कार्गो ई-बाइक्सच्या माध्यमातून परिपूर्ण अन्नपदार्थ वितरण व्यवस्थेला हातभार लावण्यासाठी ‘हिरो लेक्ट्रो विन’चे ‘स्वीगी’शी सहकार्य

 

पर्यावरणपूरक उपक्रम : कार्गो ई-बाइक्सच्या माध्यमातून परिपूर्ण अन्नपदार्थ वितरण व्यवस्थेला हातभार लावण्यासाठी ‘हिरो लेक्ट्रो विन’चे ‘स्वीगी’शी सहकार्य 


 

मुंबई, ‘हिरो लेक्ट्रो कार्गो’ (एचएलसी) आणि भारतातातील आघाडीची  मागणीनुसार वितरणसेवा देणारी कंपनी ‘स्वीगी’ एकत्र येत असून त्या माध्यमातून कार्गो ई-बाईक्स बाजारात दाखल केल्या जाणार आहेत. त्याद्वारे परिपूर्ण अशी अन्न वितरण सेवा देणे शक्य होणार आहे. ‘स्वीगी’ आपल्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक वेहीकल्स दाखल करण्याचे नियोजन करत होती. ती आता ‘हिरो लेक्ट्रो’ची ‘विन’ ही ई-बाईक वापरणार असून त्यातून कार्यक्षमता, खर्चा कमाल वापर होणार असून पर्यावरणस्नेही पावले टाकत कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होणार आहे.  

ऑगस्ट महिन्यापासून ‘स्वीगी’ने फास्ट डिस्पॅच लॉजिस्टीक्स (परीपूर्ण वितरण सेवा कंपनी) आणि ए एस ग्रुप (पब्लिक बाईक शेअरिंग क्षेत्रातील एक सर्वश्रुत नाव) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिरो लेक्ट्रो विन’बरोबर हैद्राबादमध्ये एक प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प सुरु करत आहे. त्या माध्यमातून वितरण करणारे कर्मचारी हे अन्नपदार्थांचे वितरण कार्गो ई-बाइक्सवरून करणार आहेत. आपल्या वितरण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक गाड्या दाखल करण्याच्या ‘स्वीगी’च्या विस्तृत बांधिलकीला अनुसरून हे पाऊल उचलले गेले आहे.  

या उपक्रमामुळे बाईक चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांचे उत्पन्न वाढविण्याची संधी मिळणार आहे कारण या गाड्यांचा देखभाल खर्च आणि गाडी चालविण्यासाठी येणारा खर्च कमी असतो. त्याशिवाय कार्बनडायऑक्साईडच्या उत्सर्जनचे प्रमाण कमी करण्याचे प्रमुख उद्दिष्टसुद्धा साध्य होणार आहे. हा प्रायोगिक उपक्रम अशावेळी राबविला जात आहे की जेव्हा सरकार स्वच्छ आणि चांगल्या दर्जाच्या हवेसाठी इलेक्ट्रॉनिक गाड्यांना बढावा देत आहे.

जर हा उपक्रम यशस्वी झाला तर आर्थिक वृद्धीसाठी एक महत्वाची प्रेरणा ठरणार आहे, कारण त्याद्वारे देशातील महत्वाकांक्षी युवकांना त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) या जागतिक व्यवस्थापन सल्ला कंपनीच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या अहवालानुसार भारतातील कंत्राटी रोजंदारी अर्थव्यवस्था पुढील ३-४ वर्षांमध्ये तिपटीने वाढणार आहे. मार्च २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार दीर्घकालीन व्यवस्थेमध्ये त्याद्वारे सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) किमान १.२५%चे योगदान दिले जाणार आहे. कंत्राटी रोजंदारी अर्थव्यवस्थेमधील वृद्धी ही वाहतूक आणि लॉजीस्टिक या क्षेत्रांमधून येणार आहे.

‘हिरो लेक्ट्रो कार्गो’ ही भारतातील पहिली कंपनी आहे की जिने उपयोगिता, डिझाईन आणि अर्थशास्त्र यांच्या बाबतीत परिपूर्ण वितरणासाठी उपयोगिताआधारित गाड्या तयार केल्या आहेत.

हिरो लेक्ट्रो कार्गो’ ई-बाइक्स या उपयोगिता आधारित गाड्या असून त्या आर्थिकदृष्ट्या आणि सुविधेच्या दृष्टीने परिपूर्ण वितरणाचा विचार केल्यास एक चांगला पर्याय ठरला आहे. त्याद्वारे ‘स्वीगी’सारख्या आघाडीच्या कंपन्यांना त्यांची वितरणव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या कामात मदत होणार आहे. या प्रायोगिक प्रकल्पाच्या शुभारंभाच्या माध्यमातून ई-मोबिलीटीमध्ये फार मोठी मदत होणार आहे. या प्रायोगिक प्रकल्पाच्या शुभारंभाच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ई-मोबिलिटीसाठी त्याचा फार मोठा वापर होऊ शकतो. कार्गो ई-बाइक्सची संकल्पना ही अधिकाधिक लोकप्रिय होणार आहे कारण या गाड्या जो फायदा मिळवून देतात त्या अगदी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय येतो, ही बाब सर्वदूर पसरली की हे साध्य होणार आहे,” असे उद्गार ‘हिरो लेक्ट्रो कार्गो’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पार्था चौधरी यांनी काढले.

‘स्वीगी’च्या बिझिनेस ऑपरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री शिवचरण पुलूगुर्थ म्हणाले, “स्वीगी’ने आपल्या ग्राहकांना नेहमीच चिरंतन आणि पर्यावरणस्नेही वातावरणात परिपूर्ण वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्याप्रती आमची बांधिलकी आहे. ‘हिरो लेक्ट्रो कार्गो’ आणि ‘फास्ट डिस्पॅच लॉजीस्टीक्स’ यांच्याबरोबर इलेक्ट्रिक वेहिकल्सच्या वापरासाठीच्या प्रायोगिक तत्त्वावरील आमची जी भागीदारी आहे, त्यातून ही बांधिलकी अधोरेखित होते. त्यांच्या किफायतशीर आणि उपयोगिताआधारित ज्या कार्गो दुचाकी आहेत त्यातून आम्हाला कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल आणि त्यातून आमच्या वितरण व्यवस्थेतील लोकांना प्रती किमी खर्च कमी करणे शक्य होईल. राष्ट्रीय स्तरावर विचार करता २०२५ पर्यंत आमचे उद्दिष्ट हे दररोज ८ लाख किलोमीटरचा जो वितरण व्यवस्थेचा प्रवास आहे तो इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापराच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.”

 

“इंग्लंडमध्ये एक परिपूर्ण वितरण व्यवस्था सेवा पुरवठादार म्हणून आम्ही कार्यरत असून भारतात आमच्या सेवा दाखल करण्याचे आमचे एक समर्पित असे नियोजन आहे. ‘स्वीगी’ आणि ‘हिरो लेक्ट्रो कार्गो’ यांच्यामधील जो सहकार्य करार आहे त्यातून एफडीएलसाठी हैद्राबादमध्ये स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी एक परिसंस्था निर्माण करणे शक्य होणार आहे. आज कोरोना साथीच्या दरम्यान जेव्हा संकट उभे राहिले आहे, अशावेळी रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल आणि युवकांना रोजगार मिळेल. त्याशिवाय ‘हिरो लेक्ट्रो कार्गो’साठी आम्ही एक प्रभावी यंत्रणा उभी करत आहोत कि ज्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कोणत्याही दुचाकीच्या दराशी स्पर्धा करत ती एक पर्याय निर्माण करू शकेल. त्याद्वारे ई-बाईक्सचा वितरणासाठी जो वापर आहे, त्याला जास्त स्वीकारार्हता मिळेल,” ‘फास्ट डिस्पॅच लॉजीस्टिक्स’च्या ऑपरेशन्स विभागाचे राष्ट्रीय प्रमुख श्री अखिलेश मिश्रा म्हणाले.

या घडामोडींबाबत बोलताना ए एस ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंशुमन सिंग म्हणाले, “कार्गो ई-बाईक्सच्या माध्यमातून राबविला जात असलेला हा भारतातील सर्वात मोठा उपक्रम आहे. सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांच्या प्रसाराला जे महत्त्व द्यायचे ठरवले आहे त्याला या उपक्रमाच्या माध्यमातून एक आवश्यक अशी चालना मिळणार आहे. त्याशिवाय अपेक्षित मूल्य फायदेही त्यातून दीर्घकालीन बाबतीत प्राप्त होतील. आम्ही पर्यावरणस्नेही गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि चार्जिंगसाठी समर्पित पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्याद्वारे पर्यावरणस्नेही उद्दिष्ट साध्य होणार आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की यातून बऱ्याच कंपन्यांना इलेक्ट्रिक गाड्यांवर जाण्यास प्रेरणा मिळेल. त्यातून वितरणाच्या क्षेत्रात असलेल्या लोकांना अधिक कमाई करता येईल आणि पर्यावरणस्नेही फायादेसुद्धा प्राप्त होतील.”

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24