ग्राहकांच्या वाढत्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी एअरटेलने आपले पोस्टपेड प्लॅन्स सुधारित केले आहेत

 

 

 

 

ग्राहकांच्या वाढत्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी एअरटेलने आपले पोस्टपेड प्लॅन्स सुधारित केले आहेत


मुंबई, 24 जुलै 2021: भारतातील संप्रेषण सुविधा प्रदान करणार्‍या आघाडीच्या भारती एअरटेल (“एअरटेल”), कंपनीकडून कॉर्पोरेट व सर्वसाधारण ग्राहकांसाठी नवीन पोस्टपेड प्लॅन्सची घोषणा केली.

महामारीनंतरच्या जगामध्ये उच्च-गती डेटाची मुबलक उपलब्धता असणे ही ग्राहकांची प्रमुख आवश्यकता बनत आहे; कारण वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण ही नव्या जगाची ओळख आहे. यावर तोडगा म्हणून एअरटेलने आपल्या पोस्टपेड प्लॅन्सना सोपा आकार देऊन ५जी तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या नेटवर्कच्या आपल्या क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या डेटा लाभांसह जबरदस्त डिजिटल-प्रथम स्वरूपाची ग्राहक सेवा असलेली सेवा देण्याची योजना आखली आहे. या प्लॅन्समध्ये बंडल्ड कंटेट आणि बिझनेस वाढवण्याचे टूल्स देखील आहेत.

एअरटेलचे नवीन कॉर्पोरेट पोस्टपेड प्लॅन्स

एअरटेल बिझनेसचे संचालक आणि सीईओ असलेले अजय चित्कारा म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत एअरटेलने स्पेक्ट्रम, आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि ५जी सज्ज व सुरक्षित नेटवर्क बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांचा डिजिटल युगातील परिवर्तनाचा प्रवास सुकर होईल. आमचे नवीन पोस्टपेड प्लॅन्स अप्रतिम कनेक्टिव्हिटी प्रदान करतात आणि सोबत आमच्या ग्राहकांच्या महामारीनंतरच्या जगातील कार्यशीलतेशी संबंधित आवश्यकतांची पूर्तता करतात.”

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App