किराणा दुकानांना सेवा प्रदान करण्यासाठी डिसेंबरपर्यंत भारतातील अस्तित्व तिपटीहून अधिक करण्याची फ्लिपकार्ट होलसेलची योजना

 किराणा दुकानांना सेवा प्रदान करण्यासाठी डिसेंबरपर्यंत भारतातील 

अस्तित्व तिपटीहून अधिक करण्याची फ्लिपकार्ट होलसेलची योजना


•    जुलै-डिसेंबर २०२१ मध्ये किराणा दुकानांकडून ई-कॉमर्स स्वीकारार्हतेमध्ये अंदाजे तिप्पट वाढ अपेक्षित, बी२बी इकोसिस्टिम खरेदी व्यवहार करण्यासाठी डिजिटल माध्यमाला प्राधान्य देणे स्वीकारत असल्याचे संकेत
•    २०२१ च्या अखेरपर्यंत फ्लिपकार्ट होलसेलवर नोंदणी केलेल्या पुरवठादारांची संख्या ५८% वाढणार, परिणामी लोकल बिझनेस इकोसिस्टिम तसेच उपजीविकेला अजून चालना मिळणार
•    या वर्षाच्या अखेरपर्यंत फ्लिपकार्ट होलसेल भारतातील २७०० शहरांमधील किराणा दुकानांना सेवा प्रदान करणार, लाखो लघु उद्योजकांना डिजिटल लाभ प्राप्त करण्यास सक्षम करणार


बंगळुरू - १९ ऑगस्ट, २०२१ : भारतात स्थापन झालेल्या फ्लिपकार्ट ग्रुपच्या फ्लिपकार्ट होलसेल या डिजिटल बी२बी बाजारपेठेतर्फे भारतातील सुमारे २७०० शहरांसह भारतातील भौगोलिक अस्तित्व तिपटीहून अधिक करणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. व्यवसाय सुलभ करणे आणि देशभरातील लघुउद्योजक आणि किराणा दुकानांना समृद्धी प्राप्त करून दणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये फ्लिपकार्ट होलसेल लाँच करण्यात आली. २०२१च्या पहिल्या सहामाहीमध्ये जोरदार वाढ झालेली पाहायला मिळाली, यात बहुतांश वाटा ई-कॉमर्स स्वीकारलेल्या किरकोळ विक्रेते आणि किराणा दुकानांचा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी जानेवारी-जून या कालावधीत फ्लिपकार्ट होलसेलवर किराणा दुकानांकडून ई-कॉमर्सच्या स्वीकारार्हतेत दुप्पट वाढ झाली. जुलै-डिसेंबर २०२१ या कालावधीत गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेने १८०% वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

डिजिटल बी२बी बाजारपेठेत सुरुवात केलेल्या पुरवठादारांच्या संख्येतही वाढ झाल्याचे फ्लिपकार्ट होलसेलला दिसून आले आहे. २०२१मध्ये पुरवठादारांची संख्या ५८% वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लोकल बिझनेस इकोसिस्टिम तसेच उपजीविकेला चालना मिळेल. सर्वव्यापी बिझनेस प्रारुपाच्या माध्यमातून भारतातील किराणा दुकानांच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी प्रतिबद्ध राहतानाच कंपनीने नुकतेच त्यांचा बेस्ट प्राइस कॅश अँड कॅरी बिझनेसचे रिब्रँडिंग केले जो त्यांनी २०२० साली वॉलमार्ट इंडियाकडून संपादित केला होता.

फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले, “बी२बी रिटेल इकोसिस्टिममध्ये समृद्धी आणण्यासाठी आणि देशभरातील किराणा दुकानांच्या समस्या सोडविण्याच्या उद्दिष्टाने आम्ही फ्लिपकार्ट होलसेल सुरू केले. महामारीचे आव्हान असूनही किराणा दुकानांकडून आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला. किराणा दुकानांना आता डिजिटायझेशने फायदे जाणवले आहेत आणि खरेदी करण्याचे साधन म्हणून ई-कॉमर्स यंत्रणेसाठी ते सज्ज होत आहेत. फ्लिपकार्ट ग्रुपच्या तंत्रज्ञानातील बलस्थानांचा आम्ही उपयोग करून घेत राहू आणि देशभरातील उपजीविका आणि स्थानिक पुरवठादार इकोसिस्टिममध्ये वाढ करत राहू.”

गेल्या वर्षीच्या तुलेने जानेवारी-जून २०२१ या कालावधीत किराणा ग्राहक संख्येमध्ये १७% वाढ झाल्याचे फ्लिपकार्ट होलसेलला दिसून आले; यातून किराणा दुकानांनी या प्लॅटफॉर्म दाखविलेला विश्वास पुनर्स्थापित झाला. किराणा ग्राहक संख्येमध्ये या वर्षी जुलै-डिसेंबर २०२१ या कालावधीत गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेने ३३% वाढ होईल, असा अंदाज आहे.

