झोप, श्वसन आणि निरोगी जीवन

 झोप, श्वसन आणि निरोगी जीवन

- कमलेश डी. पटेल, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट मार्गदर्शक



 

आपल्या जीवनामध्ये आपण अनुसरत असलेली काही नैसर्गिक चक्रे कोणती? सुरुवात करायची झाल्यास, आपण नियमित प्रकारे श्वसन करतो. दुसरी लय आहे आपल्या हृदयाच्या ठोक्यांची आणि नंतर आहे दैनंदिन क्रिया, आराम आणि झोप यांचे चक्र. फक्त निरोगी शरीरात निरोगी मन असते आणि तसेच त्याच्या उलट असते. म्हणून ही नैसर्गिक लय समजून घेऊन तिच्याशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे.

आपण श्वसनापासून सुरुवात करुया. आपल्यापैकी प्रत्येकाचा श्वसनाचा एक विशिष्ट साचा (पॅटर्न) असतो. आपण फक्त श्वास आत घेणे व बाहेर सोडणेच एका विशिष्ट लयीत करतो असे नाही, तर आपल्या दोन्ही नाकपुड्यासुद्धा सूर्य व चंद्र यांच्या चक्रानुसार वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. आता या क्षणी तुमची कोणती नाकपुडी जास्त क्रियाशील आहे याचे निरीक्षण करा. ती उजवी आहे की डावी? की दोन्ही सारख्याच आहेत?

यौगिक शास्त्रात श्वसनास खूप महत्त्व दिलेले आहे. उजवी नाकपुडी सूर्यनाडीशी अथवा ‘पिंगला’शी संबंधित आहे, जी क्रिया दर्शविते. वैज्ञानिक भाषेत याला अनुकंपी चेतासंस्था (सिम्पथाटिक नर्व्हस सिस्टीम) म्हणतात. डावी नाकपुडी चंद्रनाडीशी अथवा ‘इडा’शी संबंधित आहे, जी आराम, विश्रांती दर्शविते आणि तिला परानुकंपी चेतासंस्था (पॅरासिम्पथाटिक नर्व्हस सिस्टीम) म्हणतात. प्रत्येक दोन तासाने हा क्रम बदलू शकतो, पण दिवस व रात्रीच्या क्रमामध्येबराच फरक असतो. साधारणतः दिवसा उजवी नाकपुडी जास्त क्रियाशील असते, तर रात्री डावी नाकपुडी. हे थेट सूर्य व चंद्राच्या हालचालींशीसंबंधित असते.  

जेव्हा आपले स्वाभाविक संतुलन बिघडते तेव्हा बदल घडतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण रागात असतो, तेव्हा अनुकंपी चेतासंस्था चेतविली जाते, त्यामुळे उजवीनाकपुडी प्रबळ होते. जेव्हा आपण खूप घाबरलेले अथवा चिंतेत असतो तेव्हासुद्धा असेच होते. अनुकंपी प्रतिसादाच्यावेळी ऍड्रेनॅलीन, कॉर्टिसॉल आणि नॉरपिनेफ्रिन रक्तामध्ये सोडले जातात, त्यामुळे आपले हृदय जोरजोराने धडधडते, आपले स्नायू क्रिया करण्यासाठी तयार होतात, आपला रक्तदाब वाढतो आणि आपण अत्यंत सतर्क होतो. आपण 'युद्धकरण्यास अथवा पळून जाण्यास’ तयार होतो.  

याच्या उलट करायचे असल्यास तुम्ही हा एक सोपा श्वसनाचा व्यायाम करून बघा :

तुमची उजवी नाकपुडी तुमच्या उजव्या अंगठ्याने बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून एक हळू पण खोल श्वास घ्या, हा श्वास तुमच्या पोटापर्यंत खोल जाऊ द्या आणि प्रत्येक वेळी पूर्ण श्वास सोडा. असे आठ ते दहा वेळा तुमच्या डाव्या नाकपुडीतून श्वसन करा. तुमची उजवी नाकपुडी पूर्णवेळ बंद ठेवा.

सामान्यतः तुमचे हृदय जोरात धडधडणे बंद करेल, तुम्ही शांत व्हाल, आणि राग, भय अथवा चिंतेची भावना बरीचशी कमी होईल. पण जर तुम्हाला नेहमीच भयगंडाचा त्रास असेल तर तुमच्या वैद्याशी संपर्क करा.

सूर्योदयाच्या आसपास आपल्याला डाव्या नाकपुडीकडून उजव्या नाकपुडीकडे एक हळुवार बदल निदर्शनास येतो. आणि सूर्यास्ताच्या वेळेस उजव्या नाकपुडीतून डाव्या नाकपुडीकडे हळुवार बदल निदर्शनास येतो. आणि जेव्हा आपण या दोनपैकी एका संक्रमणाच्या वेळी ध्यान करतो,तेव्हा ते सामान्यतः खूप अप्रतिम असते, कारण प्रकृतीमध्ये आणि दोन्ही नाड्यांमध्ये एक संतुलन असते.

फार प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी या चक्राच्या आधारावर जीवनाचा एकनित्यक्रम विकसित केला. जास्त क्रिया दिवसा केल्या जायच्या आणि रात्रीची वेळ आरामासाठी असायची. त्यामुळे शरीराला क्रिया आणि विश्रांतीमध्ये, म्हणजे दिवस आणि रात्रीमध्ये एक प्रकारची लय प्राप्त झाली. या चक्रांशी सुसंगत राहण्यासाठी ते सामान्यतः लवकर उठायचे. आजसुद्धा भारतातील गावांमध्ये तुम्हाला भल्या पहाटे लोक सूर्याला अर्ध्य देण्याची परंपरा पाळताना दिसतात.

एक गोष्ट दुसरीला जन्म देते : लवकर उठूनसूर्यप्रकाशात जाण्यामुळे सेरोटोनिनची निर्मिती होते, जे एक आनंदी हार्मोन आहे, ज्यामुळे मेलॅटोनिनची निर्मिती होते आणि आपल्याला रात्री छान झोप येते, जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठतो आणि ताजेतवाने असतो. जेव्हा हा नित्यक्रम भंग पावतो, तेव्हा आपण झोपेच्या तसेच नैराश्याच्या समस्यांना बळी पडतो, ज्या आधुनिक जगाच्या अत्यंत महत्त्वाच्या आजारांपैकी दोन आहेत.

ही गोष्ट झोपेचे महत्त्व अधोरेखित करते. आपण कितीचांगले झोपलो आणि आपली झोप किती गाढ होती यावरून दिवसभरात आपल्या मनाची अवस्था कशी राहणार हे ठरते. आपल्याला जर योग्य प्रमाणात झोप मिळाली तर सकाळी उजवी नाकपुडी आपोआप क्रियाशील होते. जेव्हा आपण सकाळी पूर्णपणे जागरूक असतो, तेव्हा आपण स्वाभाविकपणे चेतनेच्या उच्च अवस्थांना आमंत्रित करतो. अशांत प्रक्षुब्ध चेतनेसोबत संघर्ष करणे किंवा स्थिर स्पष्ट चेतना निर्माण करणे, याची निवड आपली असते.जेव्हा आपण या लयीशी सुसंगत असतो, तेव्हा आपली चेतना आणि संपूर्ण आरोग्य आपोआप सुधारते.

जेव्हा आपण रात्री उशिरा झोपायला जातो तेव्हा काय होते? आपण नैसर्गिक लयीच्या विरुद्ध जातो, आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतोआणि कालांतराने आपली ढासळलेली तब्येतच सर्वकाही सांगते. अपुऱ्या झोपेचाक्रम, अनियमित सवयी आणि उशिरा रात्री झोपणे यामुळे उद्भवतो. त्यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीचा स्तर खालावतो, कारण आपली चेतासंस्था तणावाखाली असते. जेव्हा आपली झोप अर्धवट झालेली असते, तेव्हा सकाळी काय होते? आपण चिडचिडे बनतो आणि प्रत्येक छोट्याशा मतभेदावर लगेच क्रोधित होतो.

आपल्यापैकी ज्यांना जीवनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, ते झोपेचे स्वाभाविक चक्र पाळण्यासाठी मार्ग शोधून काढतील. नाहीतर ही एकच मूलभूत गोष्ट आपल्याला जीवनभर चकवत राहील आणिआपण आपली चेतना, आपली मूलभूत मार्गदर्शक शक्ती, तीच समूळ नष्ट करू, भावनाप्रधानता व प्रतिक्रियात्मकता यांना बळी पडत राहू.  

म्हणून तुमच्यापैकी ज्यांना चिंतामुक्त, हलके, आरामशीर आणि शांत राहायचे आहे, त्यांनी आपल्या झोपेच्याव श्वसनाच्या क्रमाबाबतप्रयोग करावा. त्यात फार मोठा फायदा आहे. कृपया प्रयत्न करा आणि स्वतःच बघा!

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24