अमेरिकी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टींकडे द्या लक्ष

 


अमेरिकी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टींकडे द्या लक्ष

अमेरिका हे जागतिक वित्तीय केंद्र आणि नव्या काळातील नूतनाविष्कारांचे केंद्र आहे. अमेरिका आणि बाजारातील दररोजच्या घडामोडींमुळे वस्तूंच्या किंमती, निर्मितीनंतरचे उत्पादन, जगभरातील व्यापारावर परिणाम होत असतो. यामुळेच, जगभरातील गुंतवणुकदारांचे याकडे लक्ष लागलेले असते. अमेरिकी मार्केटमधील गुंतवणुक करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.

अमेरिकी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष असावे?

अमेरिकी स्टॉक्समध्ये गुंतवणूकीची संधी जगभरातील इतर गुंतवणूकदारांसाठीही खुली आहे. अमेरिकी बाजारपेठेवर लिस्टेड अनेक कंपन्या या प्रमुख जागतिक कंपन्या असून त्यांचे प्रादेशिक कार्य आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियासारख्या भागात चालते. म्हणूनच, मुख्यालयातील निर्णयामुळे जगाच्या इतर भागातील कामकाजावर परिणाम होतो हे लक्षात येते. अमेरिकी बाजारातील शेअर्स किफायतशीर असतात का याबद्दल भारतीय गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असतो. प्रमुख अमेरिकी कंपन्या भारतीय गुंतवणुकदारांमध्ये रस दर्शवतात, परंतु त्यांच्या उच्च शेअर मूल्यामुळे भारतीय गुंतवणूकदार या स्टॉकवर बेटिंग करत नाहीत. मात्र अनेक वित्तीय संस्था आणि ब्रोकरेज फर्म्स असे पर्याय उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्यामार्फत अमेरिकी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करता येते. भारतीय गुंतवणुकदारांवर उच्च किंमतीचा बोजा राहत नाही. यात फ्रॅक्शनल ट्रेडिंग करता येते.

अनेक भारतीय वित्तीय सेवा प्रदाते गुंतवणुकदारांसाठी अमेरिकेत ब्रोकरेज खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. तसेच ईटीएफ आणि विशेषत: अमेरिकी इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक रुपयांमध्ये करता येते. अशा प्रकारच्या पर्यायामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओ वैविध्यीकरणाच्या धोरणावर पुन्हा एकदा विचार करता येईल. सुदैवाने, डिजिटायझेशनमुळे गुंतवणूक सोपी झाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूक अधिक सोपी व वेगवान झाली आहे.

फ्रॅक्शनल ट्रेडिंग आणि अमेरिकी बाजारात गुंतवणूक करण्याचे फायदे:

ही संकल्पना नवी नाही, मात्र सध्याच्या काळातच तिला लोकप्रियता मिळाली आहे. याद्वारे लोकांना अगदी १ डॉलर एवढी सोपी गुंतवणूक करता येते, जी शेअरच्या एका लहान भागाएवढी असते आणि गुंतवणूक केलेल्या रकमेनुसार परतावा मिळतो. नेहमीच दिग्गज कंपनीचे शेअर्स वेगाने वाढतात आणि गुंतवणूक रकमेनुसार तसे परतावेही मिळतात. लिबराइज्ड रेमिटन्स स्कीमद्वारे  आरबीआयमार्फत यावर नियमांच्या मर्यादा घातलेल्या आहेत. ज्याद्वारे देशातील स्टॉकमार्केटमधून विदेशात जाणाऱ्या एकूण गुंतवणुकीवर मर्यादा घातल्या जातात. सध्या या गुंतवणुकीची मर्यादा प्रति वर्ष २५०,००० डॉलर एवढी असून सामान्य भारतीय गुंतवणूकदारांना अमेरिकी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी खूप मोठी आहे.

अमेरिका आणि भारतीय निर्देशांकांच्या तुलनात्मक विश्लेषणाद्वारे अमेरिकी बाजारात गुंतवणूक करणे का फायदेशीर आहे, हे कळते. डो जोन्स आणि बीएसई सेन्सेक्सची मागील दशकातील कामगिरी पाहिली तर, या दोहोंनी दिलेल्या परताव्यांचे स्पष्ट चित्र दिसेल. डो जोन्सने १९६% तर बीएसई सेन्सेक्सने १५०% रिटर्न २०१० व २०२० या १० वर्षांच्या कार्यकाळात दिले.

डॉलर विरुद्ध रुपया : चलनाची गती व अंदाज:

अमेरिकी स्टॉक्सचा व्यापार डॉलर्समध्ये होते, त्यामुळे डॉलर्सचे मूल्य वाढल्यास गुंतवणूकीला अधिक मौल्यवान परतावा मिळतो. तसेच अमेरिकी डॉलर विरुद्ध भारतीय रुपयाच्या चलनातील फरक पाहिल्यास, मागील १० वर्षांमध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ४५% नी घसरल्याचे दिसते. यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांचे भवितव्य अमेरिकी बाजारावर अवलंबून आहे. यामुळे कॉर्पोरेशन्सचे भवितव्य नेमके काय असेल, याचाही आपल्याला एक अंदाज येतो.

देशांतर्गत बाजाराव्यतिरिक्त वैविध्यीकरण विस्तारल्यास, गुंतवणूकदारांना जोखिमांचेही संतुलन साधता येते. अमेरिकी बाजारात अनेक चांगल्या संधी आहेत. त्या तुलनेत बाजारातील अस्थिरता कमी असते, उच्च परतावा, जागतिक बाजारपेठेत प्रवेश अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे जगातील महान आणि परिपक्व अर्थव्यवस्थांमध्ये सहभागी होण्याकरिता गुंतवणूकदारांनी लक्ष घातले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24