‘बदलाव हमसे है’: एयु बँकेकडून जंगी ब्रँड कॅम्पेन’ चे अनावरण आणि एयु 0101 लॉन्च, त्यांची डिजीटल बँक आणि क्रेडीट कार्ड

 ‘बदलाव हमसे है’: एयु बँकेकडून जंगी ब्रँड कॅम्पेन’ चे अनावरण आणि एयु 0101 लॉन्च, त्यांची डिजीटल बँक आणि क्रेडीट कार्ड   


आमीर खान आणि किआरा अडवाणी यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड

स्वत:चे क्रेडीट कार्ड लॉन्च करणारी पहिली एसएफबी

डिजीटल बँक एयु 0101 चे लॉन्च, व्हिडीओ बँकिंग असलेले सुपर अॅप

 




मुंबई, 11 ऑगस्ट, 2021: डिजीटल बँकिंग पद्धतीत चमकदार परिवर्तनाचे आश्वासन देत एयु स्मॉल फायनान्स बँक, या भारताच्या सर्वात मोठ्या एसएफबी’ ने जंगी ब्रँड कॅम्पेन’ चे अनावरण केले, त्याचे ‘बदलाव हमसे है’  शीर्षक समर्पक आहे. हे स्थापनेपासून सुरू झालेले एयु बँकेचे पहिले एकीकृत मार्केटींग कम्युनिकेशन कॅम्पेन’ असून हा सर्जनशील प्रयत्न बँकेच्या नाविन्यपूर्ण कल्पकता महत्त्वाकांक्षेचे दर्शन घडवतो.     

 या प्रसंगी ‘नेक्स्टजेन’ बँकिंगच्या शुभारंभाची झलक देत एयु स्मॉल फायनान्स बँक’ च्या वतीने अभिनव डिजीटल बँकिंग मंच 0101 चे लॉन्च करण्यात आले. या माध्यमातून ग्राहकांकरिता बँकिंग सेवेची संपूर्ण श्रेणी डिजीटली उपलब्ध राहील, यामध्ये बँकर समवेत व्हिडिओ कॉलवरून परस्पर संभाषण (फेस-टू-फेस इंटरअॅक्शन) समाविष्ट असेल. त्यासोबत, बँकेने सर्वप्रकारच्या ग्राहकांच्या सेवेसाठी क्रेडीट कार्ड्सची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करून दिली आहे.  

बदलाव कॅम्पेन’ची संकल्पना : या नवीन ब्रँड कॅम्पेन’ ची सुरुवात एयु’ च्या समृद्ध बँकिंग व्यवसायाच्या  15 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 750+ बँकिंग टचपॉइंटच्या माध्यमातून करण्यात आली. या कॅम्पेनमुळे एयु हा भारतीय बँकिंग क्षेत्रातील बदल घडवणारा घटक म्हणून पुढे येतो आहे. कॅम्पेनच्या साथीने, भारताची सर्व शहरे आणि नगरांत आपली पोहोच पोहचवणे तसेच सध्याच्या स्थितीत आव्हान देणारा संदेश प्रसारित करण्याची आशा बँकेला वाटते.

या कॅम्पेनचा भाग म्हणून एयुने उत्पादन व सराव, जसे की, मासिक व्याज, एनीवेअर बँकिंग, व्हिडीओ बँकिंग, युपीआय क्यूआर आणि नव्या युगाची क्रेडीट कार्ड्सविषयी अॅड फिल्म्स मालिका प्रसारित करण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या मूर्त प्रस्तावांमार्फत बदलाव (सुधारणा) घटक जिवंत करण्यात आला.

