‘गोदरेज मटेरियल हँडलिंग’तर्फे नवीन ‘प्रो सिरीज रीच ट्रक’ सादर


गोदरेज मटेरियल हँडलिंगतर्फे नवीन प्रो सिरीज रीच ट्रक सादर

·         बॅटरीच्या जास्त क्षमतेमुळे, प्रत्येक वेळी चार्ज झाल्यावर ती देते 20 टक्के अधिक काम.

·         10.6 मीटर उंचीपर्यंत 1100 किलो उचलण्याची क्षमता, ही या उद्योगात ठरते सर्वाधिक.

·         ऑल-व्हील ब्रेकिंगमुळे गोदामातील सुरक्षेची सुविधा



 

मुंबई, 16 एप्रिल 2021 : गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी, गोदरेज अॅं बॉयस, हिचा व्यवसाय असलेल्या गोदरेज मटेरियल हँडलिंगने 1.4 ते 2 टन क्षमता असलेले नवीन प्रो सिरीज रीच ट्रक सादर केले आहेत. भारताच्या स्वावलंबनासाठी योगदान देण्याच्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत असलेल्या या नवीन उत्पादनाचे डिझाईन स्वदेशातच करण्यात आले असून त्यामध्ये सुधारित शीतकरण प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यायोगे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानातील कामकाजासाठी ते अधिक विश्वासार्ह आहे.

नवीन प्रो सीरिज रीच ट्रकमध्ये बॅटरीची क्षमता जास्त आहे, त्यामुळे ती चार्ज झाल्यावर 20 टक्के अधिक काम करू शकते. त्यातील अधिक कार्यक्षमतेच्या मोटरमुळे ऊर्जा व उष्णता यांची हानी कमी होते. गोदरेज प्रो सीरिज रीच ट्रकमध्ये असलेल्या बॅटरीच्या 30 टक्के अधिक क्षमतेमुळे ट्रकचे काम 12 ते 14 तास सलग व अखंडीत सुरू राहू शकते. बॅटरी बदलणार्‍या ट्रॉलीसह बॅटरी बदलणारे रोलर्सदेखील त्यात उपलब्ध असल्याने बॅटरी बदलण्याची क्रिया वेगाने व सुरक्षितपणे होते.

नवीन प्रो सीरिज रीच ट्रकमध्ये फिंगरटिप कंट्रोल फंक्शन असल्याने, या यंत्राचे सर्व नियंत्रण ऑपरेटरच्या हाताशी, त्याच्या आवाक्यात राहते. यातील स्मार्ट कर्व्ह स्पीड कंट्रोल टेक्नॉलॉजीमुळे ट्रकच्या मार्गातील वळणे शोधली जातात आणि त्यानुसार ट्रकची गती 30 टक्के इतकी कमी होते. यामुळे अगदी काटेकोर वळणे असण्याच्या ठिकाणीदेखील ट्रक स्थिर व सुरक्षित राहतो. यातील इन्ट्युटिव्ह डिझाईन असलेल्या, 6 प्रकारे अॅडजस्ट होऊ शकणाऱ्या सस्पेन्शनच्या सीट्समुळे या ट्रकवर ऑपरेटर अनेक तास आरामात काम करू शकतो. नादुरुस्तीचा संकेत देणाऱ्या डिस्प्लेमुळे ऑपरेटरला सतत महत्वाची माहिती मिळत राहते.

गोदरेज मटेरियल हँडलिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड अनिल लिंगायत म्हणाले, “आमच्याकडील रीच ट्रक्सच्या पोर्टफोलिओमध्ये या अत्याधुनिक उत्पादनाची भर पडल्याने आम्ह आनंदीत आहोत. विशेषत: भारतीय परिस्थितीसाठी उत्पादने तयार करण्याच आमच प्रयत्न असतात, त्या अनुषंगाने नवीन प्रो सीरिज रीच ट्रकच्या सहाय्याने आपण आता 10.6 मीटर उंचीपर्यंत 1100 किलो वजनाचा भार उचलू शकतो. ही एवढी क्षमता या उद्योगामध्ये सर्वात जास्त ठरते. हे नवीन उत्पादन विकसत करताना, आम्ही भारतीय मानववंशशास्त्रविषयक माहितीचा विचार केला, तसेच गोदामांमधील कामाची परिस्थिती, र्जा वाचवणाऱ्या सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह यंत्रांची वाढती गरज याविषयी खूप विचार केला. ही नवीन मालिका देशभरातील थ्री-पीएल, -कॉमर्स, रिटेल, फार्मा, रसायन आणि अन्न व पेय क्षेत्रातील सामग्री हाताळणीची कार्यक्षमता सुधारण्या योगदान देईल, अशी आम्ही आशा करतो. आमच ग्राहक देशभरात विखुरलेले आहेत. विशेषत: मध्यम व लहान शहरांमध्ये त्यांचा कारभार असतो. तसेच, बहुतांश मोठ गोदामे शहरांबाहेरील भागात असतात. त्या दृष्टीने आम्ही संपूर्ण भारतभरात एक व्यापक ग्राहकसेवा नेटवर्क स्थापित केल आहे. त्यातून ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा प्रभावीपणे पुरवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे.

गोदरेज मटेरियल हँडलिंग ही कंपनी भारतातील सर्वात मोठी लिफ्ट ट्रक्सची उत्पादक आहे. 25-टन क्षमता असणारी इलेक्ट्रिक व डिझेल काउंटर बॅलन्स फोर्कलिफ्ट, विशिष्ट अॅप्लिकेशन्ससाठीचे वेअरहाऊस ट्रक व विशेष ट्रक, अशा विविध प्रकारच्या हाताळणीसाठी लागणारी उत्पादने कंपनीकडे उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth