देशाला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या मोठ्या बंदरांची गरज


 

देशाला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या मोठ्या बंदरांची गरज

जेएनपीटी ने अधोरेखित केले महत्त्व

 

- 'मेरीटाइम इंडिया समिट 2021' मुळे भारतीय बंदरांना मिळणार आंतरराष्ट्रीय सहकार्य -

 

मुंबई, 04 मार्च, 2021: तीन दिवस चाललेल्यामेरीटाइम इंडिया समिट 2021’ चा समारोप मोठ्या उत्साहात सागरी क्षेत्रासाठी विकासाच्या नवीन आशा आणि गुंतवाणुकीच्या विपुल संधींसह काल झाला. जगातील अग्रगण्य ब्लू इकॉनॉमी बनण्याचे भारताचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी या शिखर सम्मेलनात विविध सामंजस्य करार करण्यात आले आणि गुंतवणूकीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या.

शिखर सम्मेलनाच्या पहिल्या दिवशी, भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. यांनी जागतिक दर्जाच्या बंदरांचा विकास  या विषयावरील पहिल्या सत्राचे संयोजन केले. सागरी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधीचे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने या शिखर सम्मेलनाचे आयोजित करण्यात आले होते. हे शिखर सम्मेलन भारतीय आंतरराष्ट्रीय बंदरे, जहाज वाहतूक सागरी कंपन्या, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांदरम्यान संवाद सहकार्या स्थापित करण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त व्यासपीठ ठरले. अशा प्रकारचे सम्मेलन आयोजित केल्याने जागतिक सागरी उद्योग क्षेत्रात  भारतास अग्रस्थानी नेण्यास प्रवृत्त केले. एमआयएस 2021 मुळे भारतीय बंदरांना आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असे व्यासपीठ उपलब्ध झाले भागीदार देशांना या क्षेत्रातील माहिती गुंतवणुकीच्या संधींचे आदान-प्रदान करण्यास मदत झाली.

जेएनपीटी चे अध्यक्ष श्री.संजय सेठी, भा.प्र.से. यांनी या सम्मेलनामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या मोठ्या बंदरांच्या विकासाचे महत्त्व, ‘इझ ऑफ डुईंग बिझिनेसमध्ये सुधारणा करण्यासाठी स्मार्ट बंदरांचा विकास आणि बंदरे टर्मिनल्सच्या डिजिटलायझेशनचा प्रभावया विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी आगामी काळात सागरी उद्योगाचा विकास कशा रीतिने होईल - सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी परिसंस्था (इकोसिस्टम) विकसित करने त्यासाठी धोरणनिश्चिति रणनीती आखण्याचे महत्त्व - याविषयी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. तसेच श्री सेठी यांनी बंदरे टर्मिनल्सच्या डिजिटायझेशनचा प्रभाव - एआय., आयओटी, 5 जी तंत्रज्ञानामुळे होणारे परिवर्तन आणि बंदर विकासाचे नवीन मॉडेल्स : पीपीपी आणि लँडलॉर्ड विषयी सुद्धा विस्तृत चर्चा केली.

जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. ‘बंदर आधारित औद्योगिकीकरण : पोर्ट सिटी आणि मेरीटाईम क्लस्टर्सचा विकासया विषयावरील पाचव्या सत्राचे देखील संयोजक होते. या सत्रात त्यांनी औद्योगिकीकरणासाठी पोर्ट ईकोसिस्टमचा लाभ, मेट्रोपॉलिटन पोर्ट डेव्हलपमेंटमध्ये पोर्ट सिटीच्या संक्रमण प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या अर्थव्यवस्थेत सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे महत्त्व भारतास लाभलेल्या नैसर्गिक सागरी किना-याचा लाभ घेण्याच्या दृष्टीने भारत सरकारनेसागरमाला प्रकल्पाची योजना तयार केली असून केंद्र सरकारबंदरआधारित औद्योगिकीकरणासचालना देत आहे.

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. I want to thank you for providing me with the information.
    Your articles are always so thoughtful.
    It always tells me about new things.
    Thanks a lot.
    Check the link given below
    b.tech college in Sitamarhi

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24