पीएनजी ज्वेलर्स'तर्फे 'प्युअर प्राईस ऑफर'चे तिसरे पर्व (सीजन-३) सुरू

 'पीएनजी ज्वेलर्स'तर्फे 'प्युअर प्राईस ऑफर'चे तिसरे पर्व (सीजन-३) सुरू


ऑफरमुळे ग्राहकांना  मिळेल सोन्याच्या दरातील अनिश्चिततेपासून सुरक्षा


 पुणे, दि. 25एप्रिल  'पीएनजी ज्वेलर्स' तर्फे अनिश्चिततेच्या काळात निश्चिततेचा आनंद पुन्हा मिळवून  देण्यासाठी 'प्युअर प्राईस ऑफर'चे तिसरे पर्व (सीजन-३) २१ एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. १५ मे २०२१ पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल. 'प्युअर प्राईस ऑफर'च्या या पर्वात ग्राहकांना मिळणारा अतिरिक्त लाभ म्हणजे २२ कॅरेट सोन्यासह डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर सवलत मिळणार आहे.


 एकीकडे उत्सव व लग्नसराईचा काळ सुरू होत असताना, कोविड -१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात  निर्बंध कडक करण्यात आले. अनिश्चिततेच्या  काळात सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे, त्यामुळेच ग्राहकांना सोन्याच्या वाढत्या दरांपासून सुरक्षितता पुरवणे, हे ब्रँडचे  ध्येय आहे. या कालावधीत सध्याच्या किंमतीत डायमंड ज्वेलरी बुक करणार्‍या ग्राहकांना घडणावळीच्या शुल्कावर ५० टक्के सवलत आणि डायमंडच्या किंमतीवर प्रति कॅरेट २००० रुपये इतकी सवलत मिळणार  आहे. याबरोबरच २२ कॅरेट सोन्याचे दागिने बुक करणार्‍या ग्राहकांना घडणावळीवर २५ टक्के सवलत मिळणार आहे. यासाठीचे बुकिंग्ज १५ मे पर्यंत सुरू राहणार असून १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. ब्रँडतर्फे ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना मदत करण्याची जबाबदारी सर्व दालनांमधील स्टोअर मॅनेजर्सना देण्यात आली आहे. ग्राहकांना बँक खाते क्रमांक दिला जाईल, आणि प्री बुकिंगचा व्यवहार पूर्ण केल्यावर त्यांना इमेलद्वारे पावती दिली जाईल.


'पीएनजी ज्वेलर्स'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, उत्सवकाळात सोने खरेदी ही एक परंपरा आहे. अक्षय्यतृतीया जवळच आली आहे, लग्नसोहळे पुढे ढकलले जात आहेत. दरवर्षी या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र सध्याची देशातील परिस्थिती आणि सोन्याच्या किंमतीतील चढ-उतार यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत. ग्राहकांना सोन्याच्या दरांतील चढ-उतारापासून सुरक्षितता देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


'प्युअर प्राईस ऑफर'च्या पहिल्या व दुसर्‍या पर्वाला प्रचंड प्रतिसाद   मिळाला  होता. सध्याच्या  परिस्थितीमध्ये सोन्याच्या दरांमध्ये होणारी वाढ आणि अनिश्चिततेमुळे आम्ही 'प्युअर प्राईस ऑफर'चे तिसरे पर्व घेऊन आलो आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे पुढाकार घेतला आहे आणि ग्राहकांना दागिने खरेदी सुलभ करता यावी, अशी या ऑफरची रचना केली गेली आहे. सोन्याच्या किंमतीतील अनिश्चिततेमुळे आमच्या ग्राहकांनी आपल्या आवडत्या दागिन्यांची खरेदी चुकवू नये, असे आम्हाला वाटते. आमच्या ग्राहकांना धन्यवाद देण्यासाठी व आम्ही कायम त्यांच्या सेवेत तत्पर आहोत, हे सांगण्याकरिता आणि उत्सव व लग्नसराईच्या काळात सोने खरेदी अधिक सुलभ व्हावी, यासाठी ही ऑफर आम्ही आमच्या ग्राहकांसाठी घेऊन  आलो आहेत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202