किराणा हा फ्लिपकार्ट होलसेलचा सर्वात महत्त्वाचा ग्राहक सेगमेंट आहे आणि त्यांना अधिक चांगल्या उत्पादन वर्गीकरण उत्तम किमतील, क्रेडिट ऑफरसह, पेमेंट पर्यायांसह आणि फीट ऑन स्ट्रीट सहकारी, अॅप आणि कॅश अँक कॅरी स्टोअर्सच्या माध्यमातून एंड-टू-एंड (परिपूर्ण) सेवा उपलब्ध होतील. फ्लिपकार्ट होलसेलमध्ये रिब्रँडिंग केल्यानंतर किराणा दुकानांना पूर्वी जी सुविधा मिळत होती, तिच सुविधा यापुढेही मिळत राहील. यासह, बेस्ट पॉइंट टचपॉइंट्स आता फ्लिपकार्ट होलसेल असतील आणि त्यामुळे ते ख्यातनाम बी२बी व्यावसायिक असतील.

फ्लिपकार्ट ग्रुपच्या अनुभवाचा आणि डिजिटल स्पेसमधील कौशल्याचा फ्लिपकार्ट होलसेल उपयोग करत आहे आणि खरेदीसाठी ई-कॉमर्स सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या किराणा दुकानांच्या आणि किरकोळ विक्रेत्यांना सेवा प्रदान करण्यासाठी वापर करत आहे. फ्लिपकार्ट होलसेलतर्फे देशभरातील सुमारे १५ लाख सदस्यांना सेवा प्रदान करण्यात येत आहे, ज्यात किराणा हॉरेकॅ (हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफेटेरिया) आणि ओअँडआय (कार्यालये आणि संस्थांचा समावेश आहे).

फ्लिपकार्ट होलसेलच्या ग्राहकांना मुबलक आकर्षक सेवा उपलब्ध असतात. यात विविध फ्लिपकार्ट-अॅश्युअर्ड दर्जेदार उत्पादने, सुलभ व सुविधाजनक ऑर्डर रिटर्न आणि थेट दुकानापर्यंत वेगवान उत्पादन डिलिव्हरी, सुलभ ऑर्डर ट्रॅकिंग सुविधा आणि प्रत्येक उत्पादनावर अधिक चांगली मार्जिन्स अशा सुविधा मिळतात.

फ्लिपकार्ट ग्रुपबद्दल
फ्लिपकार्ट ग्रुप हा भारतातील एक आघाडीचा डिजिटल कॉमर्स उद्योगसमूह आहे आणि त्यात फ्लिपकार्ट, मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल आणि क्लिअरट्रिप या ग्रुप कंपन्यांचा समावेश आहे. हा ग्रुप फोनपे या भारतातील एक आघाडीचे पेमेंट अॅपचा मेजॉरिटी शेअरहोल्डर आहे.

फ्लिपकार्टची स्थापना २००७ साली झाली. फ्लिपकार्टने लाखो ग्राहक, विक्रेते, व्यापारी आणि लघु उद्योगांना भारताच्या ई-कॉमर्स क्रांतींचा एक भाग होण्यासाठी सक्षम केले. त्यांचे ३५ कोटींहून अधिक नोंदणीकृत ग्राहक आहे, त्यांच्यातर्फे ८०+ विभागांमध्ये १५ कोटींहून अधिक उत्पादने उपलब्ध करून देण्यात येतात. भारतात ई-कॉमर्सचे लोकशाहीकरण होण्यासाठी आमचे प्रयत्न, उत्पादनांची उपलब्धता आणि वाजवी किंमतीत उत्पादने उपलब्ध करून देणे, ग्राहकांना समाधान देणे, या अर्थचक्रामध्ये लाखो रोजगारांची निर्मिती करणे आणि उद्योजकांच्या व एमएसएमईंच्या अनेक पिढ्या घडविणे यामुळे या क्षेत्रातील अनेक गोष्टींचे उद्गाते होण्यास आम्हाला प्रेरणा मिळाली. कॅश ऑन डिलिव्हरी, नो कॉस्ट ईएमआय आणि सुलभ रिटर्न्स या ग्राहककेंद्री अभिनव उपक्रमांसाठी फ्लिपकार्ट ओळखला जातो. या ग्राहककेंद्री सुविधांमुळे लाखो भारतीयांसाठी ऑनलाइन खरेदी अधिक व्यवहार्य आणि परवडण्याजोगी झाली. आपल्या ग्रुप कंपन्यांसह फ्लिपकार्ट ग्रुप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील व्यवसायक्षेत्राचे परिवर्तन घडविण्याचे कार्य सुरूच ठेवणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24