पिंपरी चिंचवड - वेगाने प्रगती करणारे पुण्यातील बिझनेस डेस्टिनेशन

 पिंपरी चिंचवड - वेगाने प्रगती करणारे पुण्यातील बिझनेस डेस्टिनेशन
 
नवी सॅटेलाइट सिटी सर्वांना आकर्षित करत आहे आणि सध्याच्या महामारीच्या काळातही मोठे व्यवहार होत आहेत

 


मुंबई, १६ ऑगस्ट, २०२१ - पिंपरी चिंचवड आणि इतर उपनगरांचा समावेश असलेला पुणे शहर समूह गेल्या दोन दशकांमध्ये देशातील तिसऱ्या क्रमांकाचा वेगाने प्रगती करणारा शहर समूह म्हणून उदयास आला आहे. पिंपरी-चिंचवड हा भाग पुण्यातील अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरी भागांपैकी एक आहे आणि पुण्यातील औद्योगिक झोन्स आणि आयटी केंद्रांपासून खूप जवळ आहे. या शहरात उत्तम नागरी सुविधा आहेत आणि पुण्यातील इतर भागांशी उत्तम प्रकारे जोडलेला आहे आणि मुंबईच्याही जवळ आहे.
 
पिंपरी-चिंचवडमध्ये ४००० हून अधिक औद्योगिक कारखाने आहेत. या भागात मर्सिडिझ बेन्झ, फोक्सव्हॅगन, जेसीबी, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स इत्यादी प्रसिद्ध ऑटोमोबाइल ब्रँड्स आहेत. या शहराचा वृद्धी दर वार्षिक १५% आहे. या शहराचे हवामान आल्हाददायक आहे आणि पिंपरीमध्ये मोठे हरीत पट्टे आणि मुबलक आर्थिक संधी आहेत. त्यामुळे निवासी व औद्योगिक उद्दिष्टांसाठी या शहराची प्राधान्याने निवड होत आहे.
 
या भागातील सुनियोजित पायाभूत सुविधा, अनुकूल वातावरण, जमिनीची उपलब्धता, जवळच्या अंतरावर असलेला विमानतळ, शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असणे, बीआरटीएस नेटवर्क आणि मेट्रो रेल्वे स्टेशनचा अॅक्सेस यामुळे या भागामध्ये वाढीसाठी प्रचंड क्षमता आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, प्रीमिअर, एल्प्रो, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज इत्यादी कंपन्यांच्या जमिनी या ठिकाणी होत्या आणि येथून त्यांचे कामकाज चालत होते आणि त्यांच्या मुख्य व्यवसायात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यामुळे या शहराच्या व्यावसायिक विकासासाठी संधी उपलब्ध झाल्या. हे उपनगर पुणे शहरातील एक आशादायक मायक्रो मार्केट आहे आणि या ठिकाणी आयटी कंपन्यांमधील कर्मचारी, बीएफएसआय, मोटर व ऑटो उद्योगात काम करणारे कामगार, विद्यार्थी इत्यादी राहतात.
 
या लोकप्रिय उपनगराच्या विकासाबद्दल माहिती देताना कोहिनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय सहसंचालक विनीत गोयल म्हणाले, “महामारीचा फेरा येऊनही या भागात गेल्या दोन वर्षात मोठे व्यवहार आणि प्रॉपर्टी लाँचही झाले आहेत. व्यावसायिक व निवासी विकासाची प्रचंड क्षमता या भागात असल्यामुळे गुंतवणुकीसाठी प्राधान्य देण्यात आलेल्या ४ भागांपैकी हा एक भाग आहे.
 
सध्या पिंपरी-चिंचवडमधील कमर्शिअल स्टॉक अंदाजे २० लाख चौ. फुट आहे. या ठिकाणचे मार्केट हे मुख्यतः भाडेतत्वावरील जागांचे आहे. या मार्केटमध्ये विक्रीपेक्षा लीझवर देण्यावर भर देण्यात येतो. कारण या ठिकाणी आयटी, आयटीला पूरक असलेले आणि निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे कमर्शिअल प्रॉपर्टींचे भाडे मूल्य सतत वाढत जाईल, अशी विकासकांना अपेक्षा आहे. अलीकडेच या भागात एक मोठा व्यवहार झाला. ग्रीव्ह्ज कॉनने रिअल इस्टेट विकासकाला आकुर्डी येथील कारखान्याची २७ एकर जमीन रु.३२० कोटींना विकली. या व्यवहारामुळे गुंतवणूकदार आणि विकासक या भागाकडे अधिक आकर्षित होतील. कारण, येत्या काळात निवासी आणि कमर्शिअल ऑफिसच्या जागांसाठी मागणी वाढणार आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202