‘सिट्रोएन’ सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ भारतात सादर :

 

सिट्रोएनसी5 एअरक्रॉस एसयूव्ही भारतात सादर :
ला मेझॉन सिट्रोएन फिजिटल शोरूम्समध्ये व
100 टक्के थेट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध

 


·         नवीन सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही– प्रारंभिक किंमत रु. INR 29,90,000 लाख (एक्स-शोरूम, सर्व भारतात)

·         देशातील 10 शहरांतील ला मेझॉन सिट्रोएनफिजिटल शोरूम्समध्ये विक्रीस उपलब्ध, फिरत्या फिजिटल शोरूमच्या सहाय्याने

·         सी5 एअरक्रॉस एसयूव्ही मिळू शकेल थेट कारखान्यातून, 100 टक्के ऑनलाईन खरेदी पद्धतीने, देशभरातील 50हून अधिक शहरांमध्ये ग्राहकांच्या दारात डिलिव्हरी.

·         सिट्रोएन फ्युचर श्युअरही योजना सादर - 49,999 रुपयांच्या मासिक हप्त्यांमध्ये सर्वसमावेशक सर्व्हिस व मेन्टेनन्स पॅकेज, भविष्यातील मुल्याच्या हमीसह.

·         सिट्रोएन अॅडव्हायझर या ऑनलाईन रिव्ह्यू वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहक आपल्या वाहनाविषयी व तिच्या मालकीविषयी व्यक्त करू शकतात आपले अनुभव. 

चेन्नई, 7 एप्रिल 2021 : नवीन सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही आज भारतभरात दाखल झाली. तिच्या फील या मॉडेलची किंमत INR 29,90,000 Lakhs लाखांपासून सुरू होते, तर शाईन या मॉडेलची किंमत 31,90,000  लाखांपासून सुरू होते. या भारतभरातील शोरूममधील किंमती आहेत. या वाहनाचे वितरण देशभरातील ला मेझॉन सिट्रोएनफिजिटल शोरूम्समधून आजपासून सुरू होत आहे.

 

नवीन सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही– प्रारंभिक किंमती (एक्स-शोरूम दिल्ली)

फील (मोनो-टोन)

रु. 29,90,000 लाख

फील (वाय-टोन)

रु. 30,40,000 लाख

शाईन (मोनो-टोन / वाय-टोन)

रु. 31,90,000 लाख

 

सिट्रोएनचे भारतासाठीचे सर्वंकष वैशिष्ट्यांचे धोरण

सिट्रोएनची मालकी अधिक सुखदायी करण्याच्या दृष्टीने, कंपनी सिट्रोएन फ्युचर श्युअर ही योजना भारतीय ग्राहकांसाठी सादर करीत आहे. या सर्वसमावेशक पॅकेजमुळे ग्राहकांना मासिक 49,999 रुपये या हप्त्यात सिट्रोएन बाळगणे शक्य होणार आहे, तसेच त्यासोबत सी5 एअरक्रॉस एसयूव्हीवर भविष्यातील मुल्याची हमीही मिळणार आहे. या पॅकेजमध्ये नियमित देखभाल, विस्तारीत वॉरंटी, रोडसाईड असिस्टन्स आणि ऑन-रोड फायनान्सिंग या गोष्टी 5 वर्षांसाठी मिळतील.

 

सिट्रोएनने भारतातील 10 शहरांमध्ये ला मेझॉन सिट्रोएनफिजिटल शोरूम्स उभारून आपण भारताला प्राधान्य देत असल्याचे सिद्ध केले आहे. नवी दिल्ली, गुडगाव, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोची, चेन्नई येथील या शोरूम्समध्ये ग्राहकांना एटीएडब्ल्यूएडीएसीमधून (एनीटाईमएनीव्हेअरएनीडिव्हाईसएनीकंटेन्ट) अखंड, ओम्नी-चॅनेल रिटेल संकल्पनेचा अनुभव मिळेल. ग्राहकांच्या डिजिटल अनुभवास एका संपूर्ण डिजिटल इकोसिस्टमद्वारे अखंडपणे जोडले जाईल आणि एटीएडब्ल्यूएडीएसी रिसेप्शन बार, हाय डेफिनेशन (एचडी) थ्रीडी कॉन्फिगरेटर आणि सिट्रोएन ओरिजिनल टचस्क्रीन यांद्वारे त्यांना शोरूममध्ये समृद्ध अनुभव मिळेल. ऑनलाईन आणि ला मेझॉन सिट्रोएन वितरक या दोन्हींकडे उपलब्ध असलेल्या एचडी 360 डिग्री थ्रीडी कॉन्फिगरेटरमध्ये वास्तव वेळेतील त्रिमितीय दृश्यमानता मिळते आणि त्यातून अतिशय वास्तविक स्वरुपात दृष्ये पाहता येतात.

 

सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्हीसाठी 100 टक्के थेट ऑनलाइन खरेदी योजनादेखील सुरू करण्यात येत आहे. वितरकांच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या 50 हून अधिक शहरांमध्ये (ऑनलाइन नेटवर्कमधील शहरांची यादी परिशिष्टात नमूद) ही थेट ऑनलाईन खरेदीची सुविधा देण्यात आली असून ग्राहक थेट कारखान्यातून आपली गाडी घेऊ शकतील. याकरीता एक स्वतंत्र ई-कॉमर्स-सक्षम वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे. तीत वित्तसहाय्य, विमा, देखभालीची वार्षिक योजना, अतिरिक्त वॉरंटी, तसेच ग्राहकाकडे असलेल्या विद्यमान गाडीचे एक्सचेंज आदी बाबी समाविष्ट आहेत. टेस्ट-ड्राईव्हसाठी समर्पित गाड्यांचा ताफा, ई-विक्री सल्लागार, ‘व्हर्च्युअल प्रॉडक्ट डेमोआणि ग्राहकाच्या दारी वितरणाची सुविधा आदी गोष्टीही यात उपलब्ध असणार आहेत.

 

कंपनीचे ल अटेलिए सिट्रोएन हे विक्रीपश्चात सेवा देणारे नेटवर्क पुढील स्वरुपाच्या नाविन्यपूर्ण सेवा देईल -

 

·         ग्राहकांना ताण-मुक्त मालकीच्या अनुभवाचे आश्वासन देण्यासाठी सर्वसमावेशक वॉरंटी व सुट्या भागांची 100 टक्के उपलब्धता, यांसह रिमोट डायग्नोस्टिक्स सेवा.

·         सर्व्हिस ऑन व्हील्स या सेवेतून ग्राहकांना समाधानकारक अनुभव मिळेल. यामध्ये त्यांच्या दारी जाऊन सेवा किंवा दुरुस्तीची कामे करून देण्यात येतील.

·         या सेवांना देशभरात रोडसाईड असिस्टन्स सर्व्हिसचे पाठबळ असेल. यामध्ये देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी 3 तासांच्या आत ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची हमी देण्यात येते.

 

या सर्वांमधून सिट्रोएन सर्व्हिस प्रॉमिस ही संकल्पना दृढ होते. ग्राहकांना "आपल्या हाताशी सर्व सुविधा" देणारी ही संकल्पना आहे.

 

सिट्रोएन अॅडव्हायझर या ऑनलाईन रिव्ह्यू वेबसाईटच्या माध्यमातून भारतात प्रथमच ग्राहकांना आपल्या उत्पादनाचा व मालकीच्या अनुभवाचा आढावा घेणे शक्य होणार आहे. ही पद्धत जगात अतिशय यशस्वी ठरलेली असून यामुळे ग्राहकांना त्यांचे वितरक, त्यांची कार आणि त्यांचे विक्री सल्लागार यांचे मानांकन करता येईल. वाहन उद्योग जगतातील हे एक अग्रणी साधन काळानुसार विकसीत झालेले आहे. त्यातून सिट्रोएनला पारदर्शकता व ग्राहकांशी नजीकता या दृष्टीने एक पाऊल पुढे राहता येते.

 

सिट्रोएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट कोबे म्हणाले, “नवीन सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्हीचे सादरीकरण हा सिट्रोएनमध्ये आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्हीहे वाहन बाजारपेठेच्या अपेक्षांच्या पलीकडे जाणारे आहे. डिझाइन, आराम, प्रशस्तपणा, विविध उपकरणे आणि पॉवरट्रेन या बाबतीत हे वाहन सर्व गरजा पूर्ण करेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याचे यश आणि आधुनिक तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांना नक्कीच समाधान देईल. जागतिक दर्जा असलेली उत्पादने वापरण्यास ते पात्रच आहेत. सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्हीआपला ब्रँड भारतात स्थापित करेल आणि सिट्रोएन कोणकोणत्या गोष्टींसाठी सक्षम आहे, ते दाखवून देईल. या सादरीकरणानंतर, ‘सिट्रोएनने भारतात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. बी-सेगमेंटकारच्या आमच्या नवीन कुटुंबातील हे पहिलेच वाहन बाजारात आणल्यानंतर, आम्ही येत्या काही महिन्यांत आणखी मोठी कामगिरी करू, अशी ग्राहक अपेक्षा बाळगू शकतात."

 

सिट्रोएन इंडियाच्या सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोलँड बुशाहा म्हणाले, सिट्रोएन अ‍ॅडव्हान्स्ड कम्फर्टप्रोग्रामच्या सर्व घटकांना मूर्त रूप देणारी नवीन सी5 एअरक्रॉससादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ग्राहकांना एकंदरीत चांगला अनुभव देण्यासाठी सिट्रोएन 360 डिग्री (सर्वांगीण) सुविधा देण्याच्या आमच्या प्रयत्नांनुसारच हे वाहन बनविण्यात आलेले आहे. अखंड ग्राहक अनुभव, मानवी-केंद्रितता आणि ला मेसन सिट्रोएनफिजिटल नेटवर्कद्वारे डिजिटल पद्धतीने समाकलित होण्याची पद्धत, याद्वारे लोकांचे एकंदर हित साधण्यावर आमचे लक्ष केंद्रित असते. आमची नाविन्यपूर्ण उत्पादने व सेवा यांद्वारे आम्ही स्थितिवादाला आव्हान देत आहोत आणि भारतात कारखरेदी व वितरण यांच्या पद्धतीत नव्याने सुधारणा करीत आहोत. बाजारात सादर होण्यापूर्वीच सी5 एअरक्रॉसगाडीसाठी 1 हजारहून अधिक ग्राहकांनी नोंदणी केली आहे. भारतातील बहुप्रतिक्षीत एसयूव्हींपैकी ती एक आहे. या गाडीच्या सादरीकरणाच्या निमित्ताने भारतातील आमचा प्रवास यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.

