आयपीओमध्ये प्रथमच गुंतवणूक करणा-यांसाठी मार्गदर्शिका

 आयपीओमध्ये प्रथमच गुंतवणूक करणा-यांसाठी मार्गदर्शिका



गुंतवणूकदारांना जेव्हा पहिल्यांदा भांडवली बाजाराची ओळख होते, तेव्हा त्यांना बाजारातील अनेक संकल्पनांचे आकलन होणे सुरुवातीला कठीण जाते. तथापि, थोडे कष्ट आणि सोप्या पद्धतीने संशोधन केल्यास यातील मूलभूत गोष्टी शिकण्यास सरुवात करता येते. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) हीदेखील अशीच महत्त्वाची संकल्पना आहे, जी स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गुंतवणुकदारांनी समजून घेतली पाहिजे. अनेक स्थापन झालेल्या संस्था आणि उद्योगांनी बाजारातील बीएसई सेन्सेक्स, नॅसडॅक १००, एनवायएसई, इत्यादी प्रमुख निर्देशांकावर त्यांचे आयपीओ लाँच करून मोठे यश मिळवले आहे. रिटेल गुंतवणुकदारांनी कंपनीचे स्थान ओळखून त्यानुसार गुंतवणूक करावी, अशी त्यांची अपेक्षा असते. आयपीओ म्हणजे नेमके काय आणि प्रथमच गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल विस्ताराने सांगत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मिड कॅंप्स एव्हीपी श्री. अमरजीत मौर्य.

ज्या कंपन्या कामगिरीदरम्यान ठराविक यश मिळवतात, त्यांच्यासाठी आयपीओ लाँच करणे आणि सार्वजनिक होणे, हे त्यापुढील ध्येय असते. यातून त्यांचे कामकाज विस्तारायचे असते. शेअर्स खुले केल्याने, या कंपन्यांकडे कदाचित सध्या नसलेले भांडवल उभे करता येऊ शकते. तसेच अधिक तरलता आणल्याने त्यांना कर्ज चुकवायची असतात तसेच कंपनीबाबतची सार्वजनिक प्रतिमाही सुधारायची असते. आयपीओ लाँच करण्यापूर्वी अनेक परस्पर अवलंबून तसेच किचकट प्रक्रिया पार पाडल्या जातात. कंपन्यांना संबंधित परवानगी मिळवण्यापूर्वी ही प्रक्रिया पार पाडावी लागते.

संस्थांसाठी आयपीओची प्रासंगिकता व त्यातील टप्पे:

कंपन्या या संस्थापक आणि गुंतवणुकदारांच्या मालकीच्या असतात. ठराविक उंचीवर ही कंपनी नेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. काही वर्षांच्या चांगल्या कामगिरीनंतर कंपनीने एक आत्मविश्वास कमावलेला असतो, त्या आधारे आयपीओमार्फत कंपनीचे शेअर्स सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला जातो. हा पैशांचा ओघ कमावण्यासाठी अनेक कारणे असू शकतात. कर्जाची परतफेड करणे, हे त्यापैकी एक. अनेक उद्योग निधीसाठी बँकेच्या कर्जावर अवलंबून असतात. ठराविक काळ निरंतर कामगिरी केल्यानंतर कर्जाची परतफेड, हे सर्वोच्च प्राधान्य असते. विक्री केलेल्या शेअर्समधून मिळवलेल्या निधीद्वारे कंपन्यांना भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची लवचिकताही मिळते. उदा. आयटी व मॅन्युफॅक्चरिंगसारख्या क्षेत्रात, नवेतंत्रज्ञान व संशोधन, अनुभवी उमेदवार भरती किंवा अद्ययावत सुविधांकरिता पैसा गुंतवणे हे प्रमुख प्राधान्य असते.

कंपन्यांना आधी अंडररायटिंगसाठी एक इन्व्हेस्टमेंट बँक घ्यावी लागते. कारण प्राथमिक शेअर्सची किंमती किती असावी, हे आधी ठरवावी लागते. कंपनीला किती भांडवल उभे करायचे आहे, त्यांची उद्दिष्टे साध्य करण्याससाठी शेअर्सचा किती वाटा विकायचा आहे, याचे मूल्यांकन कराववे लागते. त्याचप्रमाणे कंपन्यांना रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर करावे लागते, ज्यात कंपनीच्या कामगिरीचा एकूण प्रवास, दीर्घकालीन योजना, संबंधित क्षेत्रातील स्थान इत्यादी घटकांद्वारे कंपनीचे 360 अंशातील प्रोफाइल त्यात असते. आयपीओसाठीची मंजूरी आणि इतर लाँचिंग औपचारिकतेवर देखरेख ठेवणाऱ्या नियमाक संस्थांना आरएचपी सादर केले जाते. भारतात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही संस्था संबंधित दस्तऐवजांची पडताळणी करणे तसेच त्यांच्या मंजुरीसाठी प्रक्रिया करण्याचे काम करते. त्यानंतर ती औपचारिकता व प्रमाणीकरणासाठी ते बीएसईसारख्या मार्केट इंडेक्सवर नेले जाते. त्यानंतर आयपीओ सूचीबद्ध होतो आणि प्रथम येणाऱ्या गुंतवणुकदारांनुसार शेअर्सचे वाटप होते.

गुंतवणुकदारांसाठी आयपीओचे फायदे व त्यात गुंतवणुकीपूर्वीचे आवश्यक टप्पे:

गुंतवणूकदारांना सातत्याने बाजारातील घटनांवर लक्ष ठेवणे आणि सर्वाधिक संधी साधण्यासाठी प्रथम क्रमांक लावावा लागतो. सामान्यपणे, शेअर्सच्या किंमती अगदी कमीतकमी मूल्यानुसार ठेवल्या जातात, जे तत्काळ खरेदी करतात, त्यांना अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. सेकेंडरी मार्केटवर ट्रेड झाल्यानंतर शेअरची किंमत बऱ्याचवेळा वाढते.

या प्रक्रियेला अधिक चांगल्या रितीने समजून घेण्याकरिता, ज्या कंपनीचे आयपीओ येत आहेत, ती प्रतिष्ठीत आहे का? ज्या क्षेत्रात ती काम करते, तेथे तिच्या कामाने ओळख मिळवलेली आहे का, हे पहावे लागते. उदा. एखादी फर्म पुढील पिढीतील उत्पादने आणि सेवांद्वारे अर्थव्यवस्थेत नूतनाविष्कार करत असेल, तर वृद्धीचा दृष्टीकोन लक्षात घेता तिच्यावर बेटिंग करणे योग्य आहे. तरीही चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्या अपयशी ठरतात, अशीही उदाहरणे आहेत. अशा स्थितीला तोंड देण्याकरिता गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आरएचपीचे विश्लेषण करण्यासारखे काही विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यानंतरच तुम्हाला कंपनीचे गुण वा दोष कळतात. तसेच कंपनीच्या भविष्याचे योग्य गृहितक मांडता येते. काही उदाहरणांमध्ये कंपनी तत्काळ परतावे देत नाही पण त्याऐवजी ५ ते १० वर्षांच्या दीर्घकाळानुसार स्थिर वृद्धीचा आलेख दर्शवते. अशा ठिकाणी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. त्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते, ज्यांचा वृृद्धीचा रेकॉर्ड तसेच व्यवस्थापन योग्य असेल, ती कंपनी योग्य ठरते. याउलट, कंपनीच्या कामगिरीच्या बातम्यांनुसार लोक चालतात, म्हणून कंपन्यांना प्रतिष्ठा व सन्मान मिळवावा लागतो. मग बँक कर्ज, नवीन गुंतवणूकदार, अधिग्रहण, विलीनीकरण आणि आयपीओद्वारे शेअर्सचा एक भाग विकणे अशा निधीच्या पर्यायांमध्ये कंपन्या वैविध्य आणत असतात. याद्वारे कंपन्यांना ज्यादा वृद्धीचे धोरण अवलंबता येते तसेच अधिक प्रतिभावंतांची भर्ती करता येते.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24