कोटक लाईफ च्या वतीने यंदा पॉलिसीधारकांकरिता ४१% वाढीव बोनसची घोषणा

 कोटक लाईफ च्या वतीने यंदा पॉलिसीधारकांकरिता 

४१% वाढीव बोनसची घोषणा  

मुंबई, २२ जुलै, २०२१: कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (कोटक लाईफ)च्या वतीने आर्थिक वर्ष २०२०-२१करिता पात्र सहभागी पॉलिसीधारकांकरिता रु. ५९१ कोटींच्या बोनसची घोषणा करण्यात आली. आर्थिक वर्ष २०१९-२०साठी ४१% इतका वाढीव बोनस जाहीर झाला आहे.
 
हा बोनस पारंपरिक (विथ-प्रॉफीट) पॉलिसींवर लागू असून कंपनीच्या विथ-प्रॉफीट फंड अंतर्गत जमा झालेल्या रकमेवरील अतिरिक्त लाभ आहे, जो विथ-प्रॉफीट पॉलिसीधारकांसाठी असेल. प्रत्येक आर्थिक वर्षाला जाहीर होणारा बोनस एकत्रित होऊन पॉलिसी परिपक्व झाल्यावर किंवा पॉलिसीतून बाहेर पडताना देण्यात येतो. तसेच खास बोनस देखील पॉलिसी अटींनुसार विशिष्ट प्रसंगी दिला जातो.     

त्याशिवाय, कोटक लाईफ हा उद्योगक्षेत्रामधील आर्थिक वर्ष २०२०-२१ करिता सर्व सातत्याने चालू असलेल्या पर्यायांमध्ये प्रीमियम आणि पॉलिसी संख्या अशा दोन्हीसाठी सर्वोत्तम क्रमवारी राखून आहे. कोटक लाईफने १३ वा मासिक परसिस्टन्सी रेशियो (जसे की, पहिला नूतनीकरण प्रीमियम) प्रीमियम आधारावर ८९.६१% गाठला, जी आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यानची ४.७0% हून अधिक नोंदवण्यात आलेली वाढ ठरली. पॉलिसी संख्येच्या आधारे विचार केल्यास, कोटक लाईफ’ ने साल-दरसाल २.६८% वाढीवर ८३.४२% चा परसिस्टन्सी रेशियो गाठला.

कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महेश बालसुब्रमण्यम म्हणाले की, "एक लाईफ इश्यूरन्स कंपनी म्हणून आम्ही कायमच ग्राहकांसोबत आहोत हे ग्राहकांना आमचे वचन आहे. वाढीव बोनसची घोषणा करताना आणि सध्याच्या कठीण परिस्थितीत आमच्या ग्राहकांना मदत करणे शक्य झाल्याचा आम्हाला फार आनंद वाटतो. या प्रवासात ग्राहकांनी कायमच आमच्यावर विश्वास दाखवला – त्यामुळे कंपनीला हाय परसिस्टन्सी रेशियो रेशियो’ चा अनुभव करता आला. आम्ही गाठलेला परसिस्टन्सी रेशियो हा पॉलिसी जीवनचक्राच्या विविध टप्प्यांवर ग्राहकांकरिता नियमित स्वरुपात संपर्कात असल्याने शक्य झाला. महासाथीच्या काळात, वाढीव डिजीटल क्षमता आणि एनलेटीक्सद्वारे आमचे ग्राहक सहभागीता उपक्रम बळकट केले. जेणेकरून ग्राहकांना सहज आणि सोपे नूतनीकरण पर्याय उपलब्ध करून देणे शक्य झाले.”

हा आनंद अधिकच द्विगुणीत झाला आहे. असोचाम १३ व्या ग्लोबल इन्शुरन्स इ-समिट अँड एवॉर्ड्स’मध्ये मच्युअर लाईफ इन्शुरन्स कंपनीज’ या वर्गवारीत “ओव्हरऑल अचिव्हमेंट” पुरस्कार जिंकण्याची संधी कोटक लाईफ’ ला लाभली.*

*टीप: कोटक लाईफने जिंकलेला पुरस्कार हा आयोजक असोचाम ग्लोबल इन्शुरन्स इ-समिट अँड एवॉर्ड्स यांच्याकडून करण्यात आलेल्या स्वतंत्र चाचणीच्या आधारे असून विविध अन्य कंपन्यांकडून अनेक पुरस्कार प्रवेशातून ही निवड करण्यात आली. कोटक लाईफचा आयोजकांशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. आयोजक स्वत:च्या कार्यक्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि अस्सल संस्था मानली जाते. उपरोक्त जाहीर माहिती ही आमच्याकडील सर्वोत्तम माहिती आणि ज्ञानाच्या आधारे देण्यात आली आहे. अतिरिक्त माहिती जाणून घेण्यासाठी visit www.assocham.orgला भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202