हे कॅम्पेन तसेच वेळेचा सारांश विषद करताना एयु स्मॉल फायनान्स बँकचे एमडी आणि सीईओ संजय अगरवाल म्हणाले की,  “एयु’ ची स्थापना अडीच दशकांपूर्वी बँकेतर औपचारिक वित्तीय सेवेच्या उद्देशाने करण्यात आली. मागील चार वर्षांत एक बँक म्हणून आम्ही आमची सेवा श्रेणी आणि भौगोलिक पोहोच यशस्वीपणे विस्तारित केली. आम्हाला मिळालेले यश हे आमच्या बँकिंग परिघातील नव-कल्पकतेचा परिणाम म्हटला पाहिजे. आमच्या ग्राहकांच्या पसंतीनुसार गोष्टी ‘निराळ्या’ पद्धतीने केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. एयु 0101, आमच्या डिजीटल बँकेच्या लॉन्चसह आम्ही बँकिंग क्षेत्रात बदलाव (सुधारणा) ला अधोरेखित करण्याच्या दिशेने काम करत आहोत.”
 

हे कॅम्पेन अधिक परिणामकारक व्हावे आणि त्याला युनिव्हर्सल अपील प्राप्त व्हावे म्हणून एयु’ ने भारतीय सिनेमातील दोन प्रतिथयश अभिनेते आमीर खान आणि किआरा अडवाणीला सोबत घेतले आहे. भारतीय सिने उद्योगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खान या मल्टी-मीडिया कॅम्पेनला ऊर्जा देईल. त्याने कायमच आपल्या व्यावसायिक प्रवासाच्या माध्यमातून विचारप्रवर्तक बदल घडवून आणले. एयु बँकेमुळे लक्षावधी ग्राहकांच्या आयुष्यात बदलाचे वारे वाहू लागले. अभिनेत्री किआरा अडवाणी या कॅम्पेनमध्ये ‘बदलाव’ ध्येयवाक्याला अधोरेखित करताना दिसेल. सुरुवातीच्या टप्प्यात हे कॅम्पेन टीव्ही चॅनलवर दाखविण्यात येईल.

या सहयोगाविषयी बोलताना आमीर खान म्हणाला की, “मी संजय आणि एयु बँकेतील त्याच्या टीमला भेटलो, त्यावेळी सर्वसाधारण भारतीयाकरिता बँकिंग सुलभ करण्याकरिता ते करत असलेले प्रामाणिक प्रयत्न आणि सिंगल-माइंड फोकसने थक्क झालो. ते उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याच्या नमुन्याला निर्भीडपणे आव्हान देत आहेत. मला त्यांची वृत्ती भावली. आमचे तत्त्वज्ञान जुळले आणि संजय व त्याच्या टीमसमवेत काम करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.”

यावेळी बोलताना किआरा अडवाणी म्हणाली की, “मी ‘बदल हाच स्थिर असतो’ या सूत्रावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. सतत-प्रगतीशील असणाऱ्या समाजात राहताना, आपण आपल्या सभोवतालचे बदल स्वीकारण्याची गरज असल्यावर माझा ठाम विश्वास आहे. इतक्या अल्पावधीत एयु’ ने मिळवलेल्या यशाने मला प्रभावित केले आहे. त्यांनी आजवर अनेक दैदिप्यमान प्रवासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. एयु’ चे त्यांच्या ग्राहकांच्या दिशेने असलेले ठोस व्यावसायिक नीतिशास्त्र आणि वचनबद्धता आणि माझ्यात व्यक्तिश: नाळ जुळते.”

एयु’ चे नवीन ब्रँड अॅम्बेसेडर संजय अगरवाल म्हणाले की, “आमीर खानची त्याच्या कामाप्रती असलेले झपाटलेपण आणि प्रकल्पातून समाजात बदल घडवून आणण्यासाठी तो करत असलेले प्रयत्न त्याला बदलावकरिता समर्पक अॅम्बेसेडर करतो. माझ्या मते, भारताला ज्या परिवर्तनाची प्रतीक्षा होती ती सुधारणा आमीर समर्पक पद्धतीने चिन्हांकित करतो आणि वेळोवेळी अनुभव घेतो – अगदी एयु  ब्रँडप्रमाणे!”

 “किआरा अडवाणी ही सर्वात लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आणि तरुणाईचा आदर्श आहे. तिची व्यावसायिक निवड आणि कामाची पसंती यांचा एयु’ च्या आजवरच्या प्रवासासोबत उत्तम मेळ जमतो.” असे संजय अगरवाल म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202