मुंबईतील बोरीवली पश्चिम भागात 7 एकर जागेत जलस्त्रोतानजीक निवासी संकुले उभारण्यात सनटेक रियल्टी लिमिटेडचा संयुक्त भागीदारीत प्रवेश; रुपये 1750 कोटींचा महसूल निर्मितीचा अंदाज

 मुंबईतील बोरीवली पश्चिम भागात 7 एकर जागेत जलस्त्रोतानजीक निवासी संकुले उभारण्यात सनटेक रियल्टी लिमिटेडचा संयुक्त भागीदारीत प्रवेश; रुपये 1750 कोटींचा महसूल निर्मितीचा अंदाज

 

प्रकल्पात साधारणपणे 1 दशलक्ष चौ.फू. विकासाची क्षमता

आगामी 4-5 वर्षांत रुपये 1750 कोटी (रु 17.5 अब्ज) महसूल निर्मितीचा अंदाज

सागर दर्शन घडवणारे आलिशान राहणीमान

जेएलएल इंडिया होता खास व्यवहार भागीदार


 
मुंबई, 1 एप्रिल, 2021: सनटेक रियल्टी लिमिटेड हा मुंबईतील बीएसई आणि एनएसई सूचीबद्ध मालमत्ता विकासक असून त्यांनी बोरीवली (पश्चिम) येथील ~7 एकर जमीन भाग संपादित केला आहे. सनटेक रियल्टी लिमिटेडला विशेष निवासी जागेवर आलिशान निवासी प्रकल्प विकसीत करायचा आहे. जेएलएल इंडिया संयुक्त भागीदारीकरिता खास व्यवहार भागीदार होता.
हा निवासी प्रकल्प असेट लाईट जेडीए मॉडेल अंतर्गत संपादित करण्यात आला असून तो पश्चिम उपनगरातील शहरात 7 एकर जागेवर वसलेला असून सुमारे 1 दशलक्ष चौ.फू. विकास क्षमता आहे. आगामी 4-5 वर्षांत या प्रकल्पातून सुमारे रुपये 1,750 कोटींची निर्मिती होण्याचा अंदाज असून त्यामुळे बळकट रोख प्रवाह तसेच कंपनीच्या आर्थिक ताळेबंदीला चालना मिळेल. या प्रकल्पामुळे दूरवर विस्तीर्ण पसरलेले बोरीवली कांदळवने तसेच गोराईपर्यंतचा ग्लोबल विपश्यना पॅगोडा व त्यापलीकडच्या भागाचे दर्शन घडेल.
“या संयुक्त भागीदारीत (जेव्ही) प्रवेश करताना आम्हाला अतिशय आनंद वाटतो. जलस्त्रोताचे दर्शन घडवणारा जमिनीचा तुकडा संपादित झाल्याने विकासाची अभिनव संधी सापडली आहे. जागतिक दर्जाची निवासी उत्पादने निर्माण करण्यात सनटेक ब्रँडने सातत्य राखले आहे. आम्ही आलिशान राहणीमानात सर्वोत्तम दर्जाच्या बांधकाम आणि विकास क्षमतांचे दर्शन घडवू. मायक्रो-मार्केटमध्ये स्वत:ची छाप उमटवणारा आमचा प्रयत्न आहे” असे सनटेक रियल्टी लिमिटेडचे अध्यक्ष कमल खेतान यांनी सांगितले.
"मुंबईतील पश्चिम उपनगरे अतिशय वर्चस्व राखणारी आणि देशातील निवासी बाजारांत सक्रीय उपभोक्ते देणारी समजली जातात. गृह कर्जावरील दरात ऐतिहासिक कपात झाली, रियल इस्टेट क्षेत्रात सरकारने आणलेल्या सवलती त्याचप्रमाणे परवडणाऱ्या किंमती यामुळे मागील काही महिन्यांपासून ग्राहकांचा तयार घरांच्या खरेदीकडे आरोग्यदायक कल दिसून येतो. नवीन शुभारंभ तसेच बांधकामाधिन असलेल्या प्रकल्पांत ग्राहक रस दाखवत असल्याचे चित्र दिसते. विक्रीत कशाप्रकारे आक्रमकता येईल हे बळकट ब्रँडनी पाहणे क्रमप्राप्त ठरेल, असे मत जेएलएल इंडिया, लँड अँड डेव्हलपमेंट सर्विसेस (पश्चिम भारत) सिनियर डायरेक्टर अँड हेड, निशांत काब्रा यांनी मांडले.
बोरीवली पश्चिम हा भाग मुंबईच्या पश्चिम उपनगरात मोडत असून ते सर्वोत्तम निवासी घरांचे केंद्र बनले आहे. या शहराला रस्ते/रेल्वेची चांगली जोड आहे तसेच सामाजिक पायाभूत सुविधा देखील उत्तम आहेत. त्याशिवाय आगामी काळात इथे दहिसर ते डीएन नगरला जोडणारी, पुढच्या काळात विविध मार्गिकांनी अन्य शहरांना जोडणारी 2A मेट्रो लाईन येते आहे. या मेट्रो विकासासोबत सागरी मार्ग प्रकल्प मायक्रो-मार्केटमध्ये परिवर्तनाची लाट आणेल. प्रवासाला लागणाऱ्या वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असल्याने इथे अधिक आकर्षक निवासी आणि व्यावसायिक केंद्र म्हणून नावारूपाला येत आहेत, ज्यामुळेपश्चिम उपनगरांतील हे शहर बळकट होईल.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth