दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेच्या Saras-3D कंपनीने “Genius 3D Learning” सेवा केली भारतात सुरु

 

 

दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेच्या Saras-3D कंपनीने

Genius 3D Learning” सेवा केली भारतात सुरु



मुंबई, एप्रिल, २०२१ : आज Saras-3D, inc या अमेरिकन कंपनीने विज्ञान गणित विषयांचे सखोल आकलन होण्यासाठी स्टिरीस्कोपिक 3D तंत्रज्ञानावर आधारित सुविधा आहे, जी भारतामध्ये प्रथमच Saras-3D कंपनीने सुरु केली आहेया तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता दुप्पट वेगाने वाढण्यास मदत होणार असून, त्यामुळे उत्कृष्ट गुणवत्ता शैक्षणिक उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहेहि सुविधा CBSE, ICSE, SSC, HSC बोर्ड साठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहेहि सुविधा दहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी  तयार केली असून JEE/NEET साठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे.

‘Genius 3D Learning’ सुविधेचे भारतात उद्घाटन करत असताना भारतीय वंशाचे कंपनीचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन दामा म्हणाले कि, ‘Genius 3Dहे अनेक वर्षांच्या संशोधनानंतर तयार करण्यात आले असून हे तंत्रज्ञान उच्च पद्धतीचे आकलन होण्यासाठी तसेच उद्याचे भविष्य असणारे विद्यार्थी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविण्यास आणि आपले कौशल्य सिद्ध करून संशोधनात यशस्वी होण्यास मदत करणार आहेहे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करत असून त्यामुळे उच्च गुणवत्तेचे शिक्षण, विषयाचे सखोल ज्ञान आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे."

‘Genius 3D’ हे तंत्रज्ञान अमेरिकेच्या Saras-3D, inc या कंपनीचे पेटंट प्रॉडक्ट असून भारतातील विद्यार्थ्यांसाठी खास पद्धतीने बनवलेले आहेयामध्ये खास तज्ञ शिक्षकांनी दिलेले 3D लेक्चर तसेच जगभरातील आघाडीच्या विदयापिठातील तज्ञ शिक्षकांकडून यांचे पुनरावलोकन केले आहेतसेच यामध्ये 3D मॉडेल्स, सिम्युलेशन सारख्या सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेतयामध्ये शेवटी प्रश्नोत्तरे, सारांश, सिद्धांत अहवाल एकत्रित करण्याची सुविधा देण्यात आलेली आहेत्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे सक्रिय दृष्टिकोन ठेवण्यास मदत होणार आहे.

अत्यंत सोप्या पद्धतीत Genius 3D Learning’अप्लिकेशन, Genius 3D बुस्टर बॉक्स, 3D चष्मा आणि मॉनिटरचा समावेश केला आहेहि सुविधा विंडोज सिस्टीम (लॅपटॉप/कॉम्पुटर) सोबत जोडली जाऊ शकते. हे तंत्रज्ञान वैयक्तिक वापरासाठी तसेच शाळा, क्लासेस यासाठीसुद्धा वापरण्यास उपलब्ध आहे.  ‘Genius 3D’ या सुविधेची विक्री सेवा भारतामध्ये 3D Edtech Pvt. Ltd. या कंपनीद्वारे केली जाणार आहे3D Edtech Pvt. Ltd. हि Saras-3D, inc ची भारतातील उपकंपनी आहे.

3D Edtech चे संस्थापक सदस्य तांत्रिक संचालक कश्यप माणकड म्हणाले कि, " ‘Genius 3D Learning’ च्या साहाय्याने आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्तम शिक्षण पद्धती भारतात सादर करत आहोत. आम्ही विद्यार्थ्यांना अत्यंत सुलभ रीतीने समजण्यास मदत होणारे डिजाईन तयार केलेले असून, विद्यार्थी माउसचा उपयोग करून सखोल पद्धतीने मध्ये 360º संकल्पना अनुभव करू शकतातत्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास उच्च प्रतीचे ज्ञान वाढविण्यास मदत होणार आहेSaras-3D च्या अनुभवी तज्ञ शिक्षकांनी या अभासी तंत्रज्ञानाची प्रतिकृती तयार करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहेत्यामुळे आम्ही आज भारतातील विद्यार्थ्यांसाठी 3D तंत्रज्ञानाचा अनुभव उपलब्ध करत आहोत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना योग्य पद्धतीने आकलन होण्यास मदत होणार आहे."

Saras-3D चे संस्थापक आणि इतर सहकारी मूळचे भारतीय वंशाचे असून त्यांनी उच्च पदवीचे शिक्षण कोलंबिया, हारवर्ड, MIT, केम्ब्रिज सारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठातून पूर्ण केलेले आहेत्यांच्याकडे जागतीक स्तरावर प्रसिद्ध अश्या AT & T बेल लॅबोरेटरी, वेरिझॉन, सिस्को, नोकीया सारख्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करण्याचा अनुभव आहेत्यांनी Saras-3D, inc ची स्थापना उच्च गुणवतेचे जागतीक स्तरावरचे शिक्षण 3D तंत्रज्ञानामध्ये उपलब्ध करण्यासाठी केली आहेत्याचा फायदा निश्चितच भारतातील तरुण पिढीला, विशेष करून दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202