिका समण्‍यामधील परिणामकारक कलाकृती असण्‍याची अपेक्षा आहे. हा अहवाल उद्योगक्षेत्रातील विविध सुरूवातीच्‍या मुद्यांना समोर आणतो. सुरूवातीला विभाग व प्रांतांमध्‍ये सेमीओटिक्‍स आणि काळानुरूप भारतीय जाहिरातीचे सांस्‍कृतिक डिकोड सादर करण्‍यात येईल. तसेच जाहिरातदार, सर्जनशील आवाज, धोरणकर्ते, लैंगिक तज्ञांना त्‍यांची संबंधित माहिती मिळेल. अॅड क्लिनिक्‍सचे १० केंद्रांमध्‍ये आयोजन करण्‍यात येईल, तसेच ग्राहकांना जाहिरातींमधील लैंगिक भूमिकेबाबत त्‍यांची मते व अभिप्राय व्‍यक्‍त करता येतील. दशकाहून अधिक काळापासून २०० हून अधिक शहरांमध्‍ये फ्यूचरब्रॅण्‍ड्सद्वारे करण्‍यात येणारे प्रोप्रायटरी संशोधन भारत दर्शनच्‍या माध्‍यमातून भारतातील व्‍यापक सांस्‍कृतिक बदलांबाबत माहिती देईल. जेण्‍डरनेक्‍स्‍ट हे अनोखे संशोधन आहे आणि जाहिरातदार व क्रिएटिव्‍ह एजन्‍सींसोबत शैक्षणिक संस्‍था, धोरणकर्ते व सल्‍लागार संस्‍थांसाठी लक्षणीय महत्त्वाचे असण्‍याची अपेक्षा आहे.

या संशोधनामध्‍ये विविध विभागांचा समावेश असेल: पर्सनल, फॅशन व ब्‍युटी केअर; घर संसार, घर व आरोग्‍य; गॅझेट्स व व्‍हील्‍स; आणि पैसा व शिक्षण.

या सर्वेक्षणाची मुख्‍य उद्दिष्‍टे पुढीलप्रमाणे:

·         सहयोगात्‍मक प्रवासाच्‍या माध्‍यमातून जाहिरात क्षेत्रातील लैंगिक स्थिती समोर आणणे.

·         सांस्‍कृतिक बदलाच्‍या संदर्भात लैंगिक माहितीचा समावेश करण्‍यासोबत संपन्‍न करणे.

·         जाहिरात क्षेत्रामध्‍ये महिलांच्‍या उपस्थितीबाबत सकारात्‍मक बदलाला चालना देण्‍यासाठी माहिती पुरवणे.

एएससीआयच्‍या महासचिव मनिषा कपूर म्‍हणाल्‍या, ''जाहिरात क्षेत्रामध्‍ये महिलांचे स्‍थान हा दीर्घकाळापासून चर्चेचा विषय राहिला आहे. लैंगिक स्थिती सर्वसमावेशक व बदलती राहिली आहे, पण हा बदल सोपा व एकसमान नाही. जेण्‍डरनेक्‍स्‍ट जाहिरातदारांना या स्थितींची जाणीव करून देण्‍यामध्‍ये मदत करेल, ज्‍यामुळे कधी-कधी एकमेकांसोबतच्‍या वादविवादांना सुलभपणे निराकरण करण्‍यास मदत होऊ शकेल. याचा संवादांना चालना देण्‍याचा आणि कृतीजन्‍य माहितीची निर्मिती करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे जाहिरातदार गतीशील, सांस्‍कृतिकदृष्‍ट्या संबंधित व महत्त्वाकांक्षी लैंगिक बदलांच्‍या दिशेने वाटचाल करू शकतील. जेण्‍डरनेक्‍स्‍ट व्‍यतिरिक्‍त आम्‍ही लैंगिक स्थितीमध्‍ये बदल घडवून आणण्‍यासाठी हीच उद्दिष्‍टे असलेल्‍या समविचारी कंपन्‍यांसोबत देखील सहयोग करणार आहोत.''

जाहिरातदारांमध्‍ये या संशोधनाबाबत रूची निर्माण झाली आहे आणि ते त्‍यांच्‍या स्‍वत:ची माहिती, तसेच फंडिंगसह या संशोधनाला पाठिंबा देत आहेत. या उल्‍लेखनीय संशोधनाला नोबेल हायजिन, आयटीसी-विवेल, केलॉग, कोलगेट, डियाजिओ, युरेका फोर्ब्‍स व मॉंडेलीझ यासारख्‍या कंपन्‍यांकडून पाठिंबा मिळाला आहे आणि एएससीआयला या कंपन्‍यांचे अधिक सदस्‍य या संशोधनाचा भाग होण्‍याची आशा आहे.

फ्यूचरब्रॅण्‍ड्सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई म्‍हणाले, ''आम्‍हाला जाहिरात क्षेत्रामधील बदलत्‍या लैंगिक स्थितीला ओळखणा-या आणि जाहिरातदारांना त्‍यांचे धोरण तयार करण्‍यामध्‍ये मदत करणा-या संशोधनाचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. प्रमुख ग्राहकांचे अभिप्राय, भागधारक व समालोचकांची मते आणि सांस्‍कृतिक बदलांचे व्‍यापक वाचन यांचे संश्‍लेषण असलेले हे संशोधन व्‍यापक सांस्‍कृतिक कार्याला निर्माण करेल आणि फ्यूचरब्रॅण्‍ड्स मागील दशकापासून हे कार्य करत आले आहे.''

संशोधनाचे प्रमुख प्रायोजक नोबल हायजिनचे विपणन व व्‍यापा-याचे उपाध्‍यक्ष कार्तिक जोहरी म्‍हणाले, ''एक कंपनी म्हणून आमचे ब्रॅण्‍ड्स ग्राहकांच्‍या मागण्‍यांची पूर्तता करतात. एएससीआयसोबतच्‍या या अद्वितीय सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही संस्‍कृतीची लोकप्रियता आणि आकार देण्‍याची तिची कायमस्वरूपी क्षमता, लिंगाबाबतचा आपला समज समजण्‍यासाठी उत्‍सुक आहोत. आम्‍ही आशा करतो की, हे संशोधन त्‍यांच्‍या विचारांना समोर आणण्‍यासोबत भविष्‍याला आकार देणा-या विचारांवर देखील नियंत्रण करेल.''

हे संशोधन वैयक्तिक विभागापलीकडे जात ब्रॅण्‍ड्समध्‍ये मोठे बदल घडवून आणेल. यामधून जाहिरातदार, निर्माते, धोरणकर्ते, शैक्षणिक संस्‍था यांच्‍यामध्‍ये नवीन संवादांना चालना मिळण्‍याची आशा आहे आणि हे जाहिरात क्षेत्रातील लैंगिक स्थितीवर परिणामकारक संदर्भ संशोधन असण्‍याची अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202