 

नवीन सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही

सिट्रोएनच्या या फ्लॅगशिप एसयूव्हीची जुळणी चेन्नईजवळील तिरुवल्लूर येथे कंपनीच्या कारखान्यात होत आहे. या कम्फर्ट क्लास एसयूव्हीची रचना विशिष्ट गतिशील स्वरुपाची आहे. चार रंगांमध्ये ती उपलब्ध आहे आणि वैयक्तिकृत रूप देण्यासाठी तिला काळ्या टपाचा पर्याय देण्यात आला आहे. आज, जागतिक स्तरावर, या ब्रँडचे नेतृत्व त्याच्या "अनोखा आराम" या वैशिष्ट्याने आणि नवीन सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्हीमध्ये असलेल्या सिट्रोएन अॅडव्हान्स्ड कम्फर्ट प्रोग्रामच्या पाच प्रमुख उद्दिष्टांद्वारे प्रतिबिंबित केले गेले आहे:

 

1.      रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी फ्लाईंग कार्पेट इफेक्ट ही प्रगत हायड्रॉलिक कुशन असलेली सस्पेन्शन यंत्रणा खास सिट्रॉनतर्फे विकसीत करण्यात आली आहे.

2.      ताणमुक्त प्रवासाचे वातावरण देणारी आरामदायक यंत्रणा, अॅकॉस्टिक विंडस्क्रीनफ्रंट विन्डो ग्लासेस’, अॅडव्हान्स्ड कम्फर्ट सीट आणि स्वतंत्रपणे स्लाईड करता येण्याजोगी मागील बाजूस असलेली 3 सीट्स ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत. या सीट्सची पाठीकडील बाजू मागे झुकवून संपूर्ण सपाट पातळीवर आणता येतात, त्यायोगे गाडीतील बूट-स्पेस वाढू शकते.

3.      विस्तृत दृष्यमानतेसाठी, प्रकाशमान व हवेशीर केबिन, विशेषतः बाहेरील देखाव्याची विस्मयकारक दृश्ये पाहता येण्यासाठी पॅनोरामिक सनरूफ (शाईन या व्हेरिएंटमध्ये)

4.      प्रवास करताना प्रवाशांना सुखसोयी मिळाव्यात, या गाडीमध्ये इन्ट्युटिव्ह तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये मल्टीपल ड्राईव्ह सरफेस ऑप्शन्ससह अनोखी ग्रिप कंट्रोल सिस्टीम’, ब्लाईंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टीम’, पार्किंग सहाय्यक यंत्रणा (गाडी पार्क करताना केवळ ब्रेक व अॅक्सलेटर यांच्यावरच चालकाला नियंत्रण ठेवावे लागते व गाडी स्वतःच वळते), फूट ऑपरेटेड हॅन्ड्स-फ्री इलेक्ट्रिक टेलगेट(शाईन या व्हेरिएंटमध्ये), इंजिन स्टॉप व स्टार्ट फंक्शन, 31.24 सेमी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले’, 20.32 सेमी इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन, अॅपल कारप्ले आणि अॅंड्रॉईड ऑटो अशा अनेक तांत्रिक सुविधांचा समावेश आहे.

5.      शक्तीशाली आणि तरीही रिफाईन्ड असे 2.0 लिटरचे डिझेल इंजिन, तसेच 8 स्पीड कार्यक्षम स्वयंचलित ट्रान्समिशन. सी5 एअरक्रॉस एसयूव्हीमध्ये या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अशी इंधन कार्यक्षमता, 18.6 किमी प्रति लिटर आहे. (एआरएआय प्रमाणित).

6.      ड्रायव्हिंगच्या व सुरक्षेच्या 10 प्रमुख सुविधांमुळे ग्राहकांना ड्रायव्हिंग करताना आराम मिळतो आणि मानसिक शांतताही मिळते.

 

नवीन सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ ‘पर्ल व्हाईट’, तिजुका ब्ल्यू’, क्युम्युलस ग्रेपर्ला नेरा ब्लॅक या 4 रंगांमध्ये सादर झाली आहे. हे सर्व रंग बॉडी कलर व बाय-टोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विस्तृत स्वरुपाच्या अॅक्सेसरीज या गाडीसोबत देण्यात येतात.

 

ला मेझॉन सिट्रोएनफिजिटल शोरूमला भेट देऊन अथवा www.citroen.in या वेबसाईटवर नोंदणी करून ग्राहक नव्या सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्हीची टेस्ट राईड घेऊ शकतात आणि तिच्यातील अतुलनीय आराम अनुभवू शकतात.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App