‘मर्सिडीज बेंझ’तर्फे आणखी नवीन उत्पादनांची भर

 

मर्सिडीज बेंझतर्फे आणखी नवीन उत्पादनांची भर :
ए-क्लास लिमोझीनचे सादरीकरण; तसेच स्थानिक पातळीवर उत्पादित एएमजीमधील – एएमजी ए 35 4मॅटिकची निर्मितीपुणे : भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माता कंपनी, ‘मर्सिडीज बेंझहिने बहुप्रतीक्षित ए-क्लास लिमोझीआज भारतीय बाजारपेठेत आणून, लिमोझीन पोर्टफोलिओची नव्याने व्याख्या केली आणि संपूर्ण उद्योगासाठी नवीन मानांकन उभे केले. ऑल-न्यू ए-क्लास लिमोझही तिच्या श्रेणीतील सर्वात लांब आणि सर्वात उंच गाडी आहे. अत्यंत स्पोर्टी आणि उच्च पातळीवरील वैशिष्ट्यांसह सज्ज, तसेच नवीनतम तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या नवीन ए-क्लासने मर्सिडीज-बेंझच्या लिमोझश्रेणीमध्ये आणखी बळकटी आणली आहे. याव्यतिरिक्त, ‘मर्सिडीज-बेंझने मर्सिडीज-एएमजी ए35 4मॅटिक सादर केली आहे; त्यायोगे वाहन चालविण्याची मजा आणि एएमजीशी संबंधित चैतन्यदायी अनुभवाची जोड दिली जाते,  त्याच वेळी दररोज ही गाडी वापरण्याची व्यावहारिकतादेखील मिळते.

पुण्याजवळील चाकण येथील अत्याधुनिक कारखान्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेन्क आणि कार्यकारी संचालक पीयूष अरोरा यांच्या उपस्थितीत ही दोन्ही बहुप्रतीक्षित मॉडेल्स खास भारतीय बाजारपेठेसाठी सादर करण्यात आली.

ही महत्त्वपूर्ण उत्पादने सादर करण्याविषयी मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेन्क म्हणाले, “भारतीय बाजारपेठेला बहुप्रतक्षित ए-क्लास लिमोझीनची ओळख करून देण्यात आम्हाला आनंद आहे. मर्सिडीज-बेंझ उत्पादनासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व गोष्टी ए-क्लास लिमोझिनआत्मसात करते आणि नवीन पिढीच्या भारतीय ग्राहकांना त्यांच्याप्रमाणेचअशी कार देण्याचे आश्वासन देते. ए-क्लास लिमोच्या माध्यमातून आम्ही आजच्या तरूण आणि यशस्वी लक्झरी कार ग्राहकांना एक अतिशय स्टाइलिश आणि स्पोर्टी कार ऑफर करीत आहोत, जी अत्यंत आरामदायक, तंत्रज्ञानाने समृद्ध असलेली, या उद्योगात प्रथमच इंजिन व ट्रान्समिशनवर 8 वर्षांची वॉरंटी असलेली, अत्यंत व्यावहारिक आणि त्रास-मुक्त मालकीचा अनुभव देते. ए-क्लास लिमो या सेगमेंटमध्ये एक नवीन मानांकन स्थापित करील आणि अनेक नवीन ग्राहकांना थ्री-पॉईंटेड स्टारकडे आकर्षित करील, असा आम्हाला विश्वास आहे."

भारतीय बाजारपेठेसाठी एएमजी ए35 4मॅटिकच्या माध्यमातून प्रथमच एएमजी 35 मालिकेतील गाड्या सादर करण्यात आम्हाला तितकाच आनंद आहे. आमच्या कारखान्यात स्थानिक पातळीवर उत्पादन होत असलेले हे दुसरे एएमजी मॉडेल आहे. या मॉडेलच्या माध्यमातून आम्ही भारतात एएमजी ब्रँड वाढविण्यावर आणि एएमजी ग्राहकांशी दीर्घकालीन कटिबद्धता राखण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. भारतात आम्ही सादर केलेल्या एकंदरीत सर्व उत्पादनांमध्ये एएमजीने आणखी मोठी भूमिका बजावावी, अशी आमची इच्छा आहे. या वर्र्भरात सात नवीन एएमजी सादर करण्याचे आमचे नियोजन आहे. भारतातील परफॉर्मिंग मोटरींगच्या क्षेत्रात आपले ठाम नेतृत्व टिकवून ठेवण्याबाबत आम्ही ठाम आहोत, असेही श्वेन्क यांनी यावेळी सांगितले.

भारतातील परफॉर्मिंग मोटरिंगशी एएमजी ब्रॅंड अगदी एकरुप झाला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. कंपनीने स्थानिक पातळीवर भारतात एएमजीचे दुसरे मॉडेल तयार करण्याचा निर्णय घेतला, त्यामागे भारतीय बाजारपेठेसाठी मर्सिडीज बेंझचा स्पष्ट आराखडा आणि भारतीय ग्राहकांसाठी कंपनीची दीर्घकालीन रणनीतिक बांधिलकी या गोष्टी अधोरेखित होतात.

एएमजी ए35 4एमचे उत्पादन स्थानिक पातळीवर करण्याविषयी मर्सिडीज-बेंझ इंडियाचे ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक पीयूष अरोरा म्हणाले, “स्थानिक पातळीवर आम्ही एएमजी मॉडेल बनविले आणि ते आता ट्रेंडसेटर बनले आहे. या मॉडेलला बाजारपेठेचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याने एएमजी ए35 4मॅटिकच्या रुपाने भारतात एएमजीचे दुसरे मॉडेल उत्पादीत करण्यात आम्ही उत्साही आहोत. भारतातील आमच्या व्यावसायिक प्रवासात हे उत्पादन हा एक मैलाचा दगड आहे आणि यामुळे भारतीय बाजारपेठेबद्दलची आमची वचनबद्धता आणखीनच वाढली आहे. एएमजी ए 35 4मॅटिकचे उत्पादन येथे करण्याच्या निर्णयामुळे, गेल्या अडीच दशकांमध्ये विकसित झालेल्या उत्पपादन क्षेत्रातील आमचा पराक्रम आणि नाविन्यता यांचा जोरदार पुनरुच्चार होत आहे. आमच्या भारतीय ग्राहकांना स्थानिक उद्योग मूल्ये असलेली जागतिक स्तरीय उत्पादने कमीतकमी वेळेत ऑफर करता आल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. हा एक नवीन मापदंड तयार झाला आहे.

ए-क्लास लिमोझीन ग्राहक प्रोफाइल आणि ‘# जस्टलाइकयू मोहीम :

ऑल-न्यू ए-क्लास लिमोझीनमध्ये स्टाईल आणि कामगिरी यांचे मिश्रण एका अनोख्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. सर्वोत्तम आणि अंगभूत अशी कनेक्टिव्हिटीची वैशिष्ट्ये, रोमांचक आणि स्पोर्टी कामगिरी, लक्झरी वैशिष्ट्ये आणि स्पोर्टी लूक हे सर्वकाही या गाडीमध्ये मिळते. लक्झरी राहणीमान असलेल्या एखाद्या यशस्वी भारतीय तरुणाला, लक्झरी गो।टींची आवड असणाऱ्या एखाद्या महत्त्वाकांक्षी व्यावसायिकाला किंवा लक्झरीपणा व व्यावहरिकतेशी कोणतीही तडजोड न करता एखादी गतिमान कार हवी असणाऱ्या उत्साही व्यक्तीला आवडेल, अशीच ही ए-क्लास लिमोझीन कार आहे. ए-क्लास लिमोझीन इतकी अष्टपैलू आहे की ती एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब बनू शकते; एक प्रकारे ती #जस्टलाइकयू होते.

मर्सिडीज-बेंझ इंडियाने प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडियावर ‘#जस्टलाइकयूनावाची, संपूर्ण दर्शन घडविणारी, एक नाविन्यपूर्ण एकात्मिक मार्केटिंग मोहीमदेखील सुरू केली असून, मर्सिडिज बेंझकडच्या या नव्या गाडीबद्दलची उत्सुकता निर्माण करण्याचे काम या मोहिमेतून झाले आहे.

या उद्योगात प्रथमच देण्यात येणारी 8 वर्षांची / इंजिन व ट्रान्समिशनवर अमर्यादीत किलोमीटरची विस्तारित हमी :

नवीन ए-क्लास सादर करताना, मर्सिडीज-बेंझ कंपनीने या उद्योगातील पहिलीच अशी 8 वर्षापर्यंतची किंवा इंजिन व ट्रान्समिशनसाठीची अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी ऑफर केली आहे. संपूर्ण वाहनाची 3 वर्षांपर्यंतची किंवा अमर्यादित किमीची स्टॅंडर्ड वॉरंटी देण्यात येत असून तीदेखील या श्रेणीतील गाड्यांमध्ये प्रथमच देण्यात आली आहे.

·         या वॉरंटीमध्ये इंजिनाची दुरुस्ती, स्टार्टर मोटर, अल्टरनेटर, टर्बो चार्जर, ईसीयू, ट्रान्समिशन, टॉर्क कन्व्हर्टर आणि टीसीयू या गोष्टींचा समावेश आहे.

·         ही भारतातील सर्व वितरकांकडे वैध असेल आणि गाडीच्या पुढील मालकास ती पूर्णपणे हस्तांतरणीय करता येईल.

·         इंजिन आणि ट्रान्समिशनची 8 वर्षांची वाढीव हमी ही ए-क्लास लिमोझीन ग्राहकांसाठी सर्वाधिक अवशिष्ट मूल्य सुनिश्चित करेल.

 

ए-क्लास लिमोझीनमधील 2021 मर्सिडीज मी कनेक्ट:

ए-क्लास लिमोझीनमधील 2021 मर्सिडीज मी कनेक्ट या सुविधेमध्ये आता 3 भिन्न नवीन वैशिष्ट्ये आणि कनेक्टिव्हिटीची पुनर्निर्देशने उपलब्ध आहेत.

1. मर्सिडीज मी कनेक्ट सह अलेक्सा होम इंटिग्रेशन।  2. गूगल होम मर्सिडीज मी कनेक्टनेव्हिगेशन सिस्टममध्ये पार्किंग सोल्यूशन पीओआय.

 

अलेक्सा होम इंटिग्रेशन :

अलेक्साबरोबर होणारे कोणतेही संभाषण आता अधिक मजेदार होणार आहे; कारण ही सिस्टम आता क्लाऊडद्वारे मर्सिडीज बेंझच्या ग्राहकांशी जोडण्यात आली आहे आणि त्यातून त्यांना रिअल टाइम अपडेट्स मिळू शकणार आहेत. हे वैशिष्ट्य घरी, कार्यालयात किंवा फोनच्या अलेक्सा अॅपवरून अलेक्सा इको डिव्हाइस सेटअपमधून वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ, अलेक्सा, मर्सिडीजला संध्याकाळी डिनरसाठी रिमाईंडर ठेवण्यास सांगकिंवा अलेक्सा, कुरिअर डिलिव्हरी घेण्यासाठी मर्सिडीजला अनलॉक करण्यास सांगकिंवा अलेक्सा, मर्सिडीजला हवामान नियंत्रण चालू ठेवण्यास सांग”, अशा आज्ञा ग्राहक देऊ शकतील.

गूगल होम इंटिग्रेशन :

एक पर्याय म्हणून, ‘गूगल होम इंटिग्रेशन हेदेखील गूगल होमच्या वापरकर्त्यांना  ऑफर करण्यात आले आहे. अशाच प्रकारे, ‘मर्सिडीज मी कनेक्ट ही सुविधा गूगल होमशी एकदा लिंक झाल्यावर, वापरकर्ते डिव्हाइसवर आज्ञा देणे सुरू करू शकतात आणि घरी बसून वाहनाविषयी रिअल टाइम अपडेट्स मिळवू शकतात.

वाहनात किंवा मर्सिडीज मी अ‍ॅपमध्ये पार्किंगची ठिकाणे (पीओआय) :

मर्सिडीज-बेंझ इंडियाने, ‘ए-क्लास लिमोझीनमध्ये नवीन पार्किंग सोल्यूशन हे वैशिष्ट्य दिले आहे. यामध्ये शहरांच्या वेगवेगळ्या भागातील पार्किंगची उपलब्ध सुविधा दर्शविण्यात येईल. वाहनाच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये किंवा अगदी मर्सिडीज मी अ‍ॅपच्या मॅप्स विभागातही ही पार्किंग पीओआय (पॉईंट्स ऑफ इंटरेस्ट) सहज दिसू शकतात.

पार्किंग सोल्यूशन्सचे ठळक मुद्दे :

·         नेव्हिगेशन सिस्टममध्ये ऑफ-स्ट्रीट स्ट्रक्चर्ड पार्किंगची ठिकाणे दृश्यमान होणे,

·         पीओआयमध्ये सार्वजनिक पार्किंगच्या जागा, उदा. मॉल, इमारती, पेड पार्किंग लॉट इत्यादींचा समावेश,

·         संरक्षित पार्किंग आणि नॉन-कव्हर्ड पार्किंग (वेगवेगळी चिन्हे) यांच्या विभाजनाची माहिती देऊन मूल्य जोडणी,

·         मर्सिडीज मी अॅपवर पार्किंगची जागा ग्राहक निवडू शकतात आणि एकाच टचने हे लोकेशन वाहनाकडे सरकवू शकतात.

लिमोझीनचा उचित आलिशानपणा, अंतर्गत जागा व हेडरूममध्ये कोणतीही तडजोड नाही :

·         नवीन डिझाइनमध्ये स्पोर्टी लूक,

·         बाहेरील आणि आतील दोन्ही भागांतील उपकरणे ही मर्सिडीजच्या प्रसिद्ध लिमोझीन फॅमिलीला अनुरूप,

·         सी-क्लास, ई-क्लास आणि एस-क्लास लिमोझिन या पूर्वीच्या श्रेणींचे सिद्धांत जपणारी सर्व वैशिष्ट्ये नवीन ए लिमोझीनमध्ये उपलब्ध.

बाह्यरुपातील ठळक मुद्दे :

·         लक्षवेधक पुढच्या भागात आत्मविश्वासाची झलक

·         वैशिष्ट्यपूर्ण दमदार लूक आणि अशी इतर अधिकृत मूल्ये व्यक्त करणारे नवीन पिढीतील हेडलॅम्प्स, प्रभावी उच्च तंत्रज्ञानाचा देखावा.

·         लक्झरी लिमोझीनच्या प्रोफाइलचे एक यथार्थ दर्शन. संतुलित आणि तंतोतंत परिभाषित प्रमाण. स्ट्रेच्ड लाईन्स व मोठ्या व्हीलबेस यामुळे आकर्षक.

 

अंतरंगातील ठळक मुद्दे :

·         पुरोगामी डिझाइन आणि विस्तृत उपकरणांच्या लाइनमुळे कारच्या अपीलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ.

·         प्रत्येक दृष्टीकोनातून ए-लिमोझीनशी संबंधित उत्तेजन आणि उच्च-गुणवत्तेचे तंत्रज्ञान होते तीव्र.

·         अंतर्गत सजावटीत स्पोर्टीपणाची भर पडल्याने, मोठी जागा उपलब्ध असल्याची जाणीव.

·         सर्वोच्च स्वरुपाची सौंदर्यात्मक मानकांची पूर्तता. तसेच तरूण ग्राहकांना पसंत पडेल असे बहुमुखी डिझाईन.

ऑन-बोर्ड नवीनतम वैशिष्ट्ये व तंत्रज्ञान यांबाबत ठळक मुद्दे :

नवीन ए-क्लास त्याच्या पूर्ववर्ती आणि प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अनेक बाबतीत आघाडीवर आहे. ती  ग्राहकांना अनेक वैशिष्ट्यांमधून मोठी मूल्ये प्रदान करते :

·         एमबीयूएक्ससह एनटीजी 6 । मर्सिडीज मी कनेक्ट | एचडी मीडिया डिस्प्ले | ऑटोनॉमस अॅक्टिव्ह ब्रेक असिस्ट | संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल | टचस्क्रीन असलेला मीडिया डिस्प्ले

·         याव्यतिरिक्त, प्रवाशांच्या आरामासाठी, दोन झोन एअर कंडिशनर, मागील सीटवर आर्मरेस्ट, फ्रंट वायरलेस चार्जर, टचपॅड आणि पॅनोरामिक सनरूफ या सुविधा.

--

एएमजी ए 35 4मॅटिक’ : बाह्यरंगाबाबत ठळक मुद्दे :

·         ट्विन लुव्हर्ससह ग्रिल, एअर इनटेक्सवर फ्लिक्ससह एएमजी फ्रंट बम्पर, फ्रंट स्प्लिटर आणि सिल्व्हर क्रोम ट्रिम एलिमेंट्स, ही एएमजी डिझाईनमधील वेगळेपण दाखवणारी आणि ए 35 मध्ये उपलब्ध असणारी वैशिष्ट्ये.

·         अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मल्टीबीम हेडलॅम्प्स, स्लीक स्लोपिंग फ्रंटला देतात तीव्र भावनिक अपील.

·         ऑल-न्यू रीअर अॅडाप्टिव्ह एलईडी टेल-लॅम्पमुळे गाडीच्या स्पोर्टी लूकमध्ये भर, रीअर स्पॉयलर आणि कार्यक्षम एअरोडायनामिक्ससाठी दोन ट्विन डिफ्यूझर्समुळे सौंदर्यात वाढ

·         क्रोम घटकांसह राऊंड एक्झॉस्ट आणि बंपरमधील कर्टन घटक यांमुळे शार्प वैशिष्ट्यांमध्ये वाढ.

Shailesh Kasbe

अटॅचमेंटगुरु, २५ मार्च, ३:५९ PM (१८ तासांपूर्वी)


प्रति

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App