फायनान्सपीरने सुरु केले ग्लोबल अड्वायजरी बोर्ड

 

 

 

फायनान्सपीरने सुरु केले ग्लोबल अड्वायजरी बोर्ड

 

फायनान्सपीर अड्वायजरी बोर्डच्या माध्यमातून जागतिक शिक्षण क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करवून देत आहे.

 

५ एप्रिल, २०२१:  आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि महागड्या फीची चिंता यांच्या कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना आता सुटकेचा निश्वास टाकता येईल.  फायनान्सपीर या गुगलकडून इन्क्युबेट करण्यात येत असलेल्या स्कूल-फी फायनान्सिंग कंपनीने शिक्षण क्षेत्रातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्था, तज्ञ विचारवंत आणि महत्त्वाच्या हितधारकांसोबत समन्वयाच्या योजनांची घोषणा केली आहे.  भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपले स्थान अधिक जास्त मजबूत करण्याच्या दीर्घकालीन योजनेचा भाग म्हणून जागतिक पातळीवर फायनान्सपीरने हे पुढचे पाऊल उचलले आहे.

 

एफपीचे व्यवस्थापकीय मंडळाचे संचालक श्री. अर्चिस मित्तल हे फायनान्सपीरच्या ग्लोबल अड्वायजरी बोर्डाचे नेतृत्व करत असून नॉर्वेयन नोबेल कमिटीचे माजी उपाध्यक्ष डॉ. हेनरिक स्यास हे त्याचे अध्यक्ष आहेत.  विविध क्षेत्रांतील नामवंत तज्ञांचा फायनान्सपीरमध्ये समावेश आहे.  जागतिक पातळीवर विस्तार करण्यासाठी संघटनेला मार्गदर्शन आणि नेतृत्व त्यांच्याकडून पुरवले जाईल.  या मंडळामध्ये ट्रिनिटी चर्च वॉल स्ट्रीटचे एमडी रॉब गॅरीस, अब्दुल लतीफ जमील एज्युकेशन लॅब मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ विजय कुमार, ग्लोबलगिविंगचे सीईओ एलिक्स गुरियर आणि लिन्कलेटर्सचे माजी व्यवस्थापकीय भागीदार पीटर रेमेर आणि इतर दिग्गजांचा समावेश आहे. 

 

या नव्या घडामोडींबद्दल फायनान्सपीरचे सीईओ श्री. रोहित गजभिये यांनी सांगितले, "परदेशी शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे.  आज महामारीनंतरच्या काळात देखील आंतरराष्ट्रीय शिक्षणाची मागणी प्रचंड मोठी आहे.  दर्जेदार शिक्षणाच्या उपलब्धतेमध्ये सुधारणा व्हावी हा आमच्या सेवासुविधांचा उद्देश आहे.  जागतिक पातळीवर हा उपक्रम हाती घेतला गेल्याने अनेक विद्यार्थ्यांना सकारात्मक लाभ मिळतील याची आम्हाला खात्री आहे.  नवनवीन देशांमध्ये प्रसार करणे हा आमच्या विकास धोरणाचा महत्त्वाचा भाग असेल."

 

समन्वय आणि भागीदारी यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर फायनान्सपीरचे स्थान बळकट करण्यात अड्वायजरी बोर्ड धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.  फायनान्सपीरचे सह-संस्थापक श्री. सुनीत गजभिये यांनी सांगितले, "जागतिक पातळीवरील अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज करतो.  हा अनुभव त्यांच्या एकंदरीत जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणतो.  अड्वायजरी बोर्डामुळे आम्हाला दीर्घकालीन विकास योजना तयार करता येतील आणि तो आमच्यासाठी खूप मोठा आधार ठरेल."

नॉर्वेयन नोबेल कमिटीचे माजी उपाध्यक्ष व आता अड्वायजरी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. हेनरिक स्यास यांनी सांगितले, "आपल्या सेवासुविधांमधून फायनान्सपीर सामाजिक प्रभाव घडवून आणत आहे आणि या संघटनेसोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे.  कोविड लॉकडाउन असून देखील  येत्या वर्षांमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत जाईल.  आमची अपेक्षा आहे की हा आलेख असाच उंचावत जाईल आणिआम्ही या विद्यार्थ्यांना फीसाठी आर्थिक साहाय्य सुविधा पुरवून सक्षम करत राहू."  डॉ. विजय कुमार हे जगभरातील अत्याधुनिक व आघाडीच्या शिक्षणसंस्थांसोबत कार्यरत आहेत.

 

फायनान्सपीरचे मार्गदर्शक व सल्लागार, अभिनेते श्री. विवेक ओबेरॉय म्हणाले, "फायनान्सपीरने एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवण्यास सुरुवात केली आहे.  आम्हाला खात्री आहे की, या उपक्रमामुळे दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करता येईल." 

 

या निमित्ताने फायनान्सपीरने सर्व हितधारकांचे व्हर्च्युअल एकत्रीकरण आयोजित केले होते.  यावेळी विविध महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संधींबाबत चर्चा करण्यात आली.  शिक्षण, व्यवसाय क्षेत्रातील अनेक नामवंत तसेच गुंतवणूकदार देखील या एकत्रीकरणामध्ये सहभागी झाले होते.   

 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202