एनआयएसएमच्या सहयोगाने, “कोना कोना शिक्षा” (“Kona Kona Shiksha”)चा परिचय

 

तरुणांमध्ये आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कोटक सिक्युरिटीजच्या शैक्षणिक व रोजगार विषयक सीएसआर प्रोजेक्टसाठी एनआयएसएमच्या सहयोगाने, “कोना कोना शिक्षा” (Kona Kona Shiksha)चा परिचय

 

मुंबई, 29  जुलै, 2021: कोटक सिक्युरिटीज लिमिटेड (केएसएल)ने आज “कोना कोना शिक्षा” (“Kona Kona Shiksha”) या शैक्षणिक व रोजगारावरील आपल्या सीएसआर प्रोजेक्टसाठी नॅशनल इनस्टिट्यूट ऑफ सिक्युरीटीज मार्केट्स (एनआयएसएम)सोबत आपल्या सहयोगाची घोषणा केली. “कोना कोना शिक्षा” (“Kona Kona Shiksha”)-हा सीएसआर उपक्रम देशातील तरुणाईमध्ये आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

 

एनआयएसएम-केएसएलचे सीएसआर माहिती भागीदार आणि प्रोजेक्ट मॅनेजर, भारतातील महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी त्याचप्रमाणे तरुणांसाठी (कोना कोना) असलेल्या ऑनलाइन शिक्षण मॉड्यूल्समार्फत प्रशिक्षण देण्यासाठी सूचीबध्द केलेल्या स्त्रोत व्यक्तींच्या मार्फत “कोना कोना शिक्षा” (“Kona Kona Shiksha”) राबवतील. प्रत्येक विद्यार्थ्याला 10 तासांच्या कठोर प्रशिक्षण मॉड्यूल्सना अभ्यासावे लागणार असून, अखेरीस ऑनलाइन मूल्यांकन केले जाईल आणि एनआयएसएमकडून प्रमाणपत्र दिले जाईल.

 

“कोना कोना शिक्षा”( “Kona Kona Shiksha” ) उपक्रम व्यक्तीगत वित्त, सिक्युरीटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्राथमिक मुद्दे, गुंतवणूकीची तत्वे आणि प्रात्यक्षिक इ.ज्ञानाने विद्यार्थ्यांना संपन्न बनवेल. केएसएलच्या सीएसआर प्रोजेक्टचा मुख्य उद्देश वित्ताबद्दल माहिती असलेल्या, निपुण तरुणाईची जडणघडण करणे आणि वित्त सेवा उद्योगामध्ये कारकिर्द करण्याच्या संधी खुल्या करणे आहे.

 

पूर्णवेळ सभासद, सेबी आणि एनआयएसएमचे संचालक श्री एस.के.मोहंती म्हणाले, “कोना कोना शिक्षा” (“Kona Kona Shiksha”) कोटक सिक्युरीटीजचा पथदर्शक सीएसआर उपक्रम असून यामुळे अतिशय सर्वोत्तम परिणाम आढळणार आहेत, कारण आम्ही तरुण विद्यार्थ्यांना उचित आर्थिक माहिती आणि अतिरिक्त कौशल्यांनी समृध्द करणार आहोत. वित्त सेवा आणि सिक्युरीटीज मार्केटमध्ये कारकिर्द करण्याचा विचार करत असलेल्यांसाठी यामुळे चांगला पाया तयार होईल.”

 

कोटक सिक्युरीटीजचे अध्यक्ष श्री. नारायण एसए म्हणाले, ”स्वप्ने व महत्वाकांक्षा साकार करण्यासाठी भारतीय तरुण पात्र व सज्ज होत असताना, ते वित्तीय दृष्ट्या देखील सज्ज होणे महत्वाचे आहे. “कोना कोना शिक्षा” (“Kona Kona Shiksha”) हा आमचा सीएसआर उपक्रम या दृष्टीने पुढचे पाऊल आहे. आम्ही एनआयएसएम सोबत भागीदारी करुन विस्तिर्ण वित्त “शिक्षा” मॉड्यूलचा आराखडा तयार केला आहे आणि त्याचा कार्यान्वय केला आहे, ज्यायोगे भारतीय तरुणाला वास्तवामध्ये वित्तीय दृष्ट्या सज्ज करण्यासाठी हे मॉड्यूल देशातल्या कानाकोपऱ्यातल्या महाविद्यालयापर्यंत पोहचू शकेल”

 

कोटक सिक्युरीटीजचे एमडी आणि सीइओ श्री. जयदीप हंसराज म्हणाले, ”भारतीय तरुणाईमध्ये वित्त साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी एनआयएसएम सोबतच्या आमच्या सहयोगाबद्दल आम्हाला अतिशय उत्कंठा आहे. पुढे भविष्यात हा उपक्रम आम्हाला अधिक व्यापक वित्त वातावरण निर्मितीत मदत करेल. सुजाण आणि निपुण तरुण भविष्यासाठी आशावादी अर्थकारण घडवतील.”

 

एनआयएसएमचे डीन आणि प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस डॉ.व्ही.आर.नरसिंहन म्हणाले,”एनआयएसएनला या उदात्त उद्देशासाठी सहयोग करण्याबद्दल अतिशय आनंद होत आहे, यामुळे देशातील तरुण नागरिकांना सिक्युरीटीज मार्केटच्या संदर्भातील प्रभावी संचालन ज्ञानाने सुसज्ज करता येईल. हा प्रोजेक्ट अनेक उच्च शिक्षित आणि प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ञ प्रशिक्षकांकडे, शिक्षण तज्ञांकडे असलेल्या ज्ञानाला व कौशल्याला चालना देईल, हे ज्ञान व निपुणता देशभरात दूर दूरवर पसरलेल्या वर्गांकडे स्थानांतरीत केल्या जातील. आम्हाला महाविद्यालयांकडून उत्साही प्रतिसाद मिळत आहे. एनआयएसएमला असा ठाम विश्वास आहे की संस्थेला शैक्षणिक वर्षामध्ये अंदाजे 600 कार्यक्रम राबवता येऊ शकतील.”

 

“कोना कोना शिक्षा” व्यतिरिक्त कोटक सिक्युरीटीज कोटक एज्युकेशन फाउंडेशन (केइएफ) आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यासारख्या भागीदार संस्थांसोबत मिळून शिक्षण व रोजगारावरच्या आपल्या सीएसआर प्रकल्पांचा कार्यान्वय करतात.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24