गोदरेज प्रोटेक्टची उत्तर रेल्वेसोबत भागीदारी भारतातील २० शहरांमध्ये स्वच्छतेवर भर देणारा सुरक्षित रेल प्रवास कार्यक्रम राबवला जाणार

 गोदरेज प्रोटेक्टची उत्तर रेल्वेसोबत भागीदारी भारतातील २० शहरांमध्ये स्वच्छतेवर भर देणारा सुरक्षित रेल प्रवास कार्यक्रम राबवला जाणार  



मुंबई, २२ एप्रिल, २०२१: व्यक्तिगत तसेच घराच्या स्वच्छतेच्या उत्पादनांचा भारतातील सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड म्हणून नावाजल्या जाणाऱ्या, गोदरेज प्रोटेक्ट या गोदरेज कन्ज्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडच्या ब्रॅंडने भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वेसोबत भागीदारी केली असून, त्यामार्फत स्वच्छतेवर भर देणारा, सुरक्षित रेल प्रवास कार्यक्रम राबवला जाणार आहे.  प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी या दोघांनाही या कार्यक्रमात सामावून घेतले जाणार असून त्यांचे स्वच्छतेचे प्रमाण वाढावे तसेच रेल्वे प्रवासादरम्यान त्यांना स्वच्छता सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.  भारताला सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सहन करावा लागत आहे, अशा परिस्थितीत आवश्यक आणि न टाळता येण्याजोग्या कारणांमुळे रेल्वे प्रवास करावा लागणाऱ्या लोकांना हा उपक्रम प्रवासादरम्यान आवश्यक ती काळजी घेण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम बनवेल.


या कार्यक्रमात लांब पल्ल्याच्या २५ ट्रेन्सना सामावून घेतले जाणार आहे.  या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत - जन शताब्दी स्पेशल, वांद्रे टर्मिनस हरिद्वार स्पेशल, योगा एक्स्प्रेस, डेहराडून शताब्दी स्पेशल, मसूरी एक्स्प्रेस फेस्टिवल स्पेशल, चंदीगढ ते लखनौ फेस्टिवल स्पेशल, धनबाद जंक्शन ते फिरोझपूर कॅनॉट स्पेशल, हावरा जंक्शन ते योग नागरी ऋषिकेश स्पेशल, जी सतलुई एक्स्प्रेस स्पेशल, कोटा डेहराडून स्पेशल एक्स्प्रेस, हेमकुंत एक्स्प्रेस स्पेशल, जयनगर अमृतसर स्पेशल मोरादाबाद सहारनपूर एक्स्प्रेस स्पेशल इत्यादी.  या गाड्या देशातील या २० शहरांमधून सुटतील - मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चंदीगढ, लखनौ, कोटा, बारमेर, बिकानेर, ऋषिकेश, वाराणसी, गोरखपूर, पुरी, जबलपूर, रामनगर, धनबाद, पटना, अलाहाबाद, जयनगर आणि मोरादाबाद.


गोदरेज प्रोटेक्टची जवळपास ४५००० पेक्षा जास्त उत्पादने या उपक्रमामध्ये वापरली जाणार असून, त्याद्वारे लोकांच्या स्वच्छतेशी निगडित सवयींमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले जातील.  वर नावे नमूद करण्यात आलेल्या ट्रेन्समध्ये प्रवाशांना गोदरेज प्रोटेक्ट हॅन्ड सॅनीटायझर बॉटल्स (५० मिलीची मिनी बॉटल) पुरवल्या जातील.  प्रवाशांच्या सामानावर गोदरेज प्रोटेक्ट ऑन-द-गो डिसइन्फेक्टंट स्प्रे फवारून ते डिसइन्फेक्ट केले जाईल.  ट्रेन्समधील रेल्वे कर्मचारी म्हणजे तिकीट तपासनीस, ट्रेनचे चालक, गार्ड्स व स्वच्छता कर्मचारी गोदरेज प्रोटेक्ट पी-डब्ल्यू९५ रियुजेबल फेस मास्क्स घालतील.  उत्तर रेल्वेच्या काही निवडक स्थानकांवर मास्क्स न घातलेल्या प्रवाशांना गोदरेज प्रोटेक्ट पी-डब्ल्यू९५ रियुजेबल फेस मास्क्स दिले जातील.


या उपक्रमाबाबत गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत आणि सार्क देशांसाठीचे सीईओ श्री. सुनील कटारिया यांनी सांगितले की, "सध्याच्या काळात सुरक्षा आणि स्वच्छता यांना ग्राहक सर्वाधिक प्राथमिकता देतात, खास करून प्रवास करताना सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जाते.  ग्राहकांना स्वच्छतेविषयी वाटणाऱ्या चिंता दूर केल्या जाव्यात आणि स्वच्छता बाळगण्याच्या योग्य उपाययोजनांविषयी जागरूकता पसरवण्यात मदत असतील अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जावे हे गोदरेज प्रोटेक्टचे उद्धिष्ट आहे. २०२० मध्ये कोविड-१९ च्या काळात प्रवासातील स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेसोबत सहयोग करणारा पहिला हायजिन ब्रँड होता गोदरेज प्रोटेक्ट.  मध्य रेल्वेसोबत आमची भागीदारी अतिशय यशस्वी ठरली, त्या उपक्रमात आम्ही लोकांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकलो.  यावर्षी उत्तर रेल्वेसोबत भागीदारी करून हा उपक्रम पुढे सुरु ठेवताना आणि सध्याच्या अनिश्चित काळात प्रवासाचे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात योगदान देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  स्वच्छता क्षेत्रातील आमचा आजवरचा अनुभव आणि हॅन्ड सॅनीटायझर्स, डिसइन्फेक्टंट स्प्रेज् व मास्क्स यासारख्या आमच्या प्रमुख प्रोटेक्ट उत्पादनांचा समावेश यांचे बळ या उपक्रमाला मिळणार आहे.


या संयुक्त उपक्रमाविषयी मोरादाबाद येथील उत्तर रेल्वेच्या सिनियर डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर श्रीमती रेखा शर्मा यांनी सांगितले, "स्वच्छ, सुरक्षित प्रवास उपक्रमासाठी गोदरेज प्रोटेक्टसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.  सध्याच्या परिस्थितीत हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे.  देशभरातील विविध शहरांमधून उत्तर रेल्वे नेटवर्कमधील ठिकाणी प्रवास करत असलेल्या प्रवाशांना या उपक्रमाचा लाभ मिळेल.  प्रवासातील स्वच्छता उपक्रमामुळे आमच्या प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, इतकेच नव्हे तर, प्रत्येकाने केल्याच पाहिजेत अशा आवश्यक स्वच्छता उपाययोजनांविषयी जागरूकता देखील निर्माण केली जाईल.  यामुळे लोकांना ट्रेनने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.  आमच्या प्रवाशांचा प्रवास जास्तीत जास्त सुरक्षित, सॅनीटाइज्ड व सुरळीतपणे व्हावा यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."  


या उपक्रमातील काही ट्रेन्स विविध रेल्वे झोन्समध्ये येणाऱ्या असतील, पण सर्व ट्रेन्स उत्तर रेल्वेच्या नेटवर्कमधून प्रवास करणाऱ्या असतील.  महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, चंदीगढ, गुजरात, पंजाब, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि बिहार ही १२ भारतीय राज्ये आणि दिल्ली व चंदीगढ या दोन केंद्रशासित प्रदेशातील प्रवाशांना या उपक्रमाचा लाभ मिळेल. 


गोदरेज प्रोटेक्ट हा उद्देशांना अनुसरून काम करणारा ब्रँड लोकांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी सर्वतोपरी योगदान देत आहे.  गेल्या वर्षीच्या जून महिन्यात प्रोटेक्ट इंडिया हे जनजागृती अभियान चालवले गेले होते, स्वच्छतेला प्रोत्साहन देऊन लोकांना स्वच्छतेच्या योग्य पद्धतींबद्दल माहिती दिली जावी हा या अभियानाचा उद्देश होता.  प्रोटेक्ट इंडियाअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनसोबत भागीदारी करून रेल्वे प्रवासी व कर्मचारी यांना प्रवासातील स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी संयुक्त उपक्रम राबवला गेला.  या उपक्रमात जवळपास ४०० लोकल आणि लांब पल्ल्याच्या कोविड-१९ स्पेशल ट्रेन्सना सामावून घेण्यात आले होते.  यंदाच्या वर्षी प्रोटेक्टने उत्तर रेल्वेसोबत भागीदारी केली असल्याने अधिक जास्त मोठ्या नेटवर्कला या उपक्रमाचे लाभ मिळतील.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202