टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२१ च्या ऑनलाईन एडिशनमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणीला सुरुवात

 टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२१ च्या ऑनलाईन एडिशनमध्ये 

सहभागी होण्यासाठी नावनोंदणीला सुरुवात  


•    १८ व्या टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझसाठी ऑनलाईन नोंदणीची सुरुवात १५ जुलै २०२१ पासून
•    ऑनलाईन प्रिलिम्स, १२ क्षेत्रीय अंतिम फेऱ्या, २ उपांत्य फेऱ्या आणि १ राष्ट्रीय स्तरावरील महाअंतिम फेरी
•    क्विझचा व्हर्च्युअल अनुभव सहजसोपा असावा यासाठी फक्त वैयक्तिक सहभागास मंजुरी

मुंबई, 24 जुलै 2021:  भारतातील सर्वात मोठी आणि दरवर्षी जिची आतुरतेने वाट पाहिली जाते अशी बिझनेस क्विझ, टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझचे यंदा अठरावे वर्ष आहे.  २०२० मध्ये पहिल्यांदा ही क्विझ ऑनलाईन आयोजित करण्यात आली, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, यावर्षी देखील ही प्रसिद्ध कॉर्पोरेट क्विझ ऑनलाईन होणार आहे.  टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझमध्ये भाग घेण्यासाठी १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत नोंदणी करता येईल.  ज्ञान वर्धनासाठी टाटा समूहाने सुरु केलेला हा उपक्रम असून यंदाच्या वर्षीच्या क्विझची सर्व तयारी झाली आहे  दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील देशभरातून कॉर्पोरेट क्षेत्रातील उत्तमोत्तम प्रतिभावंतांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन टाटा समूहातर्फे करण्यात येत आहे.

टाटा क्रुसिबलने नेहमीच क्विझिंग विश्वात होत असलेल्या बदलांना अनुसरून विकसित होत जाणारी क्विझ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.  गेल्या वर्षी काळाची गरज ओळखून, महामारीच्या काळात या क्विझचा ऑनलाईन फॉरमॅट सुरु केला गेला, पण निष्पक्षतेला जराही धक्का लागू नये यासाठी खास फॉरमॅट, अंतिम फेरीतील स्पर्धकांकडून सेल्फ-डिक्लेरेशन घेणे, निवडक अंतिम फेऱ्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवणे यासारखे नियम लागू केले गेले. या सर्व तंत्रांमुळे ऑनलाईन फॉरमॅट असून देखील या क्विझची निष्पक्षता आणि पारदर्शिता पाळली गेली.  यावर्षी देखील ही व्यवस्था अंमलात आणली जाईल.  टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२१ साठी टाटा समूहातील व त्याव्यतिरिक्त इतर अशा दोन्ही कॉर्पोरेट्सना आमंत्रित करण्यात आले आहे.  क्विझिंगचा व्हर्च्युअल अनुभव सहजसोपा असावा यासाठी टीमऐवजी फक्त वैयक्तिक सहभागाला मंजुरी दिली जाईल.   

संपूर्ण देशभर आयोजित करण्यात येणारी ही क्विझ ऑनलाईन होणार असून त्याची सुरुवात एका प्रिलिमपासून होईल.  या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशाची विभागणी १२ क्षेत्रांमध्ये (क्लस्टर) करण्यात आली आहे आणि ऑनलाईन प्रिलिमच्या दोन लेव्हल झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रातील १२ अंतिम विजेत्यांना वाइल्ड कार्ड फायनल्ससाठी आमंत्रित केले जाईल.  त्यामध्ये सर्वोत्तम ठरणाऱ्या ६ विजेत्यांच्या १२ ऑनलाईन क्लस्टर फायनल्स होतील.  प्रत्येक क्लस्टरच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या स्पर्धकास विजेता आणि त्यापाठोपाठ गुण मिळवणाऱ्या स्पर्धकास उपविजेता म्हणून घोषित केले जाईल.  क्लस्टर अंतिम फेरीच्या भाग्यवान विजेत्या व उपविजेत्यांना अनुक्रमे ३५,०००* आणि १८,०००* रुपयांची बक्षिसे दिली जातील.  १२ क्लस्टर फायनल्सपैकी प्रत्येक फेरीच्या विजेत्याला दोन उपांत्य फेऱ्यांमध्ये भाग घेता येईल आणि सर्वात शेवटी सहा विजेते राष्ट्रीय महाअंतिम फेरीसाठी पात्र होतील. राष्ट्रीय स्तरावरील महाअंतिम फेरी डिसेंबर २०२० मध्ये होईल.  राष्ट्रीय महाअंतिम फेरीच्या विजेत्याला २.५ लाख* रुपयांचे महापरितोषिक व मानाची टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल.  या स्पर्धेची बक्षिसे टाटा क्लिकच्या सहयोगाने देण्यात येतील.

टाटा सर्व्हिसेसचे कॉर्पोरेट ब्रँड आणि मार्केटिंगचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री. अतुल अग्रवाल यांनी सांगितले, "आज आपण सर्वजण अशा जगात राहत आहोत जिथे एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे बदल. ज्ञान आणि तंत्रज्ञान हे आजच्या युगात होत असलेल्या बदलांना कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत.  टाटा क्रुसिबल क्विझ विविध क्षेत्रांमधील लोकांना एकत्र जोडण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची पारख करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे.  गेल्या वर्षी आम्ही हा संपूर्ण उपक्रम ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला प्रचंड यश मिळाले. यंदा देखील आम्ही ही क्विझ ऑनलाईन आयोजित करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे देशभरातील प्रतिभावंत कॉर्पोरेट्स यामध्ये सहभागी होतील व हा उपक्रम यशस्वी करतील."

आपल्या अनोख्या क्विझिंग स्टाईलसाठी प्रसिद्ध, 'पिकब्रेन' म्हणून ओळखले जाणारे ख्यातनाम क्विझमास्टर   श्री. गिरी बालसुब्रमण्यम हेच टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझच्या ऑनलाईन फॉरमॅटचे देखील क्विझमास्टर असतील.  त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कृपया इथे क्लिक करा - https://www.youtube.com/watch?v=FtoJSUtdcjw

२००४ सालापासून सुरु असलेल्या टाटा क्रुसिबलने ज्ञान व माहिती संपादन व वाढीला तसेच चाकोरीबाहेर जाऊन विचारांच्या कक्षा रुंदावण्याला प्रोत्साहन दिले आहे, त्याचबरोबरीने बुद्धीमानी व्यक्तींमध्ये क्वीझिंगची संस्कृती निर्माण केली आहे.  यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींसाठी ही मानाची स्पर्धा बरोबर उत्तरे देण्याचाही पलीकडे जाऊन त्यांच्या ज्ञानाचा गौरव करणारा व त्यांना एक अनोखे, मानाचे स्थान मिळवून देणारा उपक्रम बनला आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202