पीएनजी ज्वेलर्स'चा बहुचर्चित 'मंगळसूत्र महोत्सव-२०२१' सुरू

 पीएनजी ज्वेलर्स'चा बहुचर्चित 'मंगळसूत्र महोत्सव-२०२१' सुरू

ब्रँडतर्फे संपूर्ण महिनाभर 'पीएनजी ज्वेलर्स'च्या सर्व दालनांमध्ये 'पैंजण महोत्सवा'चेही आयोजन




मुंबई, 9ऑगस्ट २०२२ : 'पीएनजी ज्वेलर्स' तर्फे बहुचर्चित 'मंगळसूत्र महोत्सव २०२१'ची घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर 'पीएनजी ज्वेलर्स' तर्फे आगामी उत्सवकाळाची सुरुवात म्हणून संपूर्ण महिनाभरासाठी 'पैंजण महोत्सव' आयोजित करण्यात येणार आहे. मंगळसूत्र व पैंजण महोत्सव हे ९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान सुरू राहणार आहेत.

पवित्र अशा श्रावण महिन्यात असणार्‍या रक्षाबंधन आणि अन्य अनेक सण-उत्सवांबरोबर मंगळसूत्र महोत्सव, पैंजण महोत्सव, साजरा करून आनंद द्विगुणित करणे, हा ब्रँडचा उद्देश आहे. महिनाभर चालणार्‍या या सणासुदीच्या काळामध्ये संपूर्ण भारतभरातील ग्राहकांसाठी मंगळसूत्र, पैंजण आणि राखीच्या विविध डिझाइन्स सादर केल्या जाणार आहेत.

या महोत्सवाअंतर्गत सोन्याच्या मंगळसूत्राच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत, तर हिर्‍याच्या मंगळसूत्राच्या पेंडंटच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत तर चांदीच्या पैंजणांच्या घडणावळीवर २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ६ ग्रॅम व त्यापुढील वजनाच्या आकर्षक मंगळसूत्रांच्या हजारांहून अधिक डिझाईन्स 'पीएनजी ज्वेलर्स'च्या विविध दालनांमध्ये उपलब्ध असून हीच डिझाइन्स ब्रँडचे ई-कॉमर्स स्टोअर्स - www.pngjewellers.com या वेबसाईटवरही प्रदर्शित केली जाणार आहेत.

रक्षाबंधन साजरा करण्यासाठी चांदीच्या राख्या १४९ रूपयांपासून उपलब्ध असतील, तर सोन्याच्या राख्या २९०० रुपयांपासून उपलब्ध असतील. या ऑफर्स ग्राहकांसाठी 'पीएनजी ज्वेलर्स'ची सर्व दालने आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

याप्रसंगी बोलताना 'पीएनजी ज्वेलर्स'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, 'पीएनजी ज्वेलर्स' तर्फे दरवर्षी उत्सवकाळाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात येणारा 'मंगळसूत्र महोत्सव' हा आमच्यासाठी प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे. सध्याचा काळ हा सर्वांसाठी सामान्य नसला, तरी उत्सवकाळ हा नेहमीच घराघरांत आनंद घेऊन येतो. म्हणूनच मंगळसूत्र, पैंजण आणि राख्यांच्या विविध श्रेणींच्या माध्यमातून ग्राहकांना सकारात्मकता आणि आनंद देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे



Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth