मॉल्ससाठी जगातील पहिले ‘ट्रस्टेड शॉपिंग सेंटर’ चिन्हांकित प्रमाणन

मॉल्ससाठी जगातील पहिलेट्रस्टेड शॉपिंग सेंटरचिन्हांकित प्रमाणन

 

·         सुरक्षित रिटेल व सामाजिक वातावरणाची खात्री देणारे मॉल्ससाठीचे जगातील पहिले ग्राहककेंद्री मानक 

·         जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त यंत्रणांद्वारे (सीबी) तसेच भारतात एनएबीसीबीद्वारे (भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील भारतीय दर्जा परिषदेच्या अखत्यारीतील यंत्रणा), ISO/IEC 17065 शी सुसंगती राखत, थर्ड पार्टी लेखापरीक्षण  

·         नवीन प्रमाणन योजनांमध्ये खरेदी संकुलांसाठी आणि सर्व रिटेल फॉरमॅट्स, वर्ग आणि वाहिन्यांसाठी  अतिरिक्तन्यू नॉर्मलचेकलिस्ट्सचा समावेश

·         ट्रस्टेडचिन्हांकित प्रमाणनामुळे राष्ट्रीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय स्तरांवर व्यापार, निकोप स्पर्धा आणि ग्राहक स्वीकृती सुलभ होण्यास मदत होणार

·         एससीएआयचे सदस्य असलेल्या ५०हून अधिक खरेदी संकुलांनी आधीच प्रमाणनाच्या पहिल्या बॅचमध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली आहे. ४०००हून अधिक रिटेल स्टोअर्स असलेल्या या ५० केंद्रांमध्ये दररोज सरासरी १.५ दशलक्ष अभ्यागत येतात. 

·         पहिल्या बॅछसाठी अर्ज करणाऱ्या २० अर्जदारांमध्ये नेक्सस मॉल, फिनिक्स, पॅसिफिक, इनऑर्बिट, इन्फिनिटी, सारडा, प्रिमार्क, एमजीबी आणि  पीपीझेद्वारे व्यवस्थापित युनिटी ग्रुप आणि सेंटर्स यांसारख्या भारतातील आघाडीचे विकासकांचा समावेश आहे. 

·         या प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या/प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या रिटेलर्समध्ये अरविंद ब्रॅण्ड्स, बिग बझार, फ्युचर ग्रुपचे हायपरसिटी अँड फूड बझार, लॅण्डमार्क ग्रुपचे होम सेंटर तसेच लेव्हीज, ट्वेंटीफोर सेव्हन, रत्नदीप सुपरमार्केट, क्यू मार्ट, हायडिझाइन, स्पोर्ट्स स्टेशन, हल्दीराम्स, व्ही मार्ट, नाइके, नॅचरल्स, जेसीबी अँड एनरिच सलोन्स, अपोलो टायर्स यांसारख्या ब्रॅण्ड/रिटेल साखळ्यांचा समावेश आहे.

 

नवी दिल्ली/मुंबई, १० मार्च २०२१: शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एससीएआय) आज भारतातील रिटेल व शॉपिंग सेंटर उद्योगातील एक नवीन टप्पा गाठला. भारतातील आधुनिक व संघटित रिटेलिंगच्या या शिखर संघटनेने जगातील मॉल्ससाठीच्या पहिल्या ग्राहककेंद्रीट्रस्टेड शॉपिंग सेंटरचिन्हांकित प्रमाणनाची सुरुवात झाल्याचे आज जाहीर केले. हे नवीन प्रमाणन चिन्ह आज पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आयआरएफ ट्रस्टेड मार्क सर्टिफिकेशन स्कीमखाली लाँच करण्यात आले.ट्रस्टेड शॉपिंग सेंटरचिन्ह हे थर्ड-पार्टी प्रमाणन असून, ते ग्राहक सेवेच्या परिमाणांवर तसेच मापदंडांवर ठरते; जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त यंत्रणांद्वारे (सीबी) तसेच भारतात एनएबीसीबीद्वारे (भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील भारतीय दर्जा परिषदेच्या अखत्यारीतील यंत्रणा), ISO/IEC 17065 शी सुसंगती राखत, थर्ड पार्टी लेखापरीक्षण केले जाते. 

 

ट्रस्टेड शॉपिंग सेंटरचिन्हांकित प्रमाणन योजनेमध्ये शॉपिंग सेंटर्स व सर्व रिटेल फॉरमॅट्स, विभाग व वाहिन्यांसाठी अतिरिक्तन्यू नॉर्मलचेकलिस्ट्सचा समावेशही करण्यात आला आहे. रिटेलर्स आणि शॉपिंग सेंटर्स तसेच मल्टिप्लेक्सेस, लीझर अँड एंटरटेन्मेंट, सलोन्स, स्पा व जिम्स, रेस्टोरंट्स व फूड कोर्ट्स, एससीएआय आणि आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने सुरक्षितता व स्वच्छतेसाठी शिफारस केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे तसेच सर्व फॉरमॅट्स, विभाग व वाहिन्यांतील रिटेरल्ससाठीच्या संबंधित व्यापार यंत्रणांनी खास विकसित केलेल्या एसओपींचे पालन करतील याची निश्चिती थर्ड पार्टी प्रमाणनामुळे होईल.

  

शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एससीएआय) अध्यक्ष अमिताभ तनेजा या लाँचच्या वेळी म्हणाले, “मॉल्ससाठी ग्राहककेंद्री मानकांमध्ये जागतिक मापदंड स्थापन करून देण्यास सज्ज असे प्रमाणन आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतीय बाजारपेठेत ६५० मोठी आणि १०००हून अधिक छोटी  शॉपिंग सेंटर्स ग्राहकांना संघटित रिटेल वातावरण देत आहेत आणि हेट्रस्टेड शॉपिंग सेंटरचिन्हांकित प्रमाणन महत्त्वाचे आहे. ग्राहकसेवा, सुविधा, प्रणाली व संरचना यांबाबत जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती स्थापन करण्यामध्ये एक पाऊल पुढे टाकण्याच्या उद्देशाने हे प्रमाणन आणले गेले आहे.

 

लेखापरीक्षणाचा (ऑडिट) प्रक्रियेत स्वतंत्ररित्या नि:पक्षपाती अशा त्रयस्थ पक्षांकडून मूल्यमापन केले जाईल. यांमध्ये नियमित अंतर्गत तपासणी, या हेतूसाठी प्रशिक्षण देण्यात आलेल्या खऱ्या ग्राहकांद्वारे मिस्टरी ऑडिट आणि एसओपींचे प्रत्यक्ष ऑडिट यांचा समावेश असेल. हे नोंदणीकृत तसेच जागतिक प्रमाणनप्राप्त यंत्रणांद्वारे अमलात आणले जाईल. यामुळे रिटेलर्स व शॉपिंग सेंटर्सना कठोर मानकांचे पालन करण्यात प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय, ग्राहकांसाठी दमदार रिटेल वातावरणाची खात्री देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा ग्राहककेंद्री उपाययोजनांचे मापदंडही सातत्याने अद्ययावत करत राहण्यास प्रेरणाही मिळेल. यामुळे प्रमाणित स्टोअर्स/सेंटर्स जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करत आहेत आणि सर्व विहित नियम पाळत आहेत याची खात्री ग्राहकांना आणि सर्व संबंधितांना देऊन त्यांचा विश्वास जिंकण्यात मदत होईल. तसेच रिटेल आणि शॉपिंग सेंटर्सचे कामकाज ग्राहकांना अभिमुख आहे यावरील संपूर्ण प्रणालीचा विश्वास दृढ होईल. या प्रमाणनामुळे प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार, निकोप स्पर्धा आणि ग्राहक स्वीकृती सुलभ करण्यात मदत होईल.

 

भारतीय दर्जा परिषदेचे महासचिव आणि ट्रस्टेड बोर्ड मेंबर डॉ. आर. पी सिंग या प्रमाणनाच्या लाँचबद्दल आनंद व्यक्त करत म्हणाले, आयआरएप ट्रस्टेड मार्क सर्टिफिकेशन योजनेनेट्रस्टेड शॉपिंग सेंटरचिन्हाच्या लाँचमुळे भारतातील मॉल्ससाठीच्या ग्राहककेंद्री मानकांमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आता भारतातील लक्षावधी ग्राहक या प्रमाणित स्टोअर्स किंवा मॉल्सना भेट देतील तेव्हा त्यांना सुरक्षित रिटेल व सामाजिक वातावरणाची हमी प्राप्त होईल. ग्राहकांना शक्य तेवढी उत्तम सेवा देण्याची मानसिकता भारतीयांनी अंगी बाणवणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्राहक ज्या महत्त्वासाठी पात्र आहेत, ते त्यांना दिले पाहिजे. ही ग्राहककेंद्री मानके आयआरएफ ट्रस्टेस मार्क सेक्रेटरिएटसोबत विकसित करण्यासाठी काम करणारे शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एससीएआय) आणि सर्व व्यापार यंत्रणा आणि अनेक संबंधितांच्या समित्या यांची मी प्रशंसा करतो. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त राष्ट्रीय अधिमान्यता यंत्रणांच्या नेतृत्वाखालील हे प्रमाणन, भारतीय दर्जा परिषदेची संरचना यांमुळे शॉपिंग मॉल्स आणि रिटेलर्स कठोर मानकांचे पालन तर करतीलच, शिवाय, ग्राहककेंद्री उपाययोजनांचे मापदंड सातत्याने अद्ययावत करत राहण्याची प्रेरणाही त्यांना यातून मिळेल. हे मापदंड ग्राहकांना पोषक रिटेल वातावरण देण्यासाठी आवश्यक आहेत.

 

ट्रस्टेड शॉपिंग सेंटरयोजनेचे प्राथमिक उद्दिष्ट रिटेलर्स आणि शॉपिंग सेंटर्सना श्रेष्ठ दर्जा तसेच ट्रस्टेड स्कीमच्या कठोर नियमांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक अन्य वैशिष्ट्ये दाखवता यावीत हे आहे. त्याचप्रमाणे प्रमाणित रिटेलर्स व शॉपिंग सेंटर्स ट्रस्टेड स्कीमद्वारे प्रमाणित केल्याप्रमाणे सर्वसमावेशक दर्जा नियमांची पूर्तता करत आहेत याची माहिती व खात्री या प्रमाणनाच्या माध्यमातून ग्राहकांना देण्याचेही उद्दिष्ट योजनेपुढे आहे. हे सगळे नियम पूर्णपणे ग्राहककेंद्री व ग्राहकांच्या गरजांवर भर देणारे आहेत. 

 

नेक्सस मॉलचे सीईओ दलिप सेहगल म्हणाले, नेक्सस मॉलमध्ये आमचे आश्रयदाते (ग्राहक), कर्मचारी व रिटेल पार्टर्नस यांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. मॉल्स पुन्हा सुरू झाल्यापासून आम्ही स्वच्छता व सुरक्षिततेची निश्चिती करण्यासाठी आमच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये काटेकोर नियमांचे पालन करत आहोत. आता सरकारने सर्व निर्बंध शिथील केले आहेत आणि मॉल्सचे कामकाज बहुतांशी पूर्वपदावर आले आहे, त्यामुळे निर्जंतुक व सुरक्षित स्थिती देणे पूर्वी कधी नव्हते तेवढे महत्त्वाचे झाले आहे. प्रमाणित स्टोअर्स व मॉल्स सर्वोत्तम जागतिक पद्धतींचे पालन करत आहेत आणि एससीएआय व गृहमंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व कोविड सुरक्षितता नियमांची पूर्तता करत आहेत याची हमीट्रस्टेड शॉपिंग सेंटरप्रमाणन ग्राहकांना देते.

 

मानक व प्रमाणन विकासाच्या तसेच मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी मॉल्स व शॉपिंग सेंटर्सनी प्रचंड प्रतिसाद दिला. भारतातील आघाडीच्या व्यापार यंत्रणा, कॉर्पोरेट कौन्सेल्स, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, सल्लागार व संशोधन संस्था, १००हून अधिक जागतिक व भारतीय रिटेल रिअल इस्टेट यांनी रिटेलर्ससाठी अनन्यसाधारण ग्राहककेंद्री योजना विकसित करण्याच्या कामात सहभाग घेतला. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात हे व्यापक स्तरावर स्वीकृत तसेच दृश्यमानता असलेला ग्राहक चिन्ह ठरेल.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App