अॅलेक्सा, से हॅलो टू अमिताभ बच्चन’


अॅलेक्सा, से हॅलो टू अमिताभ बच्चन’ 


अमितजींचा आवाज आता अॅलेक्सावर असल्याची घोषणा 

 


मुंबई: अॅमॅझॉनने आज भारतीय चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम व्यक्तिमत्व श्री अमिताभ बच्चन यांच्या आवाजात अॅलेक्सावर पहिले सेलीब्रीटी आवाज वैशिष्ट्य दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. भारतीय ग्राहक आता १४९ रुपये प्रतिवर्ष या स्वागतमूल्याला त्यांच्या इको उपकरणावर किंवा अॅमॅझॉन शॉपिंग अॅपवर (केवळ अँड्रॉईड) माईक आयकॉन दाबून आता अमिताभ यांचा आवाज त्यांच्या अॅलेक्सा अनुभवात दाखल करू शकतात. ‘अॅलेक्सा माझा अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधून दे’ (‘अॅलेक्सा एंट्रोड्यूस मी टू अमिताभ बच्चन’) एवढे म्हणून आपण ही खरेदी करू शकता आणि श्री अमिताभ बच्च्बन यांच्या आवाजाबारोबर संवाद सुरु करू शकता. ‘अमित जी’ असा प्रारंभ शब्द (वेक वर्ड) त्यासाठी वापरावा लागेल.  

 

अमिताभ बच्चन यांनी स्वतः निवडलेला आणि खास करून तयार केलेला कॉन्टेन्ट आता तुम्ही अनुभवू शकता. या कॉन्टेन्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील काही कथा, त्यांच्या वडिलांच्या कविता, काही गमतीशीर टंग ट्वीस्टर, प्रेरणादायी अवतरणे आणि इतरही बऱ्याच गोष्टींचा समावेश केला आहे. या अनोख्या आणि मनोरंजक अशा कॉन्टेन्टसह ग्राहक संगीताची मागणी करू शकतात, अलार्म लावू शकतात आणि अगदी हवामानाविषयी माहिती श्री बच्चन यांच्या विशिष्ट अशा शैलीत मिळवू शकतात. त्याशिवाय शॉपिंग, सर्वसाधारण माहिती, नेहमीच्या गोष्टी, स्मार्ट होम नियंत्रण, कौशल्य आणि इतरही गोष्टींसाठी अॅलेक्सा आहेच.


जर तुम्ही ‘अमितजी ‘कभी कभी’मधील गाणी लावा’, (अमितजी प्ले सॉंग्ज फ्रॉम कभी कभी) किंवा ‘अमितजी शोले के गाने बजाईए’ किंवा अगदी ‘अमितजी आम्हाला एखादी मनोरंजक गोष्ट सांगा’ (अमितजी, टेल अस अ फनी स्टोरी’) असे जरी म्हटले तरी तुम्हाला पडद्यामाघील बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतील. त्याशिवाय केवळ ‘अमितजी कोई कविता सुनाईए’ किंवा ‘मग अमितजी मधुशाला म्हणून दाखवा’, (अमितजी रिसाईट मधुशाला) अशी विनंती करत तुम्हाला कवितेच्या जगतात प्रवेश करता येईल. वाढदिवसाच्य साजरीकरणात अमिताभ बच्चन यांच्या आवाजात एक विशेष रंग भरण्याची संधीही तुम्हाला प्राप्त होते. त्यासाठी केवळ ‘अमितजी इट्स माय बर्थडे’ असे म्हणायचे.

 

“अॅलेक्सावर माझा आवाज दाखल करण्याच्या या नवीन प्रक्रियेत अॅमॅझॉनबरोबर काम करण्याची मिळालेली संधी हा एक नवीन अनुभव होता. त्यासाठी आवाज तंत्रज्ञान व कलात्मक सर्जनशीलता यांचा अनोखा संगम साधला गेला. या नवीन माध्यमाद्वारे माझे शुभेच्छुक आता माझ्याशी संवाद साधू शकतात याचा मला आनंद आहे. त्यांना हा अनुभव कसा वाटतो, हे ऐकण्यास मी उत्सुक आहे,” असे उद्गार श्री अमिताभ बच्चन यांनी काढले. जगातील पहिला द्विभाषी सेलिब्रिटी आवाज तयार करण्यासाठी आम्हाला आवाजशास्त्राच्या अनेक घटकांवर पुन्हा पुन्हा काम आणि प्रयोग करावे लागले. वेक वर्ड, स्पीच रेकग्नीशन, न्यूरल टेक्स्ट टू स्पीच आणि इतरही गोष्टींचा त्यात समावेश होता,” असे उद्गार अॅमॅझॉन इंडियाचे अॅलेक्सासाठीचे राष्ट्रीय प्रमुख पुनिश कुमार यांनी काढले. 

###

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24