२०२० या वर्षाने दिली वित्तीय नियोजनाची महत्त्वाची शिकवण

 २०२० या वर्षाने दिली वित्तीय नियोजनाची महत्त्वाची शिकवण


सध्या भारतातील इक्विटी गुंतवणूकदारांचा आलेखही वाढत आहे. टीअर २ आणि टीअर ३ शहरांमधील गुंतवणूकदारांच्या अनेक वर्षांपासूनच्या जागृतीनंतर, जास्तीत जास्त गुंतवणूकदार व ट्रेडर्स या खेळाकडे झेपावत आहेत. स्वाभाविकच, तंत्रज्ञान त्यांच्या हातासरशी उपलब्ध (एआय आधारीत गुंतवणूक इंजिन्स आणि यासह मोबाइल ट्रेडिंगद्वारे) आहे. असे असले तरीही, शेअर बाजार हा गणितीय जोखीम व नफा यावर आधारीत खेळ आहे. २०२० हे वर्ष कसे बदलले व सगळी समीकरणे कशी बदलली? हे पाहताना २०२० या वर्षातून मिळालेल्या धड्यांकडेही लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून २०२१ या नव्या वर्षातील नवी सुरुवात अधिक उत्कृष्ट करता येईल असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मिड कॅप्स एव्हीपी श्री अमरजीत मौर्य यांनी व्यक्त केले.

तपशीलांकडे लक्ष द्या- धोके अनेकदा अदृश्य असतात: एखादी गोष्ट दिसतही नाही, पण तिचा बाजारावर असा काही प्रभाव पडतो, हा एक विरोधाभास आहे. पण नियमितपणे गुंतवणूक करणाऱ्यांना हे पटणार नाही. त्यांना माहिती आहे. कोरोना विषाणूसारखी अनेक संकटे बाजारात दिसतही नाहीत, पण हे पाहण्यासाठी विशेष दृष्टी असली पाहिजे. अन्यथा, ते फक्त सामान्य स्थिती राखून ठेवतात. उदा. २००८ मध्ये लेहमन ब्रदर्सच्या घटनेनंतरची घसरण कुणालाही अपेक्षित नव्हती. पण ती घडली. पण फक्त मायकेल ब्युरी, फ्रंटपॉइंट पार्टनर्स, ब्राउनफील्ड कॅपिटल आणि यासारख्या काहींना ती दिसली, कारण त्यांनी खूप बारकाईने याकडे लक्ष दिले.

प्रभावी पुनर्संतुलन: २०२० हे वर्ष जागतिक गुंतवणूकदारांना सजग करणारे ठरले. केवळ मोजके रिटर्न्स देणाऱ्या पर्यायांऐवजी गुंतवणुकीकडे वळले पाहिजे, हा धडा मिळाला. त्यामुळेच, तुम्हालाही सक्रीयरित्या तुमचा पोर्टफोलिओ संतुलित करावा लागेल. यासाठी गुंतवणुकदाराने बाजारातील घडामोडींबाबत नेहमीच विवेकी निर्णय घेण्याची गरज असते. अगदी पराकोटीच्या अस्थिरतेदरम्यान गुंतवणूक काढण्याची गरजही भासू शकते. पण अखेरीस एक शिवण इतर धाग्यांना वाचवतेच.

वित्तीय योजना बदलू शकतात, पण वित्तीय ध्येय नव्हे: तुमच्यासमोर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे असतात आणि ती साध्य करण्यासाठी अल्पकालीन योजना. काही वेळा बाजारातील घटनांच्या मालिकेमुळे आर्थिक नियोजन बदलू शकते. तरीही तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर परिणाम व्हायला नको. पण हे कसे करणार? पोर्टफोलिओची गुंतवणूक हा काही जुगारावर चालणारा खेळ नाही. तो बाजाराची कामगिरी, अपेक्षित मागणी आणि तंत्रज्ञान व अंतर्दृष्टी देणाऱ्या इतर अनेक घटकांवर आधारीत असतो. तुम्हाला त्यांचा अंदाज आलाच पाहिजे.

साथीच्या आजारामुळे फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर उत्पादनांची मागणी वाढेल हे स्वाभाविकच होते. त्यामुळे रुग्ण वाढू लागले, भारतात लॉकडाऊन झाले, तेव्हा निफ्टी फार्मा इंडेक्स आणि एसअँडपी बीएसई हेल्थकेअर हे क्षेत्र जवळपास दुपटीने वाढले. नोटाबंदीनंतर रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांना त्रास सहन करावा लागला तर बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. थोडक्यात सांगायचे झाल्यास, घसरणीच्या काळात बाजारात नेहमीच संधी दडलेली असते. तुम्ही फक्त योग्य दिशेने पहायला हवे.

तुमचा पोर्टफोलिओ समजून घ्या: २०२० मध्ये, भारतातील मोठ्या फंड व्यवस्थापकांपैकी एक असलेल्या फ्रँकलिन टेम्पलटन यांनी ६ फंड्स स्थगित केले. या फंडांमुळे जवळपास २८,००० कोटी रुपयांचे एयुएम दिवाळखोरीत निघाले. असे घडण्यामागील प्रमुख कारण म्हणजे, ते येस कॅपिटलने जारी केलेल्या झिरो कूपन डिबेंचर्सवर विसंबून होते. येस कॅपिटल ही येस बँक लिमिटेडची उपकंपनी आहे. फ्रँकलिन टेंपलटन यांनी हे फंड्स बंद करण्याआधी, या कंपनीतील गैरव्यवहारांची बातमी आली होती. दिवाळखोरीत गेलेल्या ६ पैकी ५ फंड्सवर येस बँकेच्या प्रमोटर्सना कर्ज दिले गेले. म्हणूनच, भविष्यातील नुकसान कमी करण्यासाठी आपला पोर्टफोलिओ जास्तीत जास्त समजून घेणे महत्त्वाचे आहे.

तात्पर्य असे की, २०२० या वर्षाने गुंतवणुकदारांना पुन्हा एकदा वित्तीय नियोजन करण्याचा चांगलाच धडा दिला आहे. यामुळे नियमितपणे गुंतवणूक करणारे आणि नवीन गुंतवणूकदार या दोघांचाही पाया मजबूत होईल. नव्या सुरुवातींची हीच खरी वेळ आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth