कोरोना विरूद्ध लढ्यात एक आशादायी बातमी: दिल्लीतील अत्युच्य आयुर्वेदिक संस्थान ए.आय.आय.ए व ईएसआयसी हॉस्पिटल, फरीदाबाद यांनी केलेल्या डबल ब्लाईंड चाचणीत निसर्गच्या नीमच्या गोळ्यांनी 55% प्रतिबंध झाल्याचे सिद्ध.

 

कोरोना विरूद्ध लढ्यात एक आशादायी बातमी: दिल्लीतील अत्युच्य  आयुर्वेदिक संस्थान ए.आय.आय.ए व ईएसआयसी हॉस्पिटल, फरीदाबाद यांनी केलेल्या डबल ब्लाईंड चाचणीत निसर्गच्या नीमच्या गोळ्यांनी 55% प्रतिबंध झाल्याचे सिद्ध.

       डबल ब्लाइंड चाचणीत निसर्गच्या  नीम कॅप्सूलसची कोव्हिड-19 प्रतिबंधामध्ये 55 टक्के कार्यक्षमता सिद्ध.  


 

फरीदाबाद, 27 एप्रिल 2021: ईएसआयसी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, फरीदाबाद आणि निसर्ग बायोटेक प्रा. लि. सातारा यांनी एआयआयए च्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कोव्हिड-19 रूगणांच्या दैनंदिन निकट संपर्कात येणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचारी तसेच रूगणांचे नातेवाईक यांच्यावर करण्यात आलेल्या निसर्ग हर्बस् नीम कॅप्सूलचे रोग प्रतिबंधात्मक क्षमतेचे अंतिम निष्कर्षांची आज घोषणा केली. हे संशोधन एकूण 190 लोकांवर डबल ब्लाईंड रॅण्डमाईज्ड प्लासिबो कंट्रोल स्वरूपातील होते. हे सर्व लोक कोव्हिड-19 संसर्ग झालेल्यांच्या कायम संपर्कात होते. सदर चाचणीसाठी संपूर्ण आर्थिक सहाय्य हे निसर्ग बायोटेकच्या रिसर्च सेंटर तर्फे करण्यात आलेले आहे.

या संशोधनातील प्रधान अन्वेशक (इन्वेस्टिगेटर) एआयआयए च्या संचालिका प्रा डॉ.तनुजा नेसरी (MD, PhD) व सहअन्वेशक ईएसआयसी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, फरीदाबाद चे डाॅ. ए.के. पांडे (MD) यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट 20 ते डिसेंबर 20 या कालावधीत 18 ते 60 वयोगटातील 190 लोकांवर हे संशोधन करण्यात आले. हे संशोधन इन्स्टिट्यूशनल एथिक्स कमिटीचे मान्यता प्राप्त तसेच सीटीआरआय रजिस्टर्ड आहे. गुड क्लिनिकल प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्वांचे पालन करत सर्व अंतरराष्ट्रीय व स्थानिक नियमांनुसार हे संशोधन पूर्ण करण्यात आले आहे.

संशोधनाअंती असे निदर्शनास आले की 28 दिवसांसाठी निसर्ग नीम कॅप्सूल दिवसातून दोन वेळा दिल्यास कोव्हिड-19 संसर्ग होण्याची शक्यता ही निम्म्याहून म्हणजेच 55% कमी होते. चाचणीतील दोन्ही समूहात बायोमार्कर्स व क्वालिटी ऑफ लाईफ स्थिर राहिलेले दिसून येत आहे. 

सदर चाचणीचे निष्कर्ष जाहीर करताना ईएसआयसी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, फरीदाबाद चे डाॅ. अनिल पांडे म्हणाले, "आयुर्वेद शास्त्राचे विविध आजाराच्या रोग प्रतिबंधांत्मक उपचारासाठी प्रचंड योगदान आहे. कोव्हिड-19 या संसर्गासाठी सद्यस्थितीत विशिष्ठ उपचार उपलब्ध नसताना कोव्हिड-19 विरोधात प्रतिबंधात्मक उपयुक्त उपचाराच्या दिशेने एक उत्तम पाऊल आहे. मला खात्री आहे की लसीकरणाच्या दोन डोसच्या मधील कालावधीत जी संसर्ग होण्याची शक्यता असते, तसेच अतिरिक्त संरक्षण म्हणून संशोधनात वापरलेल्या निसर्गच्या नीम कॅप्सूल अत्यंत लाभदायी ठरतील. कोव्हिड -19 प्रतिबंधासाठी वापरण्यात आलेले हे निसर्ग नीम कॅप्सूल सर्वोत्तम व मान्यताप्राप्त असा सुरक्षित उपचार असल्याचे पाहून आम्हाला आश्वासक व प्रेरणादायी  वाटते."

"बाजारात अनेक सार्स कोव्ह -2 लसींना मान्यता मिळत असली तरी कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे आणि जगभरातील बहुतांश लोकांना अजूनही प्रभावी  प्रतिबंधात्मक उपचारांची गरज आहे. नीमचे हे संशोधन कोव्हिड-19 च्या प्रतिबंधात्मक उपचारासाठी एक वरदानच ठरेल. तरी आरोग्य व्यवस्थापनेनी यात लक्ष घालून पुढील चाचण्या करून कोव्हिड-19 च्या प्रमुख उपचारात याचा काय व कसा उपयोग होऊ शकतो या बद्दल पुढे संशोधन करणे हिताचे ठरेल. निसर्ग हर्ब्सची पेटंट पेण्डिंग नीम कॅप्सूल हे अश्वासक पर्याय ठरेल,'' असे ईएसआयसी मेडिकल कॉलेज अॅण्‍ड हॉस्पिटलचे डीन डॉ. आसिम दास म्हणाले.

निसर्ग बायोटेकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सोमण यांनी सांगितले की, "कोव्हिड-19 प्रतिबंधासाठी डबल ब्लाईंड प्लासिबो कंट्रोल्ड चाचणी वरील दोन नामांकित संस्थांच्या सहयोगाने करणारी निसर्ग बायोटेक ही पहिली लहान खाजगी कंपनी आहे. नीम कॅप्सूलची प्रतिबंध करण्याची क्षमता लसांच्या कार्यक्षमतेच्या जवळपास म्हणजेच 55% एवढी आहे. भारतातील दोन प्रतिष्ठित आयुर्वेद व वैद्यकीय संस्था एआयआयए दिल्ली व ईएसआयसी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, फरीदाबाद यांच्या सहयोगाने हे संशोधन करून एका प्रतिष्ठित अंतरराष्ट्रीय प्रोफेशनल मेडिकल जर्नल पैकी एका जर्नल मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आमच्या नीम कॅप्सूलस् 55% प्रतिबंधात्मक कार्यक्षमतेसह कोव्हिड-19 विरोधी प्रतिबंध उपचारासाठी प्रभावी ॲण्टीव्हायरल असल्याचे सिद्ध झाले आहे. देशामध्ये कोव्हिड-19 च्या दुसर्‍या लाटेने थैमान घातलेले असताना तसेच लस मोठ्या प्रमाणात व सुलभतेने उपलब्ध होइ पर्यंत आमचे नीम कॅप्सूल कोव्हिड-19 प्रतिबंधासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल.

या संशोधनाचे निष्कर्ष तज्ञ डाॅक्टरांनी व वैद्यानिकांनी पडताळणी केल्यानंतर केलेल्या 'अल्टरनेट थेरपीज इन हेल्थ ॲण्ड मेडिसीन' या एका प्रतिष्ठित शास्त्रीय जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येत आहेत. या जर्नल मध्ये USA मधील सर्वांगीण, नैसर्गिक व पर्यायी वैद्यकीय उपचारांची माहीती आहे आणि https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33891569/ येथे ऑनलाइन उपलब्‍ध आहे. या वैद्यकीय संशोधनाबाबत अधिक माहिती क्लिनिकल ट्रायल रजिस्‍ट्री ऑफ इंडिया (सीटीआरआय): http://ctri.nic.in. (CTRI/2020/07/026560) येथे मिळू शकते. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE