‘डोझी’ने वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ‘डोझी प्रो’ हे संपर्करहित दूरस्थ रुग्ण देखभाल सेवा यंत्र रुग्णालयांसाठी केले दाखल


‘डोझी’ने वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ‘डोझी प्रो’ 

हे संपर्करहित दूरस्थ रुग्ण देखभाल सेवा यंत्र रुग्णालयांसाठी केले दाखल


 

तीन महिन्यांमध्ये ७० रुग्णालयांबरोबर भागिदारी करत कंपनीने वॉर्ड आणि गृहस्थित रुग्णालय आरोग्य निगेमध्ये आरपीएम पद्धती केली शक्य

 

मुंबई, ३ मार्च २०२१ : संपर्करहित दूरस्थ रुग्ण देखभाल (कॉन्टॅक्टलेस रिमोट पेशंट मॉनिटरिंग- आरपीएम) सेवा क्षेत्रातील अग्रणी कंपनी डोझीने ‘डोझी प्रो’ हे रुग्णालयांसाठी कॉन्टॅक्टलेस व्हायटल मॉनिटर उत्पादन दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. ‘डोझी प्रो’मध्ये आटीफीशीयल इंटेलिजन्सआधारित ट्रीएजिंग सिस्टम असून त्याद्वारे कोणताही बेड हा अगदी दोन मिनिटांमध्ये स्टेप डाऊन आयसीयुमध्ये बदलता येतो. त्याद्वारे आयसीयूच्या बाहेरच्या रुगांचेसुद्धा रिमोट मॉनीटरिंग केले जाऊ शकते.  ‘डोझी’ला ‘आरपीएम’ सेवाक्षेत्रामध्ये चांगली मागणी येत असून भारतभरतील तब्बल ७० ररूग्णालायांनी ३ महिन्यांहूनही कमी कालावधीत सहकार्य करार केला आहे. कंपनीने रुग्णालयांमध्ये ४०० डिव्हायसेस ठेवले असून त्या माध्यमातून रुग्णांची सातत्याने देखभाल केली जाते आणि त्या माध्यामतून रुग्णनिगा व वैद्यकीय सेवा अधिक उंचीवर  नेली जाते. ‘डोझी’ने १६,००० रुग्णांची देखभाल केली असून त्यातील २५० जणांचे आयुष्य वेळेत जोखीम निदान करत आणि तब्बेत खालाव्ण्यापासून थांबवत वाचवले आहे. ‘डोझी’ पुढील १२  महिन्यात आणखी ५०० रुग्णालयांशी सहकार्य करार करणार असून त्या माध्यमातून अतिरिक्त,००,००० रुग्णांची देखभाल करण्यास सज्ज झाली आहे.  

 

‘डोझी प्रो’च्या माध्यमातून निरंतर आणि अचूक असे रुग्णांची हृदय दर, श्वसन दर आणि इतर वैद्यकीय मापदंड (प्रतितास १०० पेक्षाही अधिक वेळा) तपासले जातात. त्यात स्लीप प्निया, मायो कार्डीयल परफॉर्मन्स मॅट्रिक्स यांचा समावेश होतो आणि त्यासाठी रुग्णाच्या संपर्कात येण्याची गरजही पडत नाही. या उत्पादनामध्ये औद्योगिक दर्जाचा संपर्करहित सेंसर, कम्युनिकेशन पॉड आणि क्लाऊडआधारित रुग्ण देखरेख माध्यम आहे. त्याला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सआधारित संपर्करहित सेन्सर असून त्यातून शरीराची महत्वाच्या मापदंडावर तत्कालीन तपासणी केली जाते. त्याद्वारे रुग्णाची रात्रंदिवस देखरेख करणे शक्य होते. आत्ता  हे काम नर्स  दर दोन तासांनी करतात. ‘डोझी प्रो’मध्ये एक विस्तारणीय असे व्यासपीठ असून त्याद्वारे एसपीओ2 सेंसर, इसीजी आणि तापमान सेन्सर यांसारख्या इतर महत्वपूर्ण मापदंडांची माहिती प्राप्त होते. त्यांत ऑक्सिजन सॅच्युरेशनम, शरीराचे तापमान आणि इसीजी यासारखे महत्त्वपूर्ण मापदंड नियंत्रणाखाली राहतात.

 

‘डोझी प्रो’ दर सेकंदाला 250 डेटा नमुने घेऊ शकते आणि त्यांचे निदान प्रत्येक ३० सेकंदाला होते. पेशंटच्या तब्बेतीची आकडेवारी सातत्यपूर्णपणे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळते. रुग्णाच्या तब्येतमध्ये बिघाड दिसून आला तर त्यासाठी ही यंत्रणा मदतीची ठरते. त्याद्वारे रुग्ण अधिक गंभीर होण्याआधी वैद्यकीय सेवा चमूला योग्य ती पावले उचलणे शक्य होते. डॉक्टरने आरोग्यनिगा चामुंना दूरस्थ पद्धतीने रुग्णाच्या आरोग्याचे नियंत्रण केंद्रीय रुग्ण यंत्रणेद्वारा करता येते. त्याद्वारे एकाच वेळी शेकडो रुग्णांची देखभाल वेब-डॅशबोर्डद्वारे करता येते किंवा मोबाईल फोन पद्वारे करता येते. प्रत्येक रुग्णावर समर्पित अॅलर्ट लावता येतात आणि त्याद्वारे डॉक्टरांना रुग्णाच्या उपचारांची योजना अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. डॉक्टरांना तब्येत खालावत असलेल्या रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करता येते आणि त्यामुळे त्यांना सुधारित स्वयंस्फूर्त सेवा देता येते.

 

‘डोझी प्रो’ भारतात तयार झालेली यंत्रणा असून त्याची वैद्यकीय श्रेणी अचूकता ९८.४ टक्के एवढी आहे. अचूकता स्थापित होण्यासाठी या यांत्रणेची तपासणी ‘निमहान्स ’ आणि ‘श्री जयदेव इन्स्टिट्यूट’ येथे एक हजार रुग्णांवर केली गेली. रुग्णालयांमधील या यंत्रणेच्या वापराबरोबरच ‘डोझी प्रो’ आरोग्य निगा देणाऱ्या संस्थांना पेशंटच्या महत्वपूर्ण अशी माहिती दूरस्थपणे मिळवण्यासाठी आणि खालावलेल्या तब्येतीची अॅलर्ट मिळण्यासाठी उपयोगात येतात. ही आकडेवारी रुग्णालयाच्या बाहेर अगदी घरातूनही घेता येते. या सेवेमध्ये रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतरही एकात्मिक अशा योग्य वेळेच्या इशारा द्वारे सेवा दिली जाते. त्यासाठी बाह्य रूग सेटिंग आणि रुग्णालय स्तरीय गृह निगा सेटिंगद्वारे ‘डोझी प्रो’ यंत्रणा रुग्ण, त्यांचे कुटुंब सदस्य आणि आरोग्यनिगा पुरवठादार यांना तत्कालीन आकडेवारी आणि अॅलर्ट पुरविते. त्याद्वारे रुग्णांची परिस्थिती बिघडल्यास त्याची माहिती घेतली जाते.  

 

भारतातील आरोग्य क्षेत्रामध्ये कोविड-१९ साथरोगाने आव्हाने आणि संधी या दोन्ही गोष्टी समोर आणल्या आहेत. देशामध्ये दोन दशलक्ष रुग्णालय खाटा असून आईसीयु बेडची संख्या केवळ १ लाख एवढी आहे. आपल्याकडे प्रशिक्षित नर्सिंग कर्मचाऱ्यांची वानवा असून त्यामुळे रुग्णांवर अनियमितपणे देखरेख ठेवणे अशक्य होते. आयसीयू बाहेरच्या रुग्णांच्या बाबतीत ही स्थिती अधिक गंभीर असते. सध्या काही कमी किमतीच्या आणि सहजपणे वापरल्या जावू शकतील अशा काही यंत्रणा उपलब्ध आहेत. त्याद्वारे रुग्णालयांना वॉर्डमधील रुग्णांवर लक्ष ठेवणे शक्य होते. आजही रुग्णाची प्राथमिक माहिती घेण्यासाठी नर्स प्रत्यक्षपणे रुग्णांची तपासणी करतात. नियमित देखरेख न ठेवल्यामुळे रुग्णाची तब्बेत जर खालावली तर ते ध्यानात येणे कठीण जाते आणि त्यामुळे गुंतागुंत वाढू शकते. जरी आरपीएम सेवा इतर देशांमध्ये कार्यरत असली तरी भारतामध्ये ती अगदीच प्राथमिक स्तरावर आहे. अहवालानुसार जागतिक रिमोट पेशंट मॉनिटरिंग मार्केट’ २०२७ मध्ये २.१४ अब्ज अमेरिकन डॉलर होणे अपेक्षित आहे. २०१९ मध्ये या बाजारपेठेचा आकार ७८६.४दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा होता. पुढील सहा वर्षे ही वृद्धी १४.१ टक्के अपेक्षित आहे. मात्र कोविड-१९ साथरोगाने आरोग्य निगा डॉक्टरांना रिमोट पेशंट मॉनिटरिंग तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास भारतीय आणि जागतिक स्तरावरही भाग पाडले आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24