एगॉन लाईफ इन्शुरन्स’च्या वतीने एगॉन लाईफ सरल जीवन विमा – ऑनलाईन, सुलभ आणि लवचीक मुदत विमा योजना सादर

एगॉन लाईफ इन्शुरन्स’च्या वतीने एगॉन लाईफ सरल जीवन विमा – ऑनलाईन, सुलभ आणि लवचीक मुदत विमा योजना सादर

 

एगॉन लाईफ सरल जीवन विम्याचे मुख्य लाभ:

  1. ऑनलाईन टर्म इन्शुरन्स प्लान (मुदत विमा योजना) समजून घेण्याची सुलभ आणि सोप पद्धत.
  2. पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकासह सर्वांना साजेसा.
  3. निवडक प्रोफाईलकरिता उत्पन्न पुरावा आणि वैद्यकीय चाचण्यांची आवश्यकता नाही*.
  4. पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू ओढवल्यास एखाद्याच्या कुटुंबाला वित्तीय सुरक्षा उपलब्ध.
  5. ग्राहकांच्या गरजांनुरूप अतितीक्त लाभ, पॉलिसी मुदत तसेच प्रीमियम पेमेंटची मुदत निवडण्याची लवचिकता.

 

मुंबई, 02 मार्च 2021: एगॉन इन्शुरन्स हा अग्रगण्य डिजीटल जीवन विमा पुरवठादार असून त्यांच्यावतीने नवीन विमा उत्पादन – एगॉन लाईफ सरल जीवन विमा (प्रमाणित सुलभ मुदत विमा योजना) ची घोषणा करण्यात आली. या उत्पादनामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पॉलिसीची निवड करण्याची लवचिकता उपलब्ध राहील. या ऑनलाईन पॉलिसीच्या आधारे ग्राहकांना किमान वित्तीय तसेच वैद्यकीय आवश्यकतांसह गुंतागुंत-मुक्त प्रोसेसिंगचा लाभ घेता येईल.

एगॉन लाईफ सरल जीवन विमा ही सोपी विमा पॉलिसी असून पॉलिसीधारकाचा मृत्यू ओढावल्यास नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजे नॉमिनीला निश्चित रक्कम उपलब्ध करून देते. 18 ते 65 वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीला रुपये 5 लाख ते रुपये 25 लाखांपर्यंतचा विमा 5 ते 40 वर्षांपर्यंत काढता येईल.

एगॉन लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ सतीश्वर बालकृष्णन म्हणाले की, “सरल जीवन प्रमाणित कवच आणि किफायतशीर प्रीमियम उपलब्ध करून देते, हे आयआरडीएआयने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे विमा केवळ खोलवर रुजण्यास मदत होणार नाही, तर डिजीटल मंचांवर त्याची उपलब्धता ऑनलाईन इन्शुरन्स खरेदी सुलभ, पारदर्शक आणि गुंतागुंत-मुक्त करण्यास साह्यकारी ठरेल.”

 

पुढे माहिती देताना ते म्हणाले की, “जीवन विमा उत्पादन ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने या डिजीटयजेशनसह आमची क्षमता आणि आमचा अनुभवासमवेत हे उत्पादन डिजीटल मंचावर पुढे करता येईल. एकसमान शब्द आणि प्रमाणित वैशिष्ट्ये विमा खरेदी दरम्यान होणारी गुंतागुंत आणि गोंधळाची स्थिती कमी करेल. त्यामुळे ज्यांना अपप्रसंगात आपल्या जीवलगांचे आयुष्य सुरक्षित करू इच्छिणाऱ्या तसेच पहिल्यांदा विमा खरेदी करणाऱ्यांच्या दृष्टीने हे उत्पादन साजेसे ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.