निटकोतर्फे पंतप्रधान कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) कार्यक्रमांतर्गत गवंडी समुदायाला प्रशिक्षण
निटकोतर्फे पंतप्रधान कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) कार्यक्रमांतर्गत गवंडी समुदायाला प्रशिक्षण
• राजस्थानातील 24 गवंड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लर्नेट स्किल्स लिमिटेडसोबत हातमिळवणी
• प्रशिक्षणादरम्यान फरशांचे प्रकार, फरशा निर्मितीतील कच्चा माल, फरशी निर्माण प्रक्रिया इ. कौशल्यांबाबत निटको तज्ज्ञांचे मार्गदर्शन
• आंध्रप्रदेशमधील दत्तालूर आणि मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे गवंडी समाजासाठी याचप्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची योजना
मुंबई, 28 एप्रिल 2021: विकास पायाभूत सुविधांना पाठबळ देण्यासाठी निटको या अग्रणी इंटिरिअर ब्रँड आणि सरफेस डिझायनिंग कंपनीने देशभरातील गवंडी समुदायासाठी प्रमाणित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकास आणि सुधारणा, रोजगार आणि संधी निर्माण करण्यासाठी पाऊल उचलले आहे. जागतिक दर्जाच्या टाईल्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या या कंपनीने बांधकाम साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या गवंडी समुदायाचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी ‘मेसन टायलिंग’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.
पंतप्रधान कौशल्य विकास योजने (पीएमकेव्हीवाय) अंतर्गत, गवंडी समुदायात नैपुण्य आणि व्यावसायिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी निटकोने भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक कौशल्य कंपनी असलेल्या लर्नेट स्किल्स लिमिटेडच्या सोबतीने राजस्थानातील टोंक येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. अनुभवी गवंड्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना टोंकमधील आगामी मेसन टायलिंग कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सक्षम करणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणारे 35 ते 50 वयोगटातील 24 गवंडी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
निटकोच्या तज्ज्ञांनी टाइल्सची मूलभूत माहिती, त्यांचे प्रकार, टाइल्ससाठी लागणारा कच्चा माल, टाइल निर्मिती प्रक्रिया, टाइल्सचे तपशील आणि उपयोग इ. संबंधी माहिती दिल्याने या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे गवंडी समुदायाचा मोठा फायदा झाला. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी गवंड्यांना मोकळ्या प्रयोगशाळेत टाइल्स लावण्यासाठी घेऊन जाण्यात आले आणि त्यांना स्वत:लाच ते काम करण्याची परवानगीही देण्यात आली.
गवंडी समुदायासाठी यांनतरचा प्रशिक्षण कार्यक्रम आंध्रप्रदेशातील दत्तालूर आणि मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात निटकोतर्फे देशभरात अशा अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
निटको लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक तलवार म्हणाले, “पंतप्रधान कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) या कार्यक्रमांतर्गत लर्नेटसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि बांधकाम साहित्याच्या कामातील अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या गवंडी समुदायाने याला छान प्रतिसाद दिला. टाइल्सची मूलभूत माहिती ते त्यातील तपशील आणि टाइल्सचा उपयोग याबाबत आमच्या तज्ज्ञांनी दिलेल्या ज्ञानाचा त्यांना फायदा झाला. यापासून अनेक लोकांचा फायदा व्हावा आणि अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ची कौशल्ये अद्ययावत करावीत अशी आमची इच्छा आहे. चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतलेल्या, व्यावसायिक आणि प्रमाणित गवंड्यांची फौज तयार करण्यासाठी भारतभरातील मोठ्या समाजापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही भारतातील अनेक भागात अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत.”
Comments
Post a Comment