रिअल इस्टेट क्षेत्र कोविड -१९ च्या तिसऱ्या लाटीच्या आधी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यास आक्रमक

 रिअल इस्टेट क्षेत्र कोविड -१९ च्या तिसऱ्या लाटीच्या आधी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यास आक्रमक


कोविड -१९ महामारीची दुसरी लाट पहिल्यापेक्षा रिअल इस्टेट क्षेत्रावर अधिक ‘विनाशकारी’ ठरली आहे ज्यामुळे या वर्षाच्या एप्रिलपासून नवे लाँच व विक्रीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. देशातील विविध राज्यांत स्थानिक लॉकडाऊनमुळे प्रकल्प विलंब होण्याची भीती आढळली आहे. या कालावधीत रिअल इस्टेट उद्योगाने काही महत्त्वाची आव्हाने हाताळली जसे की कामगारांची कमतरता, आर्थिक अडचणी, मंजुरी विलंब, कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढ आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे ग्राहकांची दुर्बल मागणी.

जसेजसे रिअल इस्टेट उद्योग हा महामारीच्या तिसऱ्या लाटीसाठी तयार होत आहे, तसेतसे त्यांच्या मनातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कार्यशक्तीला शक्य तितक्या लवकर लसीकरण करणे आहे. नरेडको आणि क्रेडाई सारख्या उद्योग संस्थांनीही बांधकाम ठिकाणी मजुरांना लसी देण्यास परवानगी देण्यासाठी सरकारला पत्र लिहिले आहे.

कामगारांच्या लसीकरणा बद्दल श्री. अशोक मोहनानी, अध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र म्हणाले, “जुलै-ऑगस्ट च्या सुमारास कोविड -१९ महामारीच्या तिसर्‍या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही उद्योग-वेतन कामगारांसाठी लसीकरण स्लॉट्स मिळवण्यासाठी सरकारबरोबर जवळून कार्य करत आहोत. यापुढे आम्ही बांधकाम स्थळांवर मजुरांना लसी देण्यास परवानगी देण्यास शासनालाही पत्र लिहिले आहे. लसीकरण मोहिम वेगाने पार पडल्यास तिसर्‍या लाटेचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल."

त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करत श्री. प्रीतम चिवूकुला, सह-संस्थापक आणि संचालक, त्रिधातू रियल्टी आणि मा. सचिव, क्रेडाई-एमसीएचआय म्हणाले, "आम्ही सर्व कामगारांना लवकरात लवकर लसी देण्याची आशा करतो जे खऱ्या अर्थाने या देशाचे विकसक आहेत. त्यांच्या लसीकरणामुळे बांधकाम उपक्रमे सुरळीत होतील आणि भारतातील लोकांच्या स्वप्नातली घरे पूर्ण होण्यास मदत होईल."

दुसऱ्या लाटेचा आढावा घेता विकसकही सावध झाले आहेत आणि शक्य तितक्या लवकर त्यांच्या कर्मचार्‍यांना लसी देण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहेत.

द वाधवा ग्रुप, भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपन्यांपैकी एक आणि मुंबईतील एक प्रमुख रिअल्टी प्लेयर आपल्या कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने लसीकरण करीत आहे. पहिल्या टप्प्यात, विकसकाने कमीतकमी एक डोस घेऊन त्यांच्या कार्यशैलीच्या जवळजवळ दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे आणि लवकरच दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कर्मचार्‍यांना लसी देण्याची योजना आखत आहे. विकसकाने नमूद केले की सर्व प्रमुख सहकारी, त्यांचे कुटुंबे आणि संपूर्ण कार्य व्यवस्थेतील प्रणाली चे लवकरात लवकर लसीकरण करणे ही त्यांची प्राथमिकता आहे.

मुंबईतील आणखी एक प्रख्यात विकसक, ग्रुप सॅटेलाइटने अंधेरी येथील त्यांच्या व्यावसायिक केंद्र सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क येथे आठवड्याभरात ऑन-प्रिमाइसेस लसीकरण मोहीम राबविली. ग्रुप ने लसीकरण मोहिम सुलभ करण्यासाठी अपोलो क्लिनिकबरोबर भागीदारी केली होती. लसीसाठी नोंदणीकृत 50 पेक्षा जास्त कार्यालयातून 4500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.

या उपक्रमाबद्दल भाष्य करताना श्री अभिषेक जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सॅटेलाईट डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड म्हणाले, “ग्रुप सॅटेलाईट आपल्या कर्मचार्‍यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे आणि या धर्माच्या अनुषंगाने सर्व शासकीय मान्यताप्राप्त प्रोटोकॉलच्या काटेकोरपणे ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. कंपनी ने आपल्या कर्मचार्‍यांना तसेच त्यांच्या कॉर्पोरेट पार्कातील सदस्यांना लसी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे.”

मुंबईतील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक जेपी इंफ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही मुंबईतील अंधेरी पूर्व येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात लसीकरण मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेदरम्यान, कंपनीने त्यांचे कर्मचारी, ग्राहक आणि चॅनेल पार्टनर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन वेगवेगळ्या टप्प्यात असे सुमारे 1500 लोकांना लसी दिल्या. लसीकरण मोहिमेस सुलभ करण्यासाठी कंपनीने सुराणा ग्रुप ऑफ हॉस्पिटल बरोबर भागीदारी केली.

या उपक्रमावर भाष्य करताना श्री. शुभम जैन, व्यवस्थापकीय संचालक, जेपी इन्फ्रा मुंबई प्रा. लिमिटेड म्हणाले, “आमचे कर्मचारी, ग्राहक आणि भागीदार हे आमचे विस्तारित कुटुंब आहे आणि त्यांचे कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. हे सर्व भागधारक आमच्या संस्थेची खरी मालमत्ता आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की ऑनसाईट लसीकरण या प्राणघातक विषाणूपासून त्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असेल. लसीकरण झालेल्या इकोसिस्टममुळे आम्ही केवळ सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर कमी ताण ठेवणार नाही तर जगाला जगण्याचे उत्तम आणि निरोगी ठिकाण बनवू.”

गेल्या वर्षी सरकारने धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रातील व्यवसायांना त्यांच्या कर्मचार्‍यांच्या डोससाठी लसी उत्पादकांशी थेट बोलणी करण्याची सूचना दिली. भारतातील बर्‍याच मोठ्या संघटना खासगी आरोग्य सेवा प्रदात्यांसह आणि काही प्रकरणांमध्ये सरकारी लसीकरण केंद्रांच्या भागीदारीद्वारे आपल्या कर्मचार्‍यांना लसी देण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

मार्चमध्ये कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे आलेल्या लॉकडाऊन बंदीमुळे कामगारांना मुंबई शहरात काम थांबविणे भाग पडले होते, पण आता वेळेवर लसीकरणाने ह्या विषाणूवर हल्ला करण्यास उद्योग जगत तयार असल्याचे दिसते.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24