आनंद ग्रुप व मांडो कॉर्पोरेशनने आनंद मांडो ईमोबिलिटी ही नवी भागीदारी कंपनी स्थापन केल्याची घोषणा केली


आनंद ग्रुप मांडो कॉर्पोरेशनने आनंद मांडो ईमोबिलिटी ही  

नवी भागीदारी कंपनी स्थापन केल्याची घोषणा केली

नवी दिल्ली, २७ जुलै, २०२१आनंद ग्रुप मांडो कॉर्पोरेशन हे नव्याने उदयास येत असलेल्या / चाकी इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेला मोटर आणि कन्ट्रोलर यांचा पुरवठा करण्यासाठी सज्ज आहेत.

या दोन कंपन्यांची सर्वात पहिली भागीदारी १९९७ साली झाली होती, त्यावेळी त्यांनी आधुनिक ब्रेक यंत्रणा तयार करण्यासाठी मांडो ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमएआयपीएल) ही कंपनी स्थापन केली होती२०१२ साली आनंद ग्रुपने मांडो स्टीयरिंग सिस्टिम्स इंडिया लिमिटेडमध्ये हिस्सेदारी घेऊन ही भागीदारी अधिक दृढ केलीतेव्हापासून आजतागायत ही भागीदारी सातत्याने वाढत जाऊन मजबूत होत आहे.

/ चाकी पॉवरट्रेन इलेक्ट्रिफिकेशनमधील निर्माण होत असलेल्या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी भारतातील वाहनांचे सुटे भाग आणि यंत्रणा बाजारपेठेत प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे या दोन्ही भागीदारांचे मानणे आहे. / चाकी दुचाकी ऍप्लिकेशन्ससाठी इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग आणि यंत्रणा तयार करण्यासाठी आणि त्यांचे मार्केटिंग करण्यासाठी आनंद मांडो ईमोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड ही, भारतातील  आपली दुसरी भागीदारी कंपनी सुरु करण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या क्षमता आणि दीर्घ अनुभव यांचा उपयोग करण्याचे त्यांनी ठरवले आहेमांडोच्या अभियांत्रिकी क्षमतांचा वापर करून ही नवी भागीदारी कंपनी तंत्रज्ञानदृष्ट्या सुधारित उत्पादन उपलब्ध करवून देईल. भागीदारी कंपनीत जास्त म्हणजे ६०% हिस्सेदारी आनंद ग्रुपची असेल तर उरलेली ४०% हिस्सेदारी मांडो कॉर्पोरेशनची असेल.

वाहनांचे विद्युतीकरण केले जाणे ही भारत सरकारची राष्ट्रीय स्तरावरील प्राथमिकता आहे चाकी वाहनांसाठी सरकारने येत्या काही वर्षात महत्त्वाकांक्षी इलेक्ट्रिफिकेशन उद्धीष्ट्ये आखली आहेतया संदर्भात 'स्कीम फॉर फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिक वेहिकल्स इन इंडिया' - फेम II अंतर्गत विविध प्रोत्साहनपर लाभांसहित दुचाकी, तीनचाकी आणि बसेसच्या विद्युतीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे

अधिक शुद्ध आणि शाश्वत पर्यावरणाप्रती आनंद ग्रुप आणि मांडो कॉर्पोरेशनच्या वचनबद्धतेला अनुसरून अशी ही भागीदारी आहे आयातीला स्थानिक पातळीवरील किफायतशीर पर्याय उपलब्ध करवून देऊन आनंद मांडो ईमोबिलिटी भारत सरकारच्या 'आत्मनिर्भर' अभियानामध्ये सहयोग देईल उपलब्ध असलेली इकोसिस्टिम आणि प्रोत्साहनपर लाभ यांचा जास्तीत जास्त अनुकूल वापर करून घेण्यासाठी राजस्थानमध्ये कारखाना उभारला जात आहे.   तब्बल ६०००० चौरस फीट क्षेत्रावर हा सर्व परिसर विकसित केला जात असून भविष्यात त्याचा विस्तार करण्यासही वाव आहेयाठिकाणी जवळपास ३५०-४५० लोकांना रोजगार मिळेलपुढील तीन वर्षात उत्पादन अभियांत्रिकी परीक्षण आणि उपकरणांचे उत्पादन या क्षेत्रांमध्ये ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक करण्याची योजना आहे.

भारतातील विविध प्रकारच्या किचकट ड्रायव्हिंग स्थितींना अनुसरून, अगदी कमी वेगाच्या स्कुटर्सपासून ते वेगवान मोटारबाईक्सपर्यंत आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांपासून ते मालवाहतुकीच्या तीनचाकी गाड्यांपर्यंत सर्व वाहनांना सेवासुविधा पुरवण्याचे आनंद मांडो ईमोबिलिटीचे लक्ष्य आहेदोन तीनचाकी वाहनांच्या बाजारपेठेसाठी मोटर आणि कन्ट्रोलर यांच्या जुळणाऱ्या जोडीच्या स्वरूपात एक प्रचंड मोठे, विश्वसनीय आणि कार्यक्षम पॉवरट्रेन तयार करण्यावर ही कंपनी आपले लक्ष केंद्रित करेल.

चापल्य आणि व्यवसायाचा विकास होण्याचा वेग यातील यश उल्लेखनीय आहे - मांडो कोरियामध्ये संकल्पना प्रमाणित करण्यापासून ते भारतात उत्पादन बाजारपेठेत दाखल करण्यापर्यंत रचना, विकास, सप्रमाणीकरण, उत्पादन कारखाना उभारणे आणि उत्पादन सुरु करणे हे सर्व महिन्यांपेक्षा कमी कालावधीत करण्यात आले आहेव्यवसाय संकल्पनेपासून उत्पादन सुरु होण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात सर्वोत्कृष्टतेवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे, ज्यामुळे जागतिक दर्जाची उत्पादन सुविधा निर्माण झाली आहे.

२०२५ सालापर्यंत ५०० कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचे उद्धिष्ट गाठण्याची आनंद मांडो ईमोबिलिटीची महत्त्वाकांक्षा आहे. दोन आघाडीच्या दुचाकी ईव्ही ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्ससाठी ऑक्टोबर २०२१ पर्यंत हब मोटर लॉन्चसाठी तयार होईल२०२२ च्या मध्यापर्यंत सेंटर/मिड-ड्राइव्ह मोटरसोबत उत्पादने दाखल करणे सुरु राहील आणि त्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारांचा ओघ सुरु होईल.

आनंद ग्रुपच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती अंजली सिंग यांनी सांगितले, "सध्या आपल्यासमोर असलेल्या पर्यावरणात्मक आव्हानांची आनंद ग्रुपला चांगलीच जाणीव आहे आणि हे जग अधिक जास्त हरित जगण्यासाठी अधिक चांगली जागा बनावे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोतजगातील सर्वोत्तम भागीदारांसोबत सहयोग करण्यासाठी आणि भारतीय ओईएमना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतोसर्वोत्कृष्ट मिळवण्याच्या ध्यासातून पर्यावरणानुकूल पद्धतीने मूल्य निर्माण करण्याच्या आनंद ग्रुपच्या भविष्यकालीन उद्धिष्टांच्या प्रमुख तत्वांना अनुसरूनमांडो कॉर्पोरेशनसोबत  भागीदारी करण्यात आली आहेमला पक्की खात्री आहे की, ही दीर्घकालीन भागीदारी  भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी कार्यक्षम उत्पादने, यंत्रणा यशस्वीपणे निर्माण करण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या क्षमता, नैपुण्ये यांचा लाभ घेत अधिकाधिक विकसित होत राहील."

मांडो ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सह-अध्यक्ष श्री. जैसल सिंग यांनी सांगितले, "इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागांसाठीची बाजारपेठ २०३० सालापर्यंत जवळपास २२% सीएजीआरने वाढण्याची शक्यता आहेभारतात मोटर कंट्रोलर सुट्या भागांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठीच्या अभियांत्रिकी क्षमता आणि तंत्रज्ञान आनंद मांडो ईमोबिलिटीकडे आहेजागतिक दर्जाची उत्पादन सुविधा उभारणीसाठी आणि सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ तैनात करण्यासाठी आम्ही जी गुंतवणूक करत आहोत त्यावरून माझी खात्री आहे की, आम्ही प्राधान्यक्रम दिले जाणारे पुरवठादार बनू आणि २०२५ सालापर्यंत ५०० कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचे उद्धिष्ट साध्य करूभारतात ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या विद्युतीकरणासाठी भारत सरकारने जे उद्धिष्ट आखले आहे त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेला खूप प्रोत्साहन मिळाले आहे, खासकरून फेम इंडिया योजनेची अंमलबजावणी या क्षेत्रासाठी खूपच प्रोत्साहक ठरत आहेभविष्यातील पिढ्यांना निरोगी शुद्ध पृथ्वी मिळावी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असलेल्या या सर्व विकासाचा एक भाग बनणे आमच्यासाठी स्वाभाविक होते."

मांडो कॉर्पोरेशनचे प्रेसिडेंट रिप्रेझेंटेटिव्ह डायरेक्टर श्री. सीओंग ह्येओन चो यांनी सांगितले, "गेल्या दोन दशकांमध्ये मांडो कॉर्पोरेशन आणि आनंद ग्रुप यांनी भागीदार म्हणून एकत्र काम करत एकमेकांसाठी क्षमता निर्माण केल्या आहेतभारतात दुचाकी आणि तीनचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहने खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत, ज्यामुळे भारतात हरित गतिशीलता उपक्रमांना चालना मिळत आहेवेगाने वाढत असलेल्या भारतीय ईव्ही बाजारपेठेसाठी दोन आणि तीन चाकी मोटर्सशी संबंधित नवीन तंत्रज्ञानांसाठी आनंद ग्रुप या अतिशय उत्तम भागीदारांसमवेत आणखी एक संयुक्त उपक्रम सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहेवाहन तंत्रज्ञानामध्ये घडून येत असलेल्या या अपरिहार्य परिवर्तनाला सहयोग देणे यासाठी आनंद मांडो ईमोबिलिटी वचनबद्ध आहेभारतात वाहन चालवण्यासाठी उपलब्ध असलेल्या परिस्थिती वेगवेगळ्या आणि किचकट स्वरूपाच्या आहेत, त्यामुळे दोन आणि तीन चाकी वाहन बाजारपेठेत प्रचंड शक्तिशाली, विश्वसनीय आणि कार्यक्षम पॉवरट्रेन उत्पादने सादर करण्याची अनोखी संधी आम्हाला मिळाली आहेदोन्ही भागीदारांच्या क्षमतांचा लाभ घेत आनंद मांडो ईमोबिलिटी कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही मोटर्स मोटर कंट्रोलर्सचे उत्पादन करू शकेल स्कुटर्स, बाइक्सपासून ऑटो रिक्षा मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकीपर्यंत खूप विशाल श्रेणीला सेवा उत्पादने पुरवू शकेल."

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy