एमएमआर घरांच्या मागणीला <=२/२.५ बीएचके युनिट्सकडून चालना: क्रेडाई एमसीएचआय- सीआरई मॅट्रिक्स संशोधन अहवाल

 

एमएमआर घरांच्या मागणीला <=२/२.५ बीएचके युनिट्सकडून चालना: क्रेडाई एमसीएचआय- सीआरई मॅट्रिक्स संशोधन अहवाल


-
तुलनेने छोट्या आकारमानाच्या घरांना एमएमआर गृहखरेदीदारांचे प्राधान्य, गेल्या ४ वर्षांत विकल्या गेलेल्या एकूण युनिट्सपैकी ८७ टक्के २/२.५ बीएचके प्रवर्गाहून लहान आकारमानाची असून, ५५ लाख रुपये किमतीची घेतली गेली आहेत.

 

मुंबई: क्रेडाई एमसीएचआयने आपला नॉलेज पार्टनर सीआरई मॅट्रिक्ससोबत आज संयुक्तरित्या, आपल्या एमएमआय हाउसिंग टायपोलॉजी रिपोर्टया शीर्षकाच्या सर्वसमावेशक संशोधन अहवालाच्या दुसऱ्या आवृत्तीचे, अनावरण केले. या अहवालात एमएमआरमधील जानेवारी २०१७ ते आजच्या तारखेपर्यंतच्या निवासी रिअल इस्टेट व्यवहारांमधील समर्पक गृहखरेदी प्रवाहांचा आढावा घेण्यात आला आहे. या संशोधन अहवालात सूक्ष्म-बाजारपेठेचे सखोल व माहितीपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे. यासाठी एमएएमआर (मुंबई महानगर प्रदेश) विभाजन ८ प्रमुख गृह बाजारपेठांमध्ये करण्यात आले आहे. सीबीडी मुंबई, मध्य मुंबई, मध्य उपनगरे, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे, ठाणे, रायगड आणि पालघर हे ते ८ विभाग आहेत.  

 

मुंबई ही भारतातील सर्वांत महागड्या मालमत्ता बाजारपेठांपैकी एक असून येथील गृहकर्जाचे आकारमानही देशातील अन्य कोणत्याही बाजारपेठेच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे एमएमआरमधील छोट्या घरांना (<२/२.५ बीएचके) सातत्याने मागणी असते. हा प्रवाह अनेक वर्षांपासून अखंड आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्येही या प्रवर्गात २०,७३६ कोटी रुपये मूल्याच्या घरांसाठी नोंदणी झाली. या काळात विकल्या गेलेल्या मालमत्तांच्या एकूण मूल्यामध्ये या प्रवर्गाचा वाटा सुमारे ६० टक्के आहे. 

 

एमएमआर हाउसिंग टायपोलॉजी रिपोर्टमधील महत्त्वाचे निष्कर्ष:


-
२०२० या वर्षातील व्यवहारांवर कोव्हिड साथीचा परिणाम होऊनही सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये (सीबीडी) मागील वर्षाच्या तुलनेत (२०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये) विक्रीत, विकल्या गेलेल्या युनिट्सची संख्या व मूल्य यांचा विचार करता, वाढ दिसून आली. जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये >=४बीएचके प्रवर्गावर, विकल्या गेलेल्या मालमत्तांच्या मूल्याच्या दृष्टीने, सर्वाधिक परिणाम झाला. सरासरी किंमत १३ कोटी रुपये होती. 

 

- मध्य मुंबई भागात पूर्वीप्रमाणेच बहुसंख्य विक्री (मूल्याच्या दृष्टीने) मोठ्या प्रकारांतून (टायपोलॉजीज) झालेली दिसून आली. जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्येही >=४बीएचके प्रवर्गाचा वाटा मूल्याच्या दृष्टीने सर्वाधिक होता. मध्य मुंबईत १८४ युनिट्सवर १,८६२ कोटी रुपये खर्च झाला आणि एमएमआरमधील सर्वाधिक होता. 

 

- मध्य उपनगरांवर प्रकार किंवा प्रवर्गाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. २०२० मध्ये एकूण मूल्याचा विचार करता सर्व प्रवर्गातील घरांचा वाटा किमान १५ टक्के होता. विकल्या गेलेल्या मालमत्तांमध्ये मूल्याचा विचार करता सर्वाधिक वाटा ३/३.५ बीएचके प्रवर्गाचा होता. यातील किंमत ३.६ कोटी रुपये होती. याउलट  पूर्व उपनगरांमध्ये विकल्या गेलेल्या मालमत्तांच्या मूल्यांच्या दृष्टीने २ - ३ बीएचके प्रवर्गावर सर्वाधिक परिणाम (~६०%) दिसून आला. सरासरी किंमत १.७ कोटी रुपये होती. संपूर्ण पश्चिम उपनगरांमध्ये <=२.५ बीएचके हा सर्वांत लोकप्रिय प्रवर्ग आहे. २०२० सालात विकल्या गेलेल्या एकूण युनिट्समध्ये या वर्गाचा वाटा ८४ टक्के होता. हाच प्रवाह जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये कायम होता. 

 

- यापूर्वीच्या काळात ठाणे विभागातील बहुतांश विक्रीही १/१.५ बीएचके प्रवर्हातील घरांची होत आली आहे. सरासरी किंमत ३० लाख रुपये आहे. मात्र, अलीकडील काळात २/२.५ बीएचके प्रवर्ग सर्वाधिक प्रभावित प्रकार ठरला आहे. एकूण विक्री झालेल्या युनिट्समध्ये त्यांचा वाटा २२ टक्के आहे, तर विक्री झालेल्या एकूण मूल्यामध्ये त्यांचा वाटा २७ टक्के आहे.  याशिवाय ठाणे भागातील २/२.५ बीएचके प्रवर्गातील घराची  सरासरी किंमत ३ वर्षांच्या सीएजीआर बेसिसवर ६ टक्क्यांनी वाढून २०२० मध्ये ५४ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. रिअल इस्टेटच्या विकासात झालेली वाढ आणि सुधारित संरचना यांमुळे ठाणे भागातील ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात भविष्यामध्ये बदल होईल असा आमचा अंदाज आहे. 

 

- रायगडमध्ये परवडण्याजोग्या घरांच्या बाजारपेठेत वाढ झाली असून, विक्री झालेल्या घरांमध्ये स्टुडिओ/१/१.५ बीएचके विभागातील घरांचा वाटा ६६ टक्के होता. सरासरी तिकिट साइझ २७ लाख रुपये होता. 

 

- पालघरमध्ये बहुतांश विक्री ही १/२ बीएचके या छोट्या घरांच्या प्रवर्गात झाली आहे. २०२० मध्ये विक्री झालेल्या एकूण घरांच्या संख्येत ९४ टक्के वाटा या प्रवर्गाचा आहे, तर एकूण मूल्यामध्ये ८४ टक्के वाटा आहे. पुढे जाऊन या भागातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग जात असल्याने एकंदर विकासात सुधारणा होण्याची व मोठ्या प्रवर्गातील घरांना मागणी वाढण्याची शक्यता आहे. 


क्रेडाइ एमसीएचआय अध्यक्ष दीपक गोराडिया म्हणाले, क्रेडाइ एमसीएचआय- सीआरई मॅट्रिक्स संशोधन अहवाल एमएमआर हाउसिंग टायपोलॉजी रिपोर्टची दुसरी आवृत्ती सर्वांसमोर आणताना आम्हाला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे. या अहवालामुळे ग्राहकांना गृहप्रकार आणि प्रवाह यांची माहिती मिळेल तसेच विकासक समूहालाही भविष्यकालीन प्रकल्पांसाठी एक निश्चित धोरणात्मक दिशा सापडेल. एमएमआर रिअल इस्टेटची एक नवीन पहाट आपली वाट बघत असताना, आम्ही उद्योगक्षेत्रातील अन्य संबंधितांशी सहयोग करून एक माहितीपूर्ण व ज्ञानाने परिपूर्ण असे रिअल इस्टेट वातावरण निर्माण होण्याची प्रक्रिया सुलभ करण्यास उत्सुक आहोत. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मुंबई व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत वाढीचा नवा अध्याय लिहिण्याची निर्णायक क्षमता प्राप्त होऊ शकेल.

 

 

For Information please contact:

Sunil Mahadik – 9930308524

sunil.mahadik@mslgroup.com  

 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202