ऑनलाइन व्यवहारासाठी सार्वजनिक वायफायचा वापर टाळावा

 ऑनलाइन व्यवहारासाठी सार्वजनिक वायफायचा वापर टाळावा




महाराष्ट्रातील सायबरसुरक्षा तज्ञ आणि उद्योजक, निखिल एस. महाडेश्वर यांचे विचारः कोकण विकास युवा मंचातर्फे ‘मोबाईल सायबर सुरक्षेचे महत्व व सायबर सुरक्षा कशी पाळावी’ कार्यक्रम


दि.८ एप्रिल: “आज आर्थिक सायबर गुन्हेगारीबाबत मोबाइल वापरणार्‍यांमध्ये पुरेशी जागरूकता दिसून येत नाही. युजर्सच्या कार्डचे सर्व डिटेल्स, युपीआय पिन, बँक खात्याचा क्रमांक आणि पासवर्ड सुरक्षीत आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहारासाठी सार्वजनिक ठिकाणच्या वायफायचा वापर करू नये. यासाठी देशात जनप्रबोधनातून सायबर सुरक्षेची एक संस्कृती तयार करणं गरजेचे आहे.” असे विचार स्कायनेट सॉफ्टटेक प्रायवेट लिमिटेडचे को-फाउंडर आणि सीटीओ तसेच सायबर सुरक्षा तज्ञ निखील महाडेश्वर यांनी व्यक्त केले.

 कोकण विकास युवा मंचातर्फे ‘मोबाईल सायबर सुरक्षेचे महत्व आणि सायबर सुरक्षा कशी पाळावी’ या विषयावर आयोजित फेसबूक लाईव्ह या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या प्रसंगी कोकण विकास युवा मंचाचे संस्थापक अजय यादव हे उपस्थित होते.

सायबर सुरक्षा तज्ञ निखील महाडेश्वर म्हणाले,“ सध्या ऑनलाइन व्यवहारातील जास्तीत जास्त व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. सध्या अशा गोष्टींच्या माध्यमातून आपली खाजगी माहिती जाहीर करीत असतो. यातून आपल्या संबंधीच्या एक एक बारीक सारीक माहितीचा तपशील एकत्र करून त्यावर पटकन पृथक्करन करून एक अहवाल तयार होतो. याचा दुरूपयोग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मोठा आर्थिक व सामाजिक नुकसान होण्याची शक्यता असते.”

“ हॅकर हा सार्वजनिक वाय फाय तात्पुरते जॉम करून अल्पावधीत तशाच प्रकारचे आपले स्वतंत्र नेटवर्क निर्माण करून आपली गोपनिय माहिती चोरतो. त्यामुळे आपण अजिबात त्याचा वापर करू नये. तसेच स्वतःचा कम्प्यूटर किंवा मोबाइल नेटचाच वापर करावा. दुसर्‍यांचा नेट वापरून कोणतेही व्यवहार करू नयेत असा सल्ला ही त्यांनी दिला.”

“ फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, युटुब्स यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती या माध्यमातून आपली खरी किंवा खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे डेटा असतो. ज्या गोष्टीसाठी इंटरनेटची आवश्यकता आहे अशा सर्व गोष्टी सायबर या सदराखाली येतात. त्यामध्ये वैयक्तिक माहितीची गोपनीयता म्हणजे सायबर सुरक्षा असते. सर्वांनी लक्षात ठेवावे की आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्टी स्वतःची खाजगी माहिती असते. त्यामुळे फोन डिजिटल लाईफ मध्ये सतत भिती वाटत असते. अशावेळेस आपली माहिती गुप्त ठेवण्यासाठी फोन व अ‍ॅपला पासवर्ड ठेवावा.”

“ हॅकर आपला डाटा घेऊन त्याचा दुरपयोग करू शकतो. उदा. म्हणजे लॉटरी लागली याचा मेसेज येतो. त्यानंतर हॅकर तुमच्याकडून सर्व माहिती घेतो. त्याच प्रमाणे सध्याच्या काळात डेटिंग अ‍ॅप्स ही ट्रीलियन डॉलसचिी इंडस्ट्रीज बनली आहे. यात धोका अधिक आहे. कधी कधी यामध्ये आपल्या जीवावर बेतणार्‍या घटना घडू शकतात. गुगल ड्राइव्ह वापरणे सेफ आहे परंतू फोन हॅक झाला असेल तर हॅकरकडे तुमची सर्व माहिती असते व तो त्याचा वापर करू शकतो. हॅकर हा सदैव बल्क टार्गेंट, सुरवातीपासूनच लक्ष्य निर्धारित केलेली व्यक्ती किंवा त्याचा मोटिव काय आहे यावर आधारित असतो.”

अ‍ॅपल फोन पूर्ण पणे सुरक्षित आहे. पण ते १०० टक्के सुरक्षीत आहे असेही म्हणू शकणार नाही. असेही ते म्हणाले.

स्कायनेट सॉफ्टटेक प्रायवेट लिमिटेडचे को-फाउंडर आणि सीटीओ तसेच सायबर सुरक्षा तज्ञ निखील महाडेश्वर यांनी स्वतः एक अ‍ॅप तयार केला आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून आपल्याला वायफाय सुरक्षा मिळते. अ‍ॅप्सला मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर सायबर हॅकिंगचे जे प्रकार होतात ते थाबविण्यास मदत होते. तसेच, मोबाईलमध्ये दुसरे कोणतेही अ‍ॅप्स डाऊनलोड करतांना तो अ‍ॅप सांगतो की हे डाऊनलोड करायचे का नाही.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय यादव यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202