भारतातील पहिल्या लसीकरण मंच पर्यायाकरिता अपोलो लॉजिसोल्यूशन्स’ची इंडिगो एअरलाईन्स आणि युनिसेफ वेंचर्सचे आर्थिक पाठबळ

 भारतातील पहिल्या लसीकरण मंच पर्यायाकरिता अपोलो लॉजिसोल्यूशन्स’ची इंडिगो एअरलाईन्स आणि युनिसेफ वेंचर्सचे आर्थिक पाठबळ


 लाभलेल्या स्टाट्विंग समवेत भागीदारीची घोषणा  


 कोविड-19 पारदर्शकता तसेच उत्तम शोध (ट्रॅकिंग) आणि तपास (ट्रेसिंग)साठी पुरवठा साखळीतील मुख्य मातब्बरांसमवेत भागीदारी  
हा मंच लशीचा शोध आणि तपास, कस्टडी मॅनेजमेंट चेन आणि तापमान एकसारखे राखण्यात  साह्यकारी ठरू शकतो  

 


1 एप्रिल, 2021: अपोलो लॉजिसोल्यूशन्स(ALS), हा एकात्मिक लॉजिस्टीक पर्याय पुरवठादार असून त्याच्या वतीने तंत्रज्ञान, शीतगृह गोदामे, औषधनिर्मिती, आरोग्य, हवाईसेवा आणि विमानतळ क्षेत्रातील मातब्बरांसमवेत त्यांच्या नवीन ‘एकात्मिक लस वितरण मंचा’करिता भागीदारीची घोषणा केली. अपोलो लॉजिसोल्यूशन्सचे ध्येय आपल्या नवीन पर्यायांसमवेत सध्याच्या भारतातील कोविड-19 लस वितरण रचनेला वृद्धिंगत करण्याचे आहे. त्यांनी अगोदरच युनिसेफचे पाठबळ असलेल्या ब्लॉकचेन टेक्नोलॉजी फर्म स्टाट्विंगसोबत तंत्रज्ञान क्षमतांकरिता भागीदारी केली आहे; कोल्डमन, कूल सोल्यूशन्स आणि अन्य महत्त्वाच्या कंपन्या प्रभावी शीतसाखळी गोदामांच्या 70,000+ हाताळणी क्षमतेसह भारतात 10 ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच हवाई वाहतुकीकरिता जीएमआर-हैदराबाद विमानतळ आणि इंडिगो हवाई सेवा उपलब्ध आहे.  

इंडीगो ही भारतात अग्रगण्य हवाई सेवा प्रदान करत असून जगात अल्प दरातील वेगाने वाढणारी कंपनी आहे.  देशाच्या लसीकरण मोहिमेत इंडिगोने खारीचा वाटा उचलला आहे. ही कंपनी देशातंर्गत लसींची वाहतूक करून महत्त्वाची भूमिका बजावते. इंडिगो समवेत अप्पोलो लॉजिसोल्यूशन्सने भागीदारी करत जगाच्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला हातभार लावून चालना देण्याची योजना आहे.    

अपोलो लॉजिसोल्यूशन्स’चा ‘एकात्मिक लस मंच पर्याय’ हा सर्वांकष पुरवठा साखळीतील आव्हानांना समोर ठेवून डिझाईन करण्यात आला आहे. जेणेकरून देशात प्रभावी कोविड-19 लस वितरणाकरिता अधिकाधिक पारदर्शक आणि प्रभावशाली शोधला चालना मिळेल.

नवीन पर्यायांची घोषणा करत अपोलो लॉजिसोल्यूशन्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजा कंवर म्हणाले की, “कोविड-19 विरोधात सर्वांचे लसीकरण करण्याच्या मोहिमेला साह्य करणारे पर्याय उपलब्ध करून देणे अपोलो लॉजिसोल्यूशन्सकरिता अभिमानाची बाब आहे. आम्ही अगोदरच उद्योग क्षेत्रातील काही विश्वासू नावांसमवेत भागीदारी केली. कोविड-19 लसीकरिता प्रभावी सर्वांकष वितरण मंचाची निर्मिती करण्याच्या आमच्या वचनाचा भाग म्हणून हा मंच अधिकाधिक वेगवान होण्यासाठी सहभागी घटक वाढविण्यावर लक्ष देण्यात येईल.”

ते पुढे म्हणाले की, “भारताची वृद्धी होताना, लॉजिस्टीक क्षेत्राला चालना देण्याची, नवीन गोष्टी आत्मसात करण्याची आणि परिवर्तनाची आवश्यकता ही व्यवसाय तसेच ग्राहकांची गरज असते. अपोलो लॉजिसोल्यूशन्स नवीन तंत्रज्ञान, साधने आणि सर्वोत्तम कार्यवहन दाखल करून असमान क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने जिद्दीने काम करते आहे, जेणेकरून हे क्षेत्र भविष्यासाठी सज्ज होऊन चांगल्या कार्यक्षमतेने चालेल.”

स्टाट्विंगचे संस्थापक सिद चक्रवर्ती म्हणाले की, “जागतिक लस निर्मितीत 60% उत्पादन हे भारतात होते. एकात्मिक पर्यायांसह लशीच्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळ्यांत गुणवत्ता आणि सुरक्षेची खातरजमा राहते. आपण भारतीय लस बाजारपेठ अधिक बळकट आणि शाश्वत करू शकतो.”

त्यासोबतच सध्याच्या भागीदारांसमवेत अपोलो लॉजिसोल्यूशन्स विविध स्थानिक आणि केंद्र सरकार प्रशासन तसेच मंत्रालयांसमवेत आरोग्य देखभाल आणि औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसमवेत सामील झाली असून त्यांना देखील मुख्य मंचावर आणेल.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth