एंजेल ब्रोकिंगचे ‘एंजेल वन’ मध्ये रिब्रँडिंग

 एंजेल ब्रोकिंगचे ‘एंजेल वन’ मध्ये रिब्रँडिंग

~ मिलेनिअल्सच्या सर्व आर्थिक गरजा भागवण्याचा उद्देश ~


मुंबई, ३ ऑगस्ट २०२१: एंजेल ब्रोकिंग या फिनटेक प्लॅटफॉर्मने एंजेल वन ही नवी ओळख जाहीर केली आहे. ग्राहकांच्या स्टॉकब्रोकिंग सेवांसह सर्व वित्तीय गरजा पुरवण्यासाठीचा हा ‘डिजिटल फर्स्ट ब्रँड आहे. नवीन अवतारात, या एकछत्री ब्रँडअंतर्गत वर्तमानातील आणि भविष्यातील सर्व बिझनेस युनिटचा समावेश असेल.

या अनावरणाविषयी बोलताना एंजेल ब्रोकिंग लि. चे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “एंजेल वनला आघाडीची फिनटेक कंपनी बनवण्याचे . तसेच नव्या काळातील जेनझेड आणि मिलेनिअल भारतीय गुंतवणूकदारांसमोर स्वत:ला समकालीन, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त अवतारात सादर करणे आमचे उद्दिष्ट आहे."

एंजेल वन हा एक नावीन्यपूर्ण आणि सशक्त प्लॅटफॉर्म असून तो टिअर २ आणि ३ शहरांसह सहजपणे जनरेशन-झेड आणि मिलेनिअल्सला प्रतिसाद देतो. कंपनीच्या ब्रँडचा वारसा, ध्येय-धोरणांचे मिश्रण म्हणजे हे परिवर्तन आहे. कंपनी ब्रोकिंग हाऊसकडून ‘वन-सोल्युशन’ प्लॅटफॉर्मपर्यंत प्रत्येक वित्तीय गरजांसाठी प्रवास करत असून यात म्युच्युअल फंड्सपासून विमा, कर्ज आणि इतर सेवांचाही समावेश आहे.

कॉर्पोरेट कंपनीचे नाव एंजेल ब्रोकिंग लिमिटेड राहिल, मात्र ग्राहकांसमोर जाणारे मास्टरब्रँड आता ‘एंजेल वन’ म्हणून ओळखले जाईल. हे बदल एंजेल ब्रोकिंगचे सर्व प्लॅटफॉर्म, टचपॉइंट्स, एक्सटर्नल आणि इंटरनल या ठिकाणी दिसून येईल. डिजिटल फर्स्ट ब्रँड होण्याचे ध्येय गाठण्यासाठी, कंपनीचे वेब आणि अॅपवरील प्लॅटफॉर्म सतत अपडेट केले जात आहेत.

एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे सीईओ श्री नारायण गंगाधर म्हणाले, “आमच्या तंत्रज्ञान आधारीत प्लॅटफॉर्मसह डिजिटल परिवर्तनानंतर आम्ही उत्पन्नात वृद्धी अनुभवली. आम्ही आमची सखोल तंत्रज्ञान कौशल्ये वापरून अधिक उत्पादने आणि सेवा तयार करत आहोत, जेणेकरून आमच्या ग्राहकांच्या सुविधांची व्याप्ती वाढेल. आमच्या ग्राहकांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी, आम्ही स्वत:ला ‘एंजेल वन’ म्हणून सादर करत आहोत.”

भूतकाळातील यशस्वी परिवर्तनावर आधारीत नव्या ध्येयाबाबत एंजेल ब्रोकिंगला आत्मविश्वास आहे. भारतातील ९८% पिनकोड म्हणजेच १८,८७४ ठिकाणांहून ५ दशलक्षांपेक्षा ग्राहकवर्ग कंपनीशी जोडलेला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने तिमाहितील सर्वाधिक ४,७४५ दशलक्ष रुपयांचा एकूण महसूल नोंदवला.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202