स्विच मोबिलिटी आणि टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स यांची उत्सर्जनमुक्त लॉजिस्टिक्ससाठी भागीदारी
स्विच मोबिलिटी आणि टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स यांची उत्सर्जनमुक्त लॉजिस्टिक्ससाठी भागीदारी
चेन्नई, २८ एप्रिल, २०२१: व्यावसायिक उपयोगाच्या गाड्यांची भारतीय उत्पादक अशोक लेलँडची उपकंपनी आणि इलेक्ट्रीफाईड बसेस व वजनाला हलक्या, व्यावसायिक उपयोगाच्या वाहनांची विकासक, युकेस्थित स्विच मोबिलिटी लिमिटेडने ("स्विच" किंवा "कंपनी") पर्यावरणस्नेही लॉजिस्टिक्स नेटवर्क निर्माण करण्यासाठी टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्ससोबत (टीव्हीएस एससीएस) भागीदारी केली आहे.
या भागीदारीअंतर्गत टीव्हीएस एससीएस आपल्या लॉजिस्टिक्स संचालनांसाठी आपल्या भागीदारांमार्फत स्विचकडून पुरवल्या गेलेल्या १००० ईएलसीव्हीज् ऑपरेट करणार आहे. टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स (टीव्हीएस एससीएस) आपल्या संपूर्णतः एकात्मिक सेवा उत्पादनांमार्फत गेली दोन दशके जगभरात पुरवठा शृंखला सुविधा प्रदान करत आहे.
स्विच मोबिलिटीचे चेअरमन श्री. धीरज हिंदुजा यांनी या घोषणेबद्दल सांगितले, "टीव्हीएस एससीएसचे उपक्रम नेहमीच आधुनिक विचारांनी प्रेरित असतात व उत्पादने, सुविधांची त्यांची निवड नेहमीच अनोखी असते. कार्यक्षम, खर्चामध्ये बचत करू शकतील अशा, विश्वसनीय उत्सर्जनमुक्त ट्रान्सपोर्ट सुविधांची त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्विच मोबिलिटीला संधी दिली याचा आम्हाला आनंद आहे. भारत आणि परदेशांतही पर्यावरणाला अनुकूल मोबिलिटीचा स्वीकार अधिक जास्त वेगाने केला जावा यासाठी स्विच महत्त्वाची भूमिका बजावेल."
स्विच मोबिलिटीचे डायरेक्टर श्री. नितीन सेठ यांनी सांगितले, "या प्रकारची भागीदारी ग्राहकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास दर्शवते. आम्ही आमची वाटचाल हल्लीच सुरु केली आहे पण आमच्या उत्पादनांना आणि तंत्रज्ञानाला आत्तापासूनच प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या क्षेत्रामध्ये स्विच ऊर्जा बचत करणाऱ्या आणि शून्य उत्सर्जन सुविधा प्रदान करत आहे. ग्राहकांना अशाप्रकारच्या योग्य उत्पादनांची गरज आहे. आम्हाला अभिमान वाटतो की, आम्ही परिवर्तनाचे नेतृत्व करत आहोत आणि पर्यावरणाला अनुकूल, कार्बन मुक्त इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेने सतत पुढे जात आहोत."
टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. आर दिनेश यांनी सांगितले, "भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान ट्रान्स्पोर्टेशनमध्ये आणण्यात अग्रेसर स्विच मोबिलिटीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. टीव्हीएस एससीएस नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यात नेहमी आघाडीवर असते. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात देखील आम्ही आघाडीवर असणे स्वाभाविक होते. तंत्रज्ञानावर आधारित आमच्या सुविधांना अनुकूल ठरावे यासाठी आम्ही इकोसिस्टिममध्ये आमच्या भागीदारांमार्फत नवी ईएलसीव्हीज् आणत आहोत. आमच्या ताफ्यामध्ये ईएलसीव्हीज् आणणाऱ्या पहिल्या कंपन्यांपैकी आम्ही एक आहोत याचा आम्हाला आनंद आहे."
टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री. रवी विश्वनाथन यांनी या भागीदारीबद्दल सांगितले, "आमच्या हितधारकांना अधिक मूल्य प्रदान करणारे नवे उपक्रम सुरु करण्यात टीव्हीएस एससीएस नेहमी आघाडीवर असते. ईएलसीव्हीज् साठी स्विच मोबिलिटीसोबत भागीदारीमुळे आमच्या ड्रायव्हर-कम-गाडीमालकांना भविष्यासाठी सज्ज मोबिलिटी सुविधांचा आधुनिक अनुभव मिळेल, ते आमच्या मोठ्या इकोसिस्टिमचा एक भाग आहेत. या भागीदारीमार्फत टीव्हीएस एससीएस कार्बन फूटप्रिंट मोठ्या प्रमाणावर कमी करून पर्यावरण संरक्षणात लक्षणीय योगदान देईल आणि आमच्या ग्राहकांना देखील सक्षम व विश्वसनीय सेवा प्रदान केल्या जातील."
Comments
Post a Comment