श्री. शिवसुब्रमण्यन रामन यांनी सिडबीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला

 

श्री. शिवसुब्रमण्यन रामन यांनी सिडबीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला


 

मुंबई: सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांचा प्रसार, वित्तसहकार्य आणि विकाससाठी काम करणाऱ्या स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) या बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार श्री. शिवसुब्रमण्यन यांनी स्वीकारला. आजपासून तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

 

या पूर्वी श्री. रामन यांच्याकडे नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड (NeSL) या भारतातील पहिल्या इन्फॉर्मेशन युटिलिटीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार होता. श्री रामन हे १९९१ च्या बॅचमधील इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस (IA&AS) अधिकारी आहेत. एनईएसएलपूर्वी श्री. रामन हे २०१५-२०१६ या वर्षासाठी झारखंडचे प्रदान लेखापाल होते. भारत सरकारकडे डेप्युटेशनवर असताना २००६ ते २०१३ या कालावधीसाठी त्यांनी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदाची जबाबदारीही सांभाळली होती.

 

श्री. रामन यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी आणि एमबीए पदवी संपादित केली आहे. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून एलएलबी, एमएससी इन रेग्युलेशन, फ्लोरिडामधील इन्स्टिट्यूट ऑफ इंटरर्नल ऑडिटर्स या संस्थेतून सर्टिफाइड इंटर्नल ऑडिटर आणि सिक्युरिटीज लॉ या विषयात पदव्युत्तर पदविका असे त्यांची व्यावसायिक अर्हता आहे.

 

त्यांच्या नेतृत्वाखाली क्रेडिट प्लस, डिजिटल डिलाइट आणि एमएसएमई परिसंस्था बळकटीकरणासह आत्मनिर्भर भारताच्या मिशनला चालना देण्याचे सिडबीचे व्हिजन नवनवी शिखरे गाठेल, अशी अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24