बिसलेरीतर्फे सुरक्षित आणि स्वच्छ मिनरल पाण्याच्या प्रचारासाठी नवे #समझदारबिसलेरीपितेहै कॅम्पेन

 

बिसलेरीतर्फे सुरक्षित आणि स्वच्छ मिनरल पाण्याच्या प्रचारासाठी नवे #समझदारबिसलेरीपितेहै कॅम्पेन

 

82.5 कम्युनिकेशन्सने तयार केलेल्या या नव्या बिसलेरी कॅम्पेनद्वारे ग्राहकांना दर्जेदार आणि स्वच्छ पद्धतीने तयार केलेले सुरक्षित मिनरल पाणी खरेदी करण्याविषयी जागरूक करणार


 

मुंबई, 19 एप्रिल 2021 – बिसलेरी या आघाडीच्या आणि मिनरल पाणी क्षेत्रातील भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडने समझदार बिसलेरी पिते है हे सर्वसमावेशक कॅम्पेन (अभियान) तयार केले आहे. ग्राहकांचा विश्वास मजबूत करण्यासाठी आणि त्यांना बाजारपेठेत उपलब्ध असलेले अस्सल बिसलेरी व इतर नकली उत्पादनांमधील फरक समजावून देण्यासाठी हे कॅम्पेन तयार करण्यात आले आहे.

 

आजचा ग्राहक उत्पादने निवडताना जागरूक, शिक्षिक आणि सजग असतो, मात्र पाण्याच्या बाबतीत काही गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होते, कारण त्यांना अज्ञात, प्रक्रिया न केलेले मिनरल पाणी पिण्यात अडचण वाटत नाही. या कॅम्पेनद्वारे ग्राहकांना सजग करण्याचा आणि बिसलेरीसारखा विश्वासार्ह ब्रँड निवडण्याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांनी इतर कोणत्याही, उत्पादनाचे, स्वच्छतेचे कडक नियम न पाळणाऱ्या ब्रँडचा अवलंबन न करण्याचा सल्ला या कॅम्पेनच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

 

कॅम्पेनच्या जाहिरातीत बिसलेरीचा बादल आणि त्याचा तहानलेला स्वार दिसतो. दुकानात थांबल्यानंतर दुकानदार त्याला बिसलेरी मागितल्यानंतरही दुसरेच बाटलीबंद पाणी देतो. स्वार पाणी पिणार इतक्यात बादल त्याला अडवतो आणि तो पित असलेले पाणी सुरक्षित नसल्याचं सांगतो, वर अस्सल बिसलेरी विकणारं दुकानसुद्धा दाखवतो. त्यानंतर बादल सांगतो, की समझदार बिसलेरी पिते है आणि तो स्वार ओशाळतो.

 

पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होत असलेल्या एका जाहिरातीमधे उंटांनी भरलेल्या एका वर्गात सगळे जण शिक्षकांची थट्टा उडवत असतात, कारण त्यांनी एका उंटाला खट्याळपणा केल्याबद्दल शिक्षा केलेली असते. ते पुढे होऊन माठातले पाणी पिणार इतक्यात सगळा वर्ग जोरात हसायला लागतो, कारण त्यांचे शिक्षक अस्वच्छ पाणी पित असतात. आधी शिक्षा केलेला ऊंटही शिक्षकांना बिसलेरीच्या संपर्कविरहीत आणि स्वच्छ पद्धतीनं बाटलीबंद केल्या जाणाऱ्या पाण्याची माहिती नसल्याबद्दल चिडवतो.

 

नव्या कॅम्पेनविषयी बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या विपणन विभागाचे संचालक अंजना घोष म्हणाले, आमच्या ब्रँड अम्बेसिडरला परत आणून नवी गोष्ट स्क्रीनवर दाखवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बिसलेरीने कायमच आपल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि महत्त्वाच्या गरजा पूर्ण करत, ज्ञानाचा प्रसार करत व सुरक्षितता वाढवत ब्रँडसाठी महत्त्वाचे विविध टप्पे पार केलेले आहेत. मिनरल पाण्याच्या क्षेत्रात सर्व बॉटल्स समान दिसतात, मात्र त्यांच्या निर्मिती प्रक्रियेमधे खूप फरक असतो आणि त्याविषयी ग्राहकांना शिक्षित करून योग्य निवड करण्यास चालना देणे आवश्यक आहे. ग्राहक स्नेही कंपनी या नात्याने आम्ही यापूर्वीच  बिसलेरी@डोअरस्टेप सेवा लाँच केली आहे, ज्यामुळे ग्राहकाची सोय हील, शिवाय योग्य निवड- बिसलेरी मिनरल पाणी निवडण्याची क्षमता मिळेल. या कॅम्पेनमधे हीच गोष्ट समझदार बिसलेरी पिते है या नव्या संकल्पनेसह अधोरेखित करण्यात आली आहे.

82.5 कम्युनिकेशन्सने हे कॅम्पेन तयार केले असून कंपनीचे ईसीडी आणि क्रिएटीव्ह प्रमुख (मुंबई) अनुराग खंडेलवाल म्हणाले, गेल्या कॅम्पेनमधे आमच्या समजूतदार उंटांना प्रत्येक बाटलीबंद पाणी बिसलेरी नाही हे माहीत होते आणि या वेळेसही उंट माणसे योग्य बाटलीबंद पाणी निवडताना कसे निष्काळजी असतात हे दाखवून देणार आहेत. या कॅम्पेनमधे माणसांवर करण्यात आलेल्या गमतीदार टीकेशिवाय ऊंट बिसलेरी ही चांगली निवड असल्याचे वास्तव परत अधोरेखित करताना दिसतील.

बिसलेरी मिनरल पाण्याचा प्रत्येक थेंब कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रातील वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेल्या आधुनिक, कठोर, 10 पायऱ्यांच्या दर्जाविषयक प्रक्रियेतून जातो. त्याशिवाय या पाण्यावर उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर 114 दर्जाविषयक चाचण्या केल्या जातात आणि त्याचवेळेस आरोग्यासाठी फायदेशीर खनिजे (मिनरल्स) समाविष्ट केली जातात. बिसलेरी पाण्यावर मिनरलायझेशनची विस्तृत प्रक्रिया केली जाते आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक समाविष्ट केले जातात. त्याचप्रमाणे उत्पादन आणि पॅकेजिंग प्रक्रिया संपर्कविरहीत तसेच सुरक्षितता व शुद्धतेचे सर्व निकष पूर्ण करणारी असल्याची खात्री केली जाते.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth