बँकिंग स्टॉक्समध्ये घसरण; सेन्सेक्स ६३ अंकांनी घसरला

 बँकिंग स्टॉक्समध्ये घसरण; सेन्सेक्स ६३ अंकांनी घसरला


मुंबई, ३ मे २०२१: भारतीय बेंचमार्क निर्देशांक आजच्या सत्रात फ्लॅट स्थितीवर आला. बारापैकी सहा क्षेत्रीय निर्देशांक घसरले. निफ्टीने थोडी उच्चांकी स्थिती घेत ०.०२१% किंवा ३.०५ अंकांनी वाढ घेतली व तो १४,६३४.१५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.१३% किंवा ६३.८४ अंकांची घसरण घेतली व तो ४८,७१८.५२ अंकांवर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की टॉप निफ्टी गेनर्समध्ये एसबीआय लाइफ (५.४३%), भारती एअरटेल (४.५३%), अदानी पोर्ट्स (४.५१%), टाटा स्टील (३.२०%) आणि मारुती (२.२४%) यांचा समावेश झाला. तर याउलट, टॉप निफ्टी लूझर्समध्ये टायटन (४.५६%), इंडसइंड बँक (२.२९%), आरआयएल (१.९३%), अॅक्सिस बँक (१.५९%) आणि बीपीसीएल (१.३४%) यांचा समावेश झाला.

लार्सन अँड टुर्बो लि.: एलअँडटीचे स्टॉक्स ०.१५% नी वाढले व त्यांनी १,३४२.३० रुपयांवर व्यवहार केला आणि सर्वात चांगली कामगिरी करणारा आयटी स्टॉक ठरला. आगामी मल्टिपल आर्थिक वर्ष २२ मधील फर्मचे मूल्यांकन पाहता ते सध्यापेक्षा ३० पटींनी अधिक असेल.

श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.: फर्मच्या स्टॉकनी ८.४०% नी वाढ घेतली व त्यांनी १,५२३.८० अंकांवर व्यापार केला. कंपनीने वित्तीय वर्षाच्या अंतिम तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ नोंदवली. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २९८.२८ कोटी रुपये झाला.

एयू स्मॉल फायनान्स बँक लि.: फर्मच्या स्टॉकमध्ये ७.९४% ची घट झाली व त्यांनी ९२४.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या मालमत्ता गुणवत्तेत तीव्र घट झाल्याने हे परिणाम दिसले. कंपनीचा ग्रॉस एनपीए ४८% नी वाढला व स्लिपेजेस अंदाजे ७५% पर्यंत घसरला.

येस बँक लि.: येस बँकेच्या शेअर्समध्ये ४.१२% ची घट झाली व त्यांनी १३.९५ रुपयांवर व्यापार केला. बँकेला वित्तवर्ष २१ च्या चौथ्यात तिमाहीत ३,८०० कोटी रुपयांचा तोटा झाला व तो अपेक्षेपेक्षा तीन पटींनी जास्त झाला.

कोटक महिंद्रा बँक: कोटक महिंद्राचे स्टॉक्स १.०२% नी घसरले व त्यांनी १,७३१.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा एकत्रित नफा २,५८९.०० कोटी रुपये व वार्षिक स्तरावर तो ३५.९% जास्त असूनही हे परिणाम दिसून आले.

सुप्रीम इंडस्ट्रीज लि.: फर्मने महसूलात ४५.७% ची वृद्धी दर्शवून तो २०८४.६ कोटी रुपये नोंदवला. त्यानंतर तिचे शेअर्स ३.६३% नी वधारले व त्यांनी २,१२४.०५ रुपयांवर व्यापार केला. फर्मचा एकत्रित निव्वळ नफा ४५०.४ कोटी रुपयांवर पोहोचला.

भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारातील अस्थिर सत्राच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत दिवसातील उच्चांकी ७३.९३ रुपयांचे मूल्य गाठले.

जागतिक बाजारातील स्थिती: आशियाई स्टॉक्सनी आज हळूवार सुरुवात केली तर युरोपियन स्टॉक्स हिरव्या रंगात स्थिरावले. एफटीएसई १००चे स्टॉक ०.१२%, एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.०८% नी वाढले. तर निक्केई २२५ चे शेअर्स ०.८३% आणि हँगसेंगचे शेअर्स १.३८% नी घटले.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth