कॅनडातून एमबीबीएसचे शिक्षण असे घेता येईल

 कॅनडातून एमबीबीएसचे शिक्षण असे घेता येईल

भारतातील अनेक विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेऊन सेटल होण्याची इच्छा असते. त्यामुळे ते अनेक देशांतील टॉप विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात. अनेक देशांतील नियम कडक असल्यामुळे त्या देशाचा व्हिजा मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न अर्धवटच राहते. या ब्लॉगमध्ये आम्ही अशाच देशाविषयी सांगणार आहोत, जिथे शिकण्याकरिता सहजपणे व्हिजा मिळतो. हा देश आहे कॅनडा. भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षणासाठी जातात. तेथील शिक्षणाचा खर्चही इतर देशांच्या तुलनेत कमी असतो. भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडातून एमबीबीएसचे शिक्षण असे घेता येईल याबद्दल मार्गदर्शन करता आहेत लीव्हरेज एज्युचे संस्थापक व सीईओ अक्षय चतुर्वेदी


कॅनडातून एमबीबीएस कसे करायचे?
जगभरातून अनेक विद्यार्थी ब्रिटन आणि अमेरिकेत शिक्षणासाठी जातात, मात्र कॅनडातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता येऊ शकते. कॅनडातून एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी ३ ते ४ वर्षे लागतात. तो एमडी प्रोग्रामच्या स्वरुपात असतो. तसेच येथून बीएससी मेडिसिन, बीएमएससी, यूएमई, बायोमेडिकल सायन्समध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्स एमसीडीएस, एमएससी, पीएचडी, सर्जरी, मेडिसिन आणि बायो केमिस्ट्रीत एमडीचा कोर्सदेखील विद्यार्थी पूर्ण करू शकतात. तर अंडर ग्रॅज्युएट डिग्रीसाठी, उमेदवारांना बायोलॉजी किंवा सायन्स विषयात आवश्यक गुणांसह बॅचलर डिग्री असणे अनिवार्य आहे. आयआयईएलटीएस, टीओईएफएल यासारख्या इंग्रजी भाषेतील प्रोफिशिएन्सी टेस्ट पास करण्यासाठी यात अधिक गुणांची गरज आहे. तसेच कॅनडात एमबीबीएस किंवा इतर एखाद्या मेडिकल कोर्ससाठी तुम्ही कॅनडियन विद्यापीठाकडून मिळणाऱ्या प्रायव्हेट स्कॉलरशिपचा लाभही घेऊ शकता. या सर्व स्कॉलरशिप मेरिट बेसिसवर कोणत्याही विद्यार्थ्याला घेता येऊ शकतात. येथे मिळणाऱ्या स्कॉलरशिप- वानियर कॅनडा ग्रॅज्युएट स्कॉलरशिप, ओंटारियो ग्रॅज्युएट स्कॉलरशिप, कॅनडियन रोड्स स्कॉलर्स फाउंडेशन स्कॉलरशिप, डॉ. जॉन ई ब्रॅडली स्कॉलरशिप, क्वीन्स एस्डेल मेमोरियल स्कॉलरशिप (केवळ महिलांसाठी) या विद्यापीठातून मिळवता येतात. कॅनडातून एमबीबीएस करण्यासाठीचे शुल्क जवळपास दरवर्षी २६,०००सीएडी ते ९६,००० सीएडी [६८,८१०, ००० ते २१०, ०४४, ७०० भारतीय रुपये ] एवढे असते. कॅनडातून मिळणारी डिग्री जगभरात मान्यताप्राप्त डिग्री असते.


कॅनडतील टॉप विद्यापीठे पुढीलप्रमाणे आहेत:
यूनिव्हर्सिटी ऑफ शेर ब्रूक, क्वीन्स यूनिव्हर्सिटी, मॅकमास्टर यूनिव्हर्सिटी, यूनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, मॅकगिल यूनिव्हर्सिटी, मेमोरियल यूनिव्हर्सिटी ऑफ न्यूफाउंडलँड.

 १२ वीनंतर एमबीबीएस:
तुम्हीही १२ वीनंतर एमबीबीएस करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी कॅनडातून ग्रॅज्युएशनची डिग्री घेण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो. कॅनडातून एमबीबीएसची  डिग्री घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट असणे अनिवार्य आहे. त्यासाठी विद्यार्थी १२ वीनंतर कॅनडातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवू शकतात. त्यानंतर विद्यार्थी कॅनडातील टॉप विद्यापीठातून एमबीबीएस म्हणजेच एमडीचे शिक्षण पूर्ण करू शकतात.

 
अर्ज कसा करायचा?

कॅनडातून एमबीबीएस करण्यासाठी किंवा कोणत्याही इतर मेडिकल प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी विद्यापीठांचे वेगवेगळे नियम असू शकतात. मात्र सर्वप्रथम आपल्या आवडीचे मेडिकल कॉलेज किंवा विद्यापीठाची निवड करावी लागेल. त्यानंतर विद्यापीठाने दिलेली पात्र तपासावी लागेल. तुम्ही परदेशात शिक्षण घ्यायला जाता, तेव्हा तेथे बोलल्या जाणाऱ्या भाषेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून प्रोशिशिएन्सी टेस्ट द्यावी लागते. यासाठी तुम्हाला लीव्हरेज एज्यु मदत करेल. नीट आणि एम-कॅट परीक्षा पास होण्यासाठी लीव्हरेज एज्यु तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करू शकते. कॅनडामध्ये आवडता प्रोग्राम सहजपणे निवडण्यासाठी लीव्हरेज एज्यु तुम्हाला सर्व प्रकारे मदत करेन. तर तुमच्या करिअरची उंच झेप घेण्यासाठी लीव्हरेज एज्युच्या माध्यमातून आमच्या बेस्ट एक्सपर्टचे मार्गदर्शन मिळवा. यासोबतच तुम्ही विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्ही लीव्हरेज एज्युशी संपर्क साधू शकता. लीव्हरेज एज्युचे बेस्ट एक्सपर्ट्स तुम्हाला सर्व प्रकारे मदत करतील.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App