गोदरेज अप्लायन्सेसने सुरु केले २९ वे गोदरेज दिशा एक्सेलेन्स सेंटर

 गोदरेज अप्लायन्सेसने सुरु केले २९ वे गोदरेज दिशा एक्सेलेन्स सेंटर

युवा सक्षमीकरणाबद्दलची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी ब्रँडने उचलले पुढचे पाऊल
~२०२० पर्यंत गोदरेज अप्लायन्सेसने भारतभरातील ६५००० पेक्षा जास्त युवकांना रोजगारयोग्य कौशल्यांचे प्रशिक्षण दिले आहे



१२ मार्च, २०२१:  गोदरेज ग्रुपमधील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने आपले बिझनेस युनिट व घरगुती उपकरणांची भारतातील आघाडीची कंपनी गोदरेज अप्लायन्सेसने तांत्रिक प्रशिक्षणासाठीचे आपले २९वे एक्सेलेन्स सेंटर मॉन्टफोर्ट अकॅडेमीच्या सहयोगाने गोव्यामध्ये सुरु केल्याची घोषणा केली आहे.  युवकांना दर्जेदार तांत्रिक कौशल्ये आणि रोजगाराभिमुख व्यापारांचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण युवकांना सक्षम करण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी ब्रॅंडने हे पाऊल उचलले आहे.  ‘गोदरेज दिशा’ या व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमांतर्गत एक्सेलेन्स सेंटर सुरु करण्यात आले आहे.  सरकारच्या राष्ट्रीय कौशल विकास अभियानाला अनुसरून भारतातील वंचित वर्गातील युवकांना कुशल रोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे या उपक्रमाचे उद्धिष्ट आहे.

मॉन्टफोर्ट अकॅडेमी ही प्रमुख शैक्षणिक संस्था गेली २३ वर्षे उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. नव्या सेंटरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, गोव्यातील वंचित समुदायांमधील युवक आणि गोदरेज अप्लायन्सेसच्या एएसपी टेक्निशियन्ससाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील.  हे प्रशिक्षण कार्यक्रम १५ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंतचे असतील.  रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव ओव्हन आणि एअर कंडिशनर दुरुस्तीची माहिती करवून देण्याच्या दृष्टीने त्यांची रचना करण्यात आली आहे.

गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. प्रमोद जी सावंत यांच्या हस्ते नवीन एक्सेलेन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी गोदरेज अप्लायन्सेसचे रिजनल सर्व्हिस मॅनेजर श्री. ग्रेगरी के पॉलोज व मॉन्टफोर्ट अकॅडेमीचे प्रोव्हिन्शियल सुपरवायजर फर. रोलँड कोएल्हो एसजे उपस्थित होते.  प्रशिक्षणाचा कन्टेन्ट आणि अभ्यासक्रम यांच्या व्यतिरिक्त एक्सेलेन्स सेंटरला गोदरेज अप्लायन्सेसकडून साधने, उपकरणे, सुटे भाग आणि उपकरणे या स्वरूपात देखील सहयोग पुरवला जाईल.

इंडिया स्किल रिपोर्ट २०२१ नुसार भारतात युवकांची रोजगारक्षमता २०१९ मध्ये ४७.३८% ते २०२१ मध्ये ४५.९% इतकी कमी झाली आहे.  २०१९ च्या आयएसआरमध्ये दर्शवण्यात आले आहे की आयटीआय पदवीधारकांपैकी फक्त २९.४६% जण रोजगारक्षम आहेत.  ‘गोदरेज दिशा’मार्फत नामांकित प्रशिक्षण संस्थांच्या सहयोगाने उच्च दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कौशल्यांमधील कमतरता भरून काढण्यासाठी गोदरेज अप्लायन्सेस प्रयत्नशील आहे.  वंचित स्तरातील युवकांना अप्लायन्स सर्व्हिस टेक्निशियन्स म्हणून रोजगारक्षम बनवणे हा गोदरेज अप्लायन्सेसचा उद्देश आहे.

यावेळी गोदरेज अप्लायन्सेसचे सर्व्हिस विभागाचे नॅशनल हेड श्री. रवी भट म्हणाले, "आपल्या उद्योगक्षेत्रात तंत्रज्ञानात लक्षणीय बदल होत आहेत आणि ग्राहकांच्या अपेक्षा सातत्याने वाढत आहेत.  त्यामुळे कुशल तंत्रज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल. महामारीमुळे गेल्या वर्षी देशभरात रोजगार संधींवर खूप परिणाम झाला आहे. सामाजिक जबाबदारीचे पुरेपूर भान असलेले कॉर्पोरेट या नात्याने आम्ही हे संलग्न कार्यक्रम सुरु केले आहेत, रोजगारक्षमता निर्माण करणे आणि उमेदवारांमध्ये उद्यमशीलतेचा अंतर्भाव होण्यात मदत करण्यावर यामध्ये भर दिला जातो.  २०२० पर्यंत आम्ही अप्लायन्स उद्योगक्षेत्राला ६५००० पेक्षा जास्त कुशल युवक देण्याची कामगिरी यशस्वीरीत्या बजावली आहे.  आमच्या ‘दिशा’ उपक्रमाच्या माध्यमातून वंचित वर्गातील युवकांवर भर देत रोजगारक्षमतेतील कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो."  

मॉन्टफोर्ट अकॅडेमीचे प्रोव्हिन्शियल सुपरवायजर फर. रोलँड कोएल्हो एसजे यांनी सांगितले, "युवकांना रोजगारक्षम बनवण्यात मदत करतील अशा कौशल्यांनी युवकांना सक्षम बनवणे आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचे आणि निकडीचे आहे.  गोदरेजसारख्या विश्वसनीय ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळणे ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.  आमच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त या भागीदारीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या वंचित युवकांना खूप लाभ मिळतील आणि त्यांना उद्योगक्षेत्राशी संबंधित कौशल्ये संपादन करून सक्षम होता येईल, यामुळे रोजगार, उद्यमशीलता व सामुदायिक उद्यम निर्माण होतील."

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth