चिंगारीने #सालएकचिंगारीअनेक' कँपेनद्वारे साजरा केला प्रथम वर्धापन दिन

 चिंगारीने #सालएकचिंगारीअनेक' कँपेनद्वारे साजरा केला प्रथम वर्धापन दिन


मुंबई, ३ ऑगस्ट २०२१: चिंगारी या भारतातील प्रसिद्ध सोशिओ-कॉमर्स अॅपने पहिला वर्धापनदिन चिंगारीचे कुटुंब आणि इतर कंटेंट क्रिएटर्ससोबत #सालएकचिंगारीअनेक' या उत्साही कँपेनद्वारे साजरे केले. याप्रसंगी, चिंगारीने चिंगारी अँथम देखील लाँच केले. जेणेकरून क्रिएटर्सना या उत्सवात सहभागी होता यईल आणि उत्सहवर्धक व्हिडिओ तयार करून लाखो चिंगारी कॉइन्स जिंकता येतील.

एक वर्ष एवढ्या अल्पावधीतच चिंगारीने अद्वितीय कल्पनाशक्ती आणि संकल्पनांच्या आधारे मजबूत पकड जमवली आहे. कंटेंट क्रिएटर्ससाठी वैयक्तिक स्टेज प्रदान करण्याची सुविधा, हेच प्लॅटफॉर्मच्या यशाचे प्रमुख कारण ठरले. तसेच मागील वर्षात आयोजित विविध स्पर्धांद्वारे क्रिएटर्सची आवड आणि सृजनात्मकतेला प्रोत्साहन देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना चिंगारी अॅरपचे सीईओ आणि सह संस्थापक सुमित घोष म्हणाले, “चिंगारीच्या सुरुवातीपासूनचे हे वर्ष अविस्मरणीय ठरले. आमचा दृष्टीकोन पुढे नेण्यासाठी आणि जास्तीत जास्त भारतीय प्रेक्षकांचा फायदा होईल, या पद्धतीने हे अॅीप तयार करण्यासाठी टीमच्या प्रयत्नांमुळे आमची प्रगती वेगाने झाली. आम्ही देशातील कलाकारांना भरपूर संधी उपलब्ध करून देणे सुरुच ठेवणार आहोत. नि:पक्ष प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी संघर्ष करणाऱ्या निर्मात्यांचा आवाज होण्याचे आमचे ध्येय आहे. कला व्यावसायिकांची वेगाने वृद्धी करणे, हे या ब्रँडचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त संधी आणि लाभ मिळेल.

प्रेक्षक आणि भागीदार संस्थांमध्ये ब्रँडने निर्माण केलेल्या विश्वासाच्या आधारे चिंगारीने या क्षेत्रात दमदार गती प्राप्त केली. मीगल वर्षी चिंगारीने ब्रँड आणि प्लॅटफॉर्मच्या यूझर्सना नव्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता विविध ब्रँड आणि सेलिब्रेटिंशी भागीदारी केली. ब्रँडने कंटेंट क्रिएटर्ससाठी एक लर्निंग प्लॅटफॉर्मदेखील विकसित केला असून येथे कलाकार अनुभवी व्यावसायिकांकडून शिकू शकतात आणि त्यांची कौशल्ये वाढवू शकतात. अशा पथदर्शक उपक्रमांद्वारेच चिंगारी स्वतंत्र कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी एक समग्र वृद्धीचे वातावरण विकसित करण्यास सक्षम आहे.

भविष्यातील योजनांविषयी बोलताना चिंगारीचे सीओओ आणि सह संस्थापक दीपक साळवी म्हणाले, “उद्योजक आणि संस्था ज्यप्रमाणे विज्ञान, वाणिज्य आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करतात, त्याप्रमाणे चिंगारी मागील वर्षात सर्जनशील सामग्रीचे मानसशास्त्र, लोकसंख्याशास्त्र आणि प्रेक्षकांची समज जाणून घेण्यास मदत झाली. ही आकडेवारी आणि माहिती देशभरातील निर्मात्यांसाठी वापरण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांना त्यातून लाभ मिळेल.”

‘बन चिंगारी’ हे गीत क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रणत घुडे यांनी बहुभाषिक, मिलेनिअल्सचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच भारतातील वैविध्य टिपण्यासाठी लिहिले असून देशातील नृत्य व संगीतप्रेमींसाठी ही जबरदस्त मेजवानी ठरणार आहे. चिंगारीच्या संस्कृतीतील अधिकृत प्रतिभेचा कॅनव्हास या व्हिडिओद्वारे प्रसारीत केला जातो. या अँथमद्वारे, प्रेक्षकांसोबत आणखी दृढ नाते तयार करायचे आहे. तसेच या महोत्सवात त्यांना सहभागी करून घ्यायचे आहे. आघाडीच्या म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरदेखील हे अँथम उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth