सोमय्या विद्याविहारच्या रिड्लने लाँच केली रिड्ल अकॅडमी, देऊ करत आहे डिझाइनमधील पदवी
सोमय्या विद्याविहारच्या रिड्लने लाँच केली रिड्ल अकॅडमी, देऊ करत आहे डिझाइनमधील पदवी
मुंबई, मार्च, २०२१: रिड्ल (रिसर्च इन इनोव्हेशन इन्क्युबेशन डिझाइन लॅबोरेटरी) या सोमय्या विद्याविहारच्या उपक्रमाने आपले विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व नवोन्मेषाची जोपासना करण्याचा उद्देश आणखी दृढ करण्यासाठी रिड्ल अकॅडमी सुरू केली आहे. ही अकॅडमी डिझाइनमधील चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम देऊ करणार आहे.
विद्यार्थ्यांनी आपली आवड व समकालीन गरजांच्या आधारे अभ्यासक्रमाची निवड करून स्वत:चा प्रोडक्ट डिझाइन प्रवास सुरू करावा या खास उद्देशाने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्रशासन, शाश्वतता, आरोग्यसेवा, जैवतंत्रज्ञान, कृषीतंत्रज्ञान, अन्न व पोषण, रोबोटिक्स, वाहतूक, शिक्षण, मनोरंजन, फिन-टेक आदी जोमाने वाढणा-या क्षेत्रांतून आपल्या आवडीचे क्षेत्र विद्यार्थ्यांनी निवडायचे आहे.
हा चार वर्षांचा अभ्यासक्रम तरुण, बहुढंगी व्यक्तींना डिझाइन व्यवस्थापनाची स्थापना शोधण्याची, नवोन्मेष व उद्योजकतेबद्दल शिकण्याची, दृश्य तसेच आशय डिझाइनिंगची तसेच यूजर एक्स्पिरिअन्स डिझाइनची संधी पुरवतो. या अभ्यासक्रमात विस्तृत आदानप्रदान कार्यक्रमांसह वर्गातील सत्रे (शैक्षणिक प्रारूप) आणि इंटर्नशिप व लाइव्ह प्रकल्पांच्या माध्यमातून उद्योगक्षेत्राचे ज्ञान असा मेळ साधला जाणार आहे.
अभ्यासक्रमाचे वेगळेपण:
· तरुणांमध्ये प्रयोगात्मक अध्ययनाच्या माध्यमातून नवोन्मेष व डिझाइनविषयक विचाराला प्रोत्साहन देण्याची अनन्यसाधारण संधी हा कार्यक्रम देत आहे
· या चार वर्षांच्या संमिश्र अभ्यासक्रमात वर्गातील सत्रे, आदानप्रदान कार्यक्रम, थेट प्रशिक्षण व इंटर्नशिप यांचा समावेश आहे
· कार्यात्मकता, सौंदर्यशास्त्र व शाश्वतता ही या कार्यक्रमाची तीन प्राथमिक अंगे.
· डिझाइन, तंत्रज्ञान, व्यवसाय व मानवशास्त्रे यांच्यावर आधारित आधुनिक काळाशी सुसंगत अशा अभ्यासक्रमाचा विकास
· जगभरातून वैविध्यपूर्ण अध्यापकांची नियुक्ती- अध्यापनाबद्दल कळकळ असलेले अध्यापक
· प्रोटोटाइप तयार करण्यासाठी जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा तसेच नवोन्मेषाला सहाय्य करण्यासाठी विशेष अनुदाने
· जोडलेले व प्रेरित राहण्यासाठी कॅम्पसमध्ये डिझाइन व नवोन्मेषकारी समुदायांची जोपासना
रिड्लचे चीफ इनोव्हेशन कॅटालिस्ट गौरांग शेट्टी या अभ्यासक्रमाबद्दल म्हणाले, “प्रयोगात्मक अध्ययन आणि डिझाइन थिंकिंग या आजच्या जगातील सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आम्ही रिड्ल अकॅडमीचा शुभारंभ करताना अत्यंत आनंदित आहोत. ही अकॅडमी बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम चालवणार आहे. जागतिक डिझाइन आणि नवोन्मेष परिसंस्थेतील रिड्लने रचलेल्या पायाचा लाभ या डिझाइन कार्यक्रमाला मिळणार आहे. याशिवाय सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीची बहुशाखीय शैक्षणिक अनुभवाची जोडही याला लाभणार आहे.”
सुरुवातीच्या टप्प्यातील कंपन्यांना शैक्षणिक कार्यक्रम, जागा, संरचना, कार्यक्रम, उद्योगक्षेत्राशी संबंधित संसाधने, बौद्धिक संपदेचे संरक्षण, व्यवसाय सहाय्य सेवांची उपलब्धता, बाजारपेठेत उतरण्याच्या युक्त्या, सुरुवातीचे बीज भाडंवल आणि मेंटॉरशिप देऊन रिड्ल त्यांच्या निर्मितीला तसेच सुरुवातीच्या काळातील वाढीला (इनक्युबेशन) सहाय्य करते. भारत सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, बीआयआरएसी (भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग) आणि महाराष्ट्र सरकारच्या एमएसआयएनएसचे पाठबळ रिड्लला आहे.
Comments
Post a Comment