युनिव्हर्सल कोच असेंब्ली स्थानक विकसीत करण्यासाठी गोदरेज अँड बॉयसची भारतीय रेल्वेसोबत भागीदारी

 युनिव्हर्सल कोच असेंब्ली स्थानक विकसीत करण्यासाठी

गोदरेज अँड बॉयसची भारतीय रेल्वेसोबत भागीदारी

उत्पादनक्षमतेला चालना देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत दृष्टीकोनाला आणखी बळकटी देण्यासाठी ऑटो वेल्डर सेटअप सह युनिव्हर्सल कोच असेंब्ली स्थानकाची रचना आणि विकसन

पुढच्या तीन वर्षात औद्योगिक यंत्रसामग्री क्षेत्रात १०० कोटीच्या व्यवसायाकडे लक्ष


मुंबई, १२ ऑगस्ट २०२१: गोदरेज समूहाची अग्रणी कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसने गोदरेज टूलिंग या त्यांच्या व्यवसायाने युनिव्हर्सल कोच असेंब्ली स्थानकाची रचना आणि ते विकसीत करण्यासाठी भारतीय रेल्वेसोबत भागीदारी करत असल्याचे जाहिर केले आहे. महाराष्ट्रातल्या लातूर येथील नव्याकोऱ्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात कोच असेंब्ली फॅब्रीकेशन साठीची ही स्वदेशी सुविधा आहे. युनिव्हर्सल कोच असेंब्ली स्थानकाने कोच जोडणीसाठी लागणारा वेळ २४ तासांवरून १२ तासांवर आणला आहे. 


प्रवासी आणि मालवाहतूकदार यांच्या वाढणाऱ्या मागण्यांची पूर्तता करताना आपल्या उत्पादन दालनाची उत्पादनक्षमता पुरेशी वाढविण्याचे आव्हान २०१९ मध्ये भारतीय रेल्वेसमोर होते. गोदरेज अँड बॉयसच्या रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) बरोबरच्या भागीदारीला २०१९ मध्ये सुरुवात झाली आणि नंतर गोदरेज टूलिंगला त्यांचे ईपीसी कंत्राटदार – मेसर्स आयएसजीईसी यांच्या माध्यमातून लातूर येथील आगामी मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यासाठी युनिव्हर्सल शेल बॉडी असेंब्ली फिक्शर विकसीत करण्याचा प्रकल्प मिळाला. मर्यादित कौशल्य क्रिया, उत्पादनात वाढ आणि उत्पादनक्षमतेत १००% ने मोठी वाढ यामुळे भारतीय रेल्वेला या गोष्टीचा मोठा फायदा होणार आहे. 


ऑटो वेल्डर सेटअपच्या एकत्रीकरणातून लेव्हल पॅड्, स्लाईड्स यांच्या लवचिकतेतून इएमयू, एमइएमयू आणि एलएचबी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोच म्हणजेच रेल्वेच्या डब्यांचे वेल्डिंग करणे शक्य होते. प्रत्येक डब्याला अंडरफ्रेम, कडेची भिंत, टोकाची भिंत आणि छत असे घटक असणे ही मुख्य फायदेशीर गोष्ट असून हे घटक जोडलेले, व्यवस्थित सुरक्षित आणि अद्ययावत युनिव्हर्सल असेंब्ली स्थानकात तयार होत आहेत. त्यानंतर सीमलेस वेल्डिंगसाठी ऑटो वेल्डर्सच्या संचाच्या माध्यमातून त्यांचे क्रमवार वेल्डिंग होईल. यामुळे मानवी प्रयत्न कमी होणार असून वेल्डिंगची गुणवत्ता सुधारणार आहे. जोडीला या कामाला कमी वेळ लागणार असल्यामुळे उत्पादनक्षमतेतही वाढ होणार आहे. 


याविषयी गोदरेज टूलिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख पंकज अभ्यंकर म्हणाले, “विविध क्षेत्रांमध्ये भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना देशभरात रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेबरोबर भागीदारी करण्याची संधी आम्हांला मिळाली हा आमचा बहुमान आहे. आमच्या टीमने सध्याच्या उत्पादन प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी मध्ये जाऊन तेथील जाणकारांशी सखोल चर्चा करण्यात आली. विविध प्रकारच्या कोच मधील स्वयंचलित वेल्डिंग रचना यांसह  लवचिक युनिव्हर्सल कोच असेंब्ली स्थानकाची रचना करण्यासाठी आम्हांला याची खूप मदत झाली. मजबूत रेल्वेचे जाळे उभारणे या दृष्टीकोनाशी कटिबद्ध असणाऱ्या आमच्या टीमने  महामारीच्या काळात दोन्ही असेंब्ली स्थानकांची यशस्वीपणे उभारणी केली आणि ती कार्यान्वित केली. भारतीय रेल्वेसोबत आणखी सहयोग करण्यासाठी आम्ही उत्सुक असून ही भागीदारी अधिक मजबूत व्हावी असे आम्हांला वाटते. आगामी तीन वर्षात औद्योगिक यांत्रिकी व्यवसाय १०० कोटींनी वाढविण्याची आमची योजना आहे.”


आपल्या औद्योगिक यंत्रसामग्री (इंडस्ट्रीयल मशीन्स)च्या माध्यमातून गोदरेज टूलिंग वैशिष्ट्यपूर्ण सुविधा पुरविते. यामध्ये भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल्वे विभागात उत्पादनक्षमतेत सुधारणा करण्यासाठी जीग्ज आणि फिक्शरचे स्वयंचलन, साहित्य हाताळणी, वेल्डिंग आणि उत्पादनातील रोबोटिक्सची विस्तृत मालिका यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात गोदरेज टूलिंगने भारतीय रेल्वे आणि शस्त्रास्त्र कारखाना यांसारख्या ग्राहकांसाठी स्वयंचलन गरजांच्या पूर्ततेसाठी काम केले आहे. आता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणातील आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या कामांच्या हाताळणीसाठी सर्वोत्तम म्हणून ओळखला जातो. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24