जागतिक रिसायकलिंग दिनाच्या औचित्याने लीड रिसायकलर्ससाठी मानक कार्यपद्धतींसाठी ILZDAचा आग्रह

 जागतिक रिसायकलिंग दिनाच्या औचित्याने लीड रिसायकलर्ससाठी मानक कार्यपद्धतींसाठी ILZDAचा आग्रह


लीडसाठी भारत ही खरी सर्क्युलर इकोनॉमी व्हावी याला चालना देणारे उपक्रम प्रस्तावित करते

भारता हा लीड अॅसिड बॅटरींचा एक सर्वात मोठा ग्राहक आहे. वापरलेल्या लीड बॅटरींची असुरक्षित विल्हेवाट लावणे हा उद्योगक्षेत्रासाठी आणि पर्यावरणासाठी मोठा अडथळा आहे

वापरलेल्या लीड बॅटरींचे संकलन आणि पर्यावरणस्नेही रिसायकलिंगमुळे प्रदूषण टाळले जाते, परिणामी पर्यावरण स्वच्छ राहते

“रिसायकलिंग म्हणजे शब्दशः जमिनीवरील खाण आहे.”


१७ मार्च २०२१, दिल्ली : जागतिक रिसायकलिंग दिनाच्या औचित्याने इंडिया लीड झिंक डेव्हलपमेंट असोसिएशन (ILZDA) या संस्थेतर्फे लीड बॅटरीची सुरक्षित विल्हेवाट, संघटित संकलन आणि ग्रीन रिसायकलिंगच्या अत्यावश्यक गरजेवर प्रकाश टाकण्यात आला. भारत हा लीड अॅसिड बॅटरी सर्वाधिक वापरणारा ग्राहक आहे त्याचप्रमाणे भंगार सामान संकलित करणारे आणि बॅटरी डीलर्समध्ये असलेल्या माहितीच्या अभावामुळे लीडचे रिसायकलिंग करणारे एक असंघटित क्षेत्रही अस्तित्वात आहे. अशा बेकायदेशीर आणि घातक कार्यपद्धतींमुळे पर्यावरणाला धोका पोहोचतोच, त्याचप्रमाणे अशा मटेरिअलच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांसाठी हे अपायकारक असते. गेल्या काही वर्षात ILZDA या संस्थेतर्फे लीड बॅटरी उत्पादक आणि रिसायकल करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, जेणेकरून वापरलेल्या लीड बॅटरींचे पर्यावरणस्नेही रिसायकलिंग करण्याची खातरजमा केली जाईल.


विषारी गुणधर्म असलेल्या मटेरिअल्सच्या हाताळणीसाठी, वाहून नेण्यासाठी किंवा रिसायकल करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन अवलंबावा लागतो. माहितीचा अभाव आणि योग्य तंत्रज्ञान नसणे यामुळे अशा मटेरिअल्समध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेवर परिणाम होतोच, त्याचप्रमाणे पर्यावरण आणि लोकसंख्येवर अप्रत्यावर्ती परिणाम होतो.”, असे लीड झिंक डेव्हलपमेंट असोसिएशनचे कार्यकारी संचालक एल. पुगाझेन्थी म्हणाले. “एक असोसिएशन म्हणून आम्ही या क्षेत्रातील सर्व सहभागींमध्ये संबंधित ज्ञान आणि उपकरणांविषयी जाणीवजागृती निर्माण करत आहोत आणि हे प्रयत्न सुरू आहेत. लीड बॅटरींची सुरक्षित विल्हेवाट आणि पर्यावरणस्नेही रिसायकलिंग करू इच्छिणाऱ्यांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षित ग्रीन लीड रिसायकलर्स आदर्श झाले पाहिजेत.”, अशी पुष्टी पुगाझेन्थी यांनी जोडली.


२००१ मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEF&CC) ‘बॅटरी (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम २००१’ अधिसूचित केले आणि त्यानंतर २०१० साली त्यात सुधारणा केल्या. त्यात, उत्पादकांची विस्तारीत जबाबदारी समाविष्ट केली आणि सर्व भागधारक म्हणजे उत्पादक, डीलर्स, आयातदार (नवीन बॅटरंचे), बॅटरी असेंब्ली करणारे, रिकंडिशनर्स, लिलावकर्ते, वैयक्तिक ग्राहक आणि घाऊक ग्राहक यांनी नव्या बॅटऱ्या विकताना जुन्या बॅटऱ्या (९५-१००%) वैयक्तिक तत्वावर संकलित कराव्या. त्याचप्रमाणे अशा प्रकारे संकलित करण्यात आलेल्या बॅटरींवर नोंदणीकृत पर्यावरणस्नेही लीड रिसायकलर्सनी प्रक्रिया करावी असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, संकलित करण्यात आलेल्या जुन्या बॅटरींची संख्या आणि विक्री करण्यात आलेल्या नवीन बॅटरींची संख्या याचे विविरण उत्पादकांनी आणि डीलर्सनी संबंधित राज्य प्रदूषण नियामक मंडळाला दर सहा महिन्यांनी फाइल करावे, असेही २००१ बॅटरी (व्यवस्थापन आणि हाताळणी) मध्ये अनिवार्य करण्यात आले आहे. वापरलेल्या लीड बॅटरींसाठी वैयक्तिकतपणे किंवा संयुक्तपणे देशभरात संकलन केंद्रे स्थापन करण्यालाही हे प्रोत्साहन देते. भारतात, वापरलेल्या लीड बॅटरींचे १००% संकलन करणे आणि त्यांना केवळ पर्यावरणस्नेही रिसायकलिंगसाठी पाठविणे हे याचे एकमेव उद्दिष्ट आहे.


“भारतात वापरण्यात येणारे एकूण ८५% लीड हे लीड बॅटरींच्या उत्पादनासाठी वापरण्यात येते. अंदाजे २५% वापरलेले लीड नोंदणी नसलेल्या रिसायकलर्सकडून येते, जे त्यांच्या असुरक्षित कार्यपद्धतींमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान करतात”, असे पुगाझेन्थी म्हणाले. “लीड अॅसिड बॅटरी या अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित उर्जा स्रोत असल्या तरी अनौपचारिक लीड रिसायकलिंगमुळे त्यांची सकारात्मक प्रतिमा डागाळली आहे. अंमलबजावणीचे मजबूतीकरण आणि दंडात्मक अनुपालनासह काटेकोर नियंत्रण हेच उत्तम कार्यपद्धतींचा अवलंब करण्याचा एकमेव मार्ग आहे.


लीड रिसायकलिंगमुळे शून्य हानी व्हावी याची खातरजमा करण्यासाठी ILZDAने अनेक मानक कार्यप्रणालींची मागणी केली आहे. यात सर्व बॅटरी डीलर्सची नोंदणी करणे आणि रिटर्न्स संकलित करणे, सर्वोत्तम नोंदणीकृत रिसायकलर्स तसेच सर्वाधिक संकलन करणारे सर्वोत्तम लीड बॅटरी उत्पादकांना अनुपालन केल्याबद्दल सन्मानित करणे, बॅटरी उत्पादक आणि उद्योजकांना कर सवलत, इन्सेन्टिव्ह्ज इत्यादी देऊन पर्यावरणास अनुकूल रिसायकलिंग सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे या मानक कार्यप्रणालींचा समावेश आहे. आपला सहभाग म्हणून असोसिएशनतर्फे अधिकृत रिसायकलर्स आणि उत्पादक आणि युझर्सह संकलन व जुन्या बॅटरींच्या संकलनाची विद्यमान यंत्रणा सुधारण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.


इंडिया लीड झिंक डेव्हलपमेंट असोसिएशन ही ६० वर्षे जुनी ना-नफा तत्वावर चालविण्यात येणारी, नॉन-कमर्शिअल बॉडी आहे. ही संस्था तांत्रिक माहिती प्रसारीत करते आणि बाजार विकसित करते. ILZDA ही धोरण नियोजन, भविष्यातील वाटचाल इत्यादीसाठी सरकारी समित्यांची सभासद आहे. समितीची सदस्य म्हणून ILZDAने २००० साली बॅटरी (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमांचा आराखडा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ILZDAतर्फे नियमितपणे मान्यताप्राप्त परदेशी तज्ज्ञांना येणे आणण्यात येते, जेणेकरून भारतीय उद्योग आणि भागधारकांना सर्वोत्तम मापदंड असलेले तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींची माहिती करून देता येईल.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24