ऑरीक या नव्या युगाच्या आयुर्वेदिक आरोग्य आणि सुदृढता विषयक स्टार्टअपने प्री-सिरीज-ए-फंडींगमधून उभारले 2 मिलियन युएस डॉलर

ऑरीक या नव्या युगाच्या आयुर्वेदिक आरोग्य आणि सुदृढता विषयक स्टार्टअपने प्री-सिरीज-ए-फंडींगमधून उभारले 2 मिलियन युएस डॉलर

·         कॅक्टस व्हेंचर पार्टनर्स, व्हेंचर कॅटलिस्ट्स आणि 9 युनिकॉर्नस् प्रणीत प्री-सिरीज ए फंडची उभारणी 

·         नवीन भांडवलाचा विनियोग उत्पादन विकास/वृद्धि, ब्रँड बांधणी आणि नवीन लोकांची नियुक्ती करण्याकरिता

 

27 जुलै, 2021: ऑरीक हा देशाचा झपाट्याने वाढणारा आयुर्वेदावर आधारित असलेला समकालीन आरोग्य आणि सुदृढता विषयक ब्रँड असून अलीकडेच नव्याने स्थापन करण्यात आलेला अर्ली-स्टेज व्हेंचर फंड कॅक्टस व्हेंचर पार्टनर्स, भारताचा पहिला आणि सर्वात एकात्मिक इन्क्यूबेटर आणि चालना देणारा व्हेंचर कॅटलिस्ट्स प्रणीत 2 मिलियन युएस डॉलर प्री-सिरीज ए फंडची उभारणी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या निधी उभारणीत 9 युनिकॉर्नस्, कार्तिक भट व्हाया एंजललिस्ट आणि कॅपिटल-ए (मंजुश्री व्हेंचर्स) यासारख्या अन्य प्रसिद्ध गुंतवणुकदारांनी सहभाग घेतला. या ताज्या भांडवलाचा वापर नवीन उत्पादन विकास, ब्रँडची उभारणी आणि नवीन लोकांच्या नियुक्तीकरिता करण्याचा ऑरीकचा मानस आहे.

दीपक अगरवाल यांनी 2018 मध्ये ऑरीकची स्थापना केली, ऑरीक हा सुरुवातीला नवीन आणि महत्त्वाकांक्षी डायरेक्ट टू कन्झ्युमर (डी2सी) ब्रँड होता. त्यांनी आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेदाची सांगड घालत अभिनव आणि सुलभ जीवनशैली उत्पादनांची निर्मिती केली. जागतिक दर्जाच्या ग्राहक उत्पादनांच्या 5 बिलियन डॉलर्सच्या आयुर्वेद आणि पूरक घटक उद्योगात झगमगता विजेता होण्याचे ध्येय बाळगलेले आहे.

निधी उभारणीच्या यशाबद्दल बोलताना ऑरीकचे संस्थापक दीपक अगरवाल म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या स्थापनेपासून आम्ही युवा वर्गाच्या दैनंदिन जीवनशैलीला साजेसे आयुर्वेदिक सादर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याकरिता जे मोलाचे संशोधन करून ठेवले आहे, तो खजिना नव्या पिढीला उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मनापासून वचनबद्ध आहोत. ही निश्चित वेळेतील निधी उभारणी नक्कीच उपयुक्त ठरणार असून आमच्या सभोवताली असलेल्या व्यक्तिंचे मन, शरीर आणि आत्म्याशी जोडण्याच्या दिशेने उचललेले हे एक पाऊल म्हणता येईल.

ऑरीक कन्झ्युमर गुड्स अँड सप्लीमेंट (ग्राहक वस्तू आणि पूरक उत्पादने) ची विस्तृत उत्पादन श्रेणी उपलब्ध करून देते. त्यांच्याकडे त्वचेचे सौंदर्यवर्धक करणारी आणि सुदृढता राखणारी, संतुलित वजन आणि मजबूत केसांकरिता आयुर्वेदाने-प्रेरित, आरोग्यदायी, नारळाचे पाणी असलेल्या पेयांची विस्तृत उत्पादन श्रेणी आहे. कंपनीने मॉर्निंग मसाला टी, टर्मरिक कॉफी आणि अश्वगंधा हॉट चॉकलेट अशी आयुर्वेद आधारित गरम पेये लॉन्च केली आहेत.

या गुंतवणुकीबद्दल बोलताना कॅक्टस व्हेंचर पार्टनर्सचे सह-भागीदार अनुराग गोयल म्हणाले की, “नवीन पिढीला आधुनिक डिजीटल आणि वितरण माध्यमातून आपले आयुर्वेदाचे प्राचीन भारतीय तंत्र दीपकच्या उद्दिष्टासमवेत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. कोविड-पश्चात जगासाठी ही एक वैशिष्ट्यपूर्ण, समर्पक देणगी म्हणावी लागेल. कारण लोक आरोग्य आणि सुदृधतेविषयी सजग झाले आहेत. ऑरीक टीमसमवेतच्या या प्रवासाचा भाग होताना आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की, जगातील एक अग्रगण्य आयुर्वेदिक ब्रँड होण्याच्या दिशेने ऑरीकने उभारणी केली आहे.

प्री-सिरीज-ए-इन्व्हेस्टमेंट फेरीविषयी बोलताना व्हेंचर कॅटलिस्ट्सचे सह-संस्थापक डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले की, “आयुर्वेद आणि वैज्ञानिक सर्वोत्तमतेच्या वचनावर स्वार होत ऑरीकने नव्या दमाचा ब्रँड दाखल केला आहे. गरजेनुरूप आणि अभिनव उत्पादनांच्या झगमगत्या उत्पादन श्रेणीसह 5 बिलियन डॉलरच्या आयुर्वेद बाजारात वादळ निर्माण करण्याची क्षमता ऑरीककडे आहे. ऑरीकच्या संस्थापक टीमने दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन त्यादिशेने आपली आगेकूच करत, अद्वितीय जिद्दीचे प्रदर्शन करत, वैविध्यपूर्ण क्षमतांवर आधारलेल्या कंपनीवर विश्वास दाखवला. या निधी उभारणीमुळे कंपनीला उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी मदत मिळणार असल्याने आम्ही फार आनंदी आहोत. त्यांच्या भविष्यातील प्रवासात प्रत्येक पावलावर त्यांना खात्रीने पाठबळ देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचा आनंद वाटतो. त्यांच्याकरिता यशाची कामना करतो. कारण ते या यशाचे खरे मानकरी आहोत.”    

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy