वुमेन्स वर्ल्ड बँकिंग आणि बँक ऑफ बडोदा अहवालात ‘जन धन प्लस’ ची शिफारस, महिला जन धन ग्राहकांना औपचारिक बचतीची सवय लागावी हा उद्देश

 वुमेन्स वर्ल्ड बँकिंग आणि बँक ऑफ बडोदा अहवालात ‘जन धन प्लस’ ची शिफारस, महिला जन धन ग्राहकांना औपचारिक बचतीची सवय लागावी हा उद्देश

       सुमारे 10 कोटी (100 दशलक्ष) महिला जन धन ग्राहकांना सेवा देऊन रु.25,000कोटी (250 अब्ज) जमा रक्कम आकर्षित करून 10 कोटी (100 दशलक्ष) महिला जन धन ग्राहकांना सेवा देण्याची बँकांची क्षमता

 

मुंबई,19 ऑगस्ट 2021: वुमेन्स वर्ल्ड बँकिंग ही वैश्विक विना-नफा तत्त्वावरील बँक अल्प-उत्पन्न गटातील महिलांना त्यांच्या वित्तीय सुरक्षा आणि समृद्धीकरिता आर्थिक साहित्य देण्याकरिता कटिबद्ध आहे. तसेच बँक ऑफ बडोदा ही भारताच्या सार्वजनिक क्षेत्र बँकेतील सर्वात मोठी बँक (पीएसबी) असून आज द पॉवर ऑफ जन धन: मेकिंग फायनान्स वर्क फॉर वुमेन इन इंडिया या नवीन अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. अल्प-गटातील 100 दशलक्ष महिलांना सेवा उपलब्ध करून भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका अंदाजे रु. 25,000 कोटी (250 अब्ज) जमा रक्कम आकर्षित करू शकतात आणि 40 कोटी (400 दशलक्ष) अल्प गटातील भारतीयांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करणे शक्य आहे, असा अंदाज या अहवालात मांडण्यात आला.

या अहवालात, अल्प गटातील महिला, आणि त्यांच्या घराला साह्य करणारे शक्तिशाली साहित्य म्हणून बचतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे वित्तीय लवचिकता उभारायला हातभार लागतो. महिलांच्या बचत सवय आणि महिलांसमोरील वित्तीय सर्वसमावेशक अडथळे या संबंधी सखोल अंदाज बांधताना अहवाल पीएसबी आणि धोरणकर्त्यांना शिफारस देतो की, प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीव्हाय) खातेधारकांचे यशस्वीरीत्या सबलीकरण करण्यात येईल. ही सरकारची प्रमुख वित्तीय सर्वसमावेशक योजना 2014 मध्ये लॉन्च झाली.  

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth