विलिनीकरणाच्या १ वर्षानंतर : राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी पीएनबी २.० झाली अधिक समर्थ

विलिनीकरणाच्या १ वर्षानंतर : राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी पीएनबी २.० झाली अधिक समर्थ
 
मुंबई, १ एप्रिल २०२१ :  भारतीय बँकिंग क्षेत्रात १ एप्रिल २०२० रोजी मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत सार्वजनिक बँकांची संख्या १९ वरून १२ करण्यात आली. पूर्वीच्या ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण होऊन देशातील एक महाबँक तयार झाली असून या बँकेची उलाढाल ₹१८ लाख कोटींहून अधिक आहे.
पीएनबीच्या देशात एकूण १०,८००+ शाखा आहेत, १३,९००+ एटीएम आणि १२,३००+ व्यवसाय प्रतिनिधी आहेत आणि एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचे सक्षम मनुष्यबळ आहे.
 
या महाएकत्रीकरणाच्या पहिल्या वर्धापन दिनी पीएनबीने बिझनेस, लोक आणि तंत्रज्ञान यांचे एकात्मीकरण केले आहे आणि विलिनीकरणाच्या सहयोगितेचे लाभ घेण्यासाठी बँकेला सज्ज केले आहे.
 
या विलिनीकरणानंतर बँकेच्या महत्त्वाच्या प्रगतीवर प्रतिक्रिया देताना पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सीएच. एस. एस. मल्लिकार्जुन राव म्हणाले, “डिसेंबर २०२० पर्यंत विक्रमी कालावधीत आम्ही आमची तंत्रज्ञान एकात्मीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे जेणेकरून २०२१ या वर्षापासून आम्हाला व्यवसाय प्राधान्यांकडे लक्ष केंद्रीत करता येईल. बँक ग्राहककेंद्री व्हावी आणि भविष्याच्या दृष्टीने सज्ज व्हावी यासाठी आम्ही अनेक अंतर्गत प्रक्रिया पुनर्स्थापित केल्या आहेत आणि संस्थात्मक संरचनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. उत्पादने, प्रक्रिया, वितरण माध्यमे यांचे सुरळीत एकत्रीकरण, विशेष युनिट्स आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म यांची स्थापना केल्याने अधिक विस्तारीत उत्पादने आणि अधिक चांगला सेवा अनुभव यांचा ग्राहकांना लाभ झाला आहे.
 
महामारीची परिस्थिती असूनही कोणताही व्यत्यय न येता एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
सर्व भागधारकांसाठी विलिनीकरणाची प्रक्रिया हा एक लक्षणीय प्रवास होता. एकीकडे महामारीने उभ्या केलेल्या आव्हानांवर मात करतानाच विविध कार्यसंस्कृतींचा सुसंवाद, वैविध्यपूर्ण अंतर्गत प्रक्रिया आणि गुंतागुंतीचे तंत्रज्ञान यांचे यशस्वीपणे एकत्रीकरण केले. जवळजवळ शून्य व्यत्ययाविना तंत्रज्ञानाचे स्थानांतरण करण्यात आले. पीएनबीने किमान व्यत्ययाविना ही स्थानांतरणाची अॅक्टिव्हिटी पूर्ण केली आणि आता ग्राहकांना त्यांच्या शाखांमधील विविध सेवा, एटीएम आणि भक्कम डिजिटल माध्यमांचा लाभ घेता येईल.
 
ईशान्य भारतात विस्तारीकरण आणि डिजिटल फर्स्ट दृष्टिकोन
शाखा, व्यवसाय आणि ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत बँकेने ईशान्य भारतात आपले अस्तित्व वाढविले आहे. विस्तृत भौगोलिक भागात अस्तित्व निर्माण केल्यामुळे ग्राहकांना अधिक परिणामकारकपणे आणि सक्षमपणे सेवा प्रदान करण्यास मदत झाली आहे.
बँकेने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या डिजिटल ऑफरिंग्समध्ये (उत्पादने) सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे आणि आपल्या पगारदारग्राहकांना एंड-टू-एंड डिजिटल पूर्वमंजुरी असलेले वैयक्तिक कर्ज, रु.५०,००० पर्यंत ई-मुद्रा कर्ज, ऑनलाइन खाते सुरू करण्यासाठी व्हिडियो केवायसी इत्यादी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
 
उद्योजकता विकास आणि सर्वसमावेशक वृद्धी
ग्रामीण भाग आणि कृषी क्षेत्राला पाठींबा देण्यात आघाडीवर असण्याची भूमिका बजावत असतानाच भारतीय उद्योजकांना चालना देण्याच्या पारंपरिक भूमिकेसोबतच पीएनबी, आर्थिक तणावाखाली असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सहाय्य करत आहे. भारतातील एक आघाडीची सार्वजनिक बँक म्हणून भारतातील स्वतंत्र उद्योजक आणि कॉर्पोरेट्स यांची सर्वसमावेशक आणि संतुलित प्रगती व्हावी याची खातरजमा करण्यासाठी पीएनबीची मोठी आणि अधिक संरचनात्मक भूमिका आहे